तांत्रिक शिक्षणाचे महत्व आणि काळाची गरज Importance of Technical Education

  ITI Admission
तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व -

आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊनच्या काळात जनतेला संबोधित करताना देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना     देण्यासाठी " आत्म निर्भर भारत "चा नारा दीला. 
 "आत्म निर्भर भारत" म्हणजे थोडक्यात देशातील जनतेला ज्या गोष्टींची , वस्तुंची आवश्यकता आहे त्यांची निर्मिती आपल्या देशातच करायची असा साधा आणि सरळ अर्थ आहे.
देशाच्या या नव्या धोरणामुळे भविष्यात जास्त उत्पादन निर्मिती करण्यासाठी कारखान्यात (उद्योगधंद्यात) मोठ्या प्रमाणात रोजगार , स्वंय रोजगार निर्माण होणार आहेत.
या धोरणाचा फायदा करुन घेण्यासाठी आपल्याला " तांत्रिक ज्ञान "  ( Technical Knowlege ) असणे आवश्यक आहे.

देशातील उद्योग धंद्याना लागणारा कुशल कारागिर ( Skilled worker ) तयार करण्यासाठी तसेच स्वंय रोजगार निर्माण करण्याच्या कामासाठी केंद्रात व राज्यात " कौशल विकास आणि उद्योजकता " हा   स्वंतत्र्य विभाग सुरु केला आहे.

आतापर्यंत या विभागाकडुन  "Skill India " आणि  " MADE IN INDIA " हे  उपक्रम  राबविले  जात आहेत  आणि आता  
" आत्म निर्भर भारत ".
ITI Admission          
             


  थोडक्यात या विभागाच्यावतीने मोठ्या प्रमाणात कुशल कारागिर ( Skill Worker)  , स्वंय रोजगार आणि रोजगार निर्माण करण्यासाठी उपक्रम  राबविले  जातात.

मित्रानो, 
"जो थांबला तो संपला " या म्हणीनुसार काळाचा  अंदाज घेऊन " तांत्रिक शिक्षण " ( Technical Education ) घेणे गरजेचे आहे.

Technical Education घेण्याचे योग्य ठीकाण म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( INDUSTRIAL TRAINING INSTITUTE ) म्हणजेच आय. टी. आय. होय.

राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठीकाणी आय . टी . आय आहे  यातही शासकिय आय टी आय (Government I.T.I.)
आणि खाजगी आय टी आय ( Private I.T.I. ) असे दोन प्रकार होय. आपल्या राज्यात ४१७ शासकिय आणि ५३८ खाजगी आय टी .आय. असुन ७९  प्रकारच्या व्यवसायचे अभ्यासक्रम शिकविले जातात
वरील दोन्ही ठीकाणी Directorate General of Employment Training ( D.G.E.T. ) ने ठरवून दीलेल्या अभ्यासक्रमानुसार एक वर्ष  आणि  दोन वर्षाचे विविध कोर्सेस  ( Trades) शिकविले जातात. 

फक्त फरक एवढ्याच असतो की Government च्या आयटीआयमध्ये माफक दरात ( प्रवेश व  प्रशिक्षण फी ) प्रवेश मिळतो. त्यामानाने खाजगी आयटीआयमध्ये जास्त फी असते. गरीब व गरजु विद्यार्थ्यांसाठी शासकीय आयटीआयच चांगला .
( प्रवेश फी व प्रशिक्षण फी बाबत पुढे सांगेनच )

काही Institute मध्ये Certificate Courses शिकविले जातात. उदाहरण द्यायचे झाले तर Kohinoor Technical Institute.

मित्र व मैत्रिणींनो आयटीआय मध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची अट वय वर्षे 14 ते 40 वर्षे आहे. तसेच शैक्षणिक पात्रता एस.एस.सी (दहावी) पास आणि काही ठराविक कोर्सेस ( Trade ) साठी दहावी नापास अशी आहे. ( याबाबतची माहीतीपुढे  सांगेनच . )

 शासकिय आणि खाजगी दोन्ही आय टी आय ची प्रवेश प्रक्रीया केद्रींय पध्दतीने ONLINE केली जाते. ( online form कसा भरायचा हे पुढे पाहणार आहोत .)

प्रवेश हा मेरिटवर दीला जातो. ( ज्याला जास्त मार्क त्याला प्रथम प्राध्यान्याने  प्रवेश दिला जातो.  

मित्रांनो
एक साधे आणि सोपे गणित सांगतो म्हणजे तुम्हाला  Technical education चे महत्व पटेल.
दहावी नंतर Arts, Commerce किंवा Science घेऊन काॅलेज केले तर 5 वर्षानंतर नोकरी मिळेलच याची  काही खात्री नाही. त्यातही अजुन एखादा कोर्स करावा लागेल
आणि तेच 
* आय.टी.आय. करण्यास कोर्स ( Trade) नुसार 
1 किंवा 2 वर्ष
अधिक 1वर्ष शिकाऊ   उमेदवारी
म्हणजेच तुम्ही कोर्सनुसार 2 ते 3 वर्षात आपल्या पायावर उभे राहु शकता. आपला स्वत:चा खर्च भागेल इतके तरी वेतन नक्कीच मिळणार. खरं तर तुम्ही शिकाऊ ऊमेदवार म्हणुन कंपनीत जेव्हापासुन कामावर  रुजु व्हाल तेव्हापासुन केंद्र ( शिकाऊ उमेदवारी अधिनियम ) सरकारच्या नियमानुसार  तुम्हाला Stipend मिळण्यास सुरुवात होईल.
मित्रानो ,
आता तुम्हाला कळाले असेलच की, Technical Education घेतले तर आपले आयुष्य कीती सुकर होईल.
दहावीचा निकाल लागल्यावर online admission ची सुरुवात होईल.
अजुन निकाल लागायला उशिर आहे म्हणुन या मध्यल्या काळात
आय.टी.आय. चे स्वरुप , शिकविले जाणारे विषय व परिक्षेचे स्वरुप याची माहीती पुढील लेखात पाहुया....

मित्रांनो 
वेळीच तांत्रिक शिक्षणाचे महत्व ओळखा आणि आपले जीवन सुकर करा.....
या लेखाबाबत आपल्या प्रतिक्रीया 
Comment box मध्ये कळवा.
ITI Admission

टिप्पण्या

  1. Sar ankhin ashach prakarche tred chi mahiti pagije
    Ext - (TDM) tool and die mekar

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा