आय.टी.आय. चे स्वरुपITI Admission
मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,
आय.टी.आय. ला प्रवेश हा मेरिटवरच मिळतो.
 कोणी काहीही सांगितले तरी आमिषाला बळी पडु नका. प्रवेश प्रक्रीयेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑगस्ट २०१३ पासुन प्रवेश पध्दतीचा वापर सुरु केला.

आय.टी.आय. हे जिल्ह्याच्या ठिकाणी 3 पाळीत( Shift ) मध्ये शिकविले जातात.
पहिली पाळी :- सकाळी ७:०० ते दुपारी २:३०
दुसरी पाळी :- सकाळी ९:३० ते संध्या. ५:००
आणि
तिसरी पाळी :- दुपारी २:३० ते रात्री ९:००
अशा वेळात असतात. लांबुन देणारा मुलांना त्यांच्या सोईची वेळ देण्याचा प्रयत्न केला जातो. उर्वरित ठीकाणी दोन पाळीत प्रशिक्षण दिले जाते.( स.७ : ०० ते २ : ३० आणि स. ९ : ३० ते ५ : ००) 
 • आय.टी.आय.मध्ये प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांसह सुसज्ज work shop , practical साठी कच्चामाल , हत्यार संच, गंथ्रालय, 
 • दररोज ये जा करणारा मुलांना रेल्वे व बस पासकरिता तजवीज करुन दीली जाते.
 • आदिवासी मुला - मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह ( Hostel ) या बाबी उपलब्ध करुन देतात.
 • आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ( EBC) असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना ,अनुसुचित जाती (SC) ,अनुसूचित जमाती   ( ST) , विमुक्त जाती व भटक्या जमाती ( VJ- NT)प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क माफ असते     पण यासाठी प्रवेश घेणारा मुलाचे नावाचे आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक असते.
 • अनुसुचित जमातीच्या प्रवेशित मुलांना दरमाह रुपये 600/- निर्वाह भत्ता मिळतो.                                       
 •  आपल्या राज्यात फक्त मुलींसाठी ( Ladies I.T.I.) १५ आहेत.
 • अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी ०२
 • अनु.जाती व नवबौध्द उमेदवारांसाठी ०४
 • आदिवासी उमेदवारांसाठी ६१ 
 • आदिवासी आश्रमशाळामध्ये औ.प्र.संस्था २८
 • आणि सर्वसाधारण आय.टी.आय. ३०७ असे एकुण ४१७ शासकिय आय.टी.आय. आहेत. 

हा तर आय.टी.आय. मध्ये शिकविले जाणारे सर्व ट्रेड  हे ७०% प्रशिक्षण आणि ३० % थिअरी ( Lectures) अशाप्रकारे शिकविले जातात. 
आय.टी.आय. मध्ये शिकविले जाणारे ट्रेड  हे एक वर्ष , दोन वर्ष आणि एक ट्रेड 3 वर्षाचा आहे. 
शैक्षणिक वर्ष 1सप्टेंबरला सुरु होऊन 31 जुलैला संपते. प्रत्येक प्रवेशित प्रशिक्षणार्थ्याकडून भरपुर प्रात्यक्षिक करुन घेतले जाते. संबंधीत ट्रेडमधील कौशल्ये आत्मसाद करुन दिली जातात. प्रश्नपत्रिका सोडवुन घेतल्या जातात.
दर महीन्याच्या शेवटच्या आठवड्याला महिन्याभरात शिकविलेल्या धड्यावर मासिक परिक्षा घेतली जाते.
त्याच बरोबर दरवर्षी आय.टी.आयत , जिल्हापातळी , विभागीयपातळीआणि राज्यपातळीवर    क्रिडास्पर्धाचे  आयोजन  केले जाते थोडक्यात प्रशिक्षणार्थ्याच्या सुप्त गुणांनाही वाव दिला. 
ITI Admission
                                
आय.टी.आय.मध्ये शिकविले जाणारे विषय
1) आपल ज्या ट्रेडला प्रवेश घेतला आहे त्या ट्रेडचा विषय - ट्रेड थिअरी
2) रोजगार कौशल ( Employability Skill) - या विषयात Information Technology साक्षरता, व्यावसायिक सुरक्षा स्वास्थ्य आणि पर्यावरण शिक्षण , कामगारविषयक कायदे, उत्पादकता , संवाद कौशल हे धडे शिकविले जातात. 
3) आपल ज्या ट्रेडला प्रवेश घेतला आहे त्या ट्रेडचे प्रात्यक्षिक - ट्रेड प्रॅक्टीकल 

हे वरील तीन विषय बिगर अभियांत्रिकी व्यवसायाला ( ट्रेडला) असतात.
आणि 
4) कार्यशालेय गणित आणि सायन्स ( या विषयात दहावीपर्यंत शिकविलेल्या गणित आणि विज्ञान्याचे धडे असतात.)
5) अभियांत्रिकी चित्रकला ( Engineering Drawing) या विषयात - अभियांत्रिकी चित्रकला ओळख , साधने, फ्री हॅन्ड चित्रे  , भौमितिक रचना, लेटरिंग, डायमेनशन पध्दती, ऑरथोग्राफीक, आयसो मेट्रीक देखावे, हे धडे शिकविले जातात. थोडक्यात या विषयामुळे आपणास एखाद्या जाॅबचे डाँईंग वाचता येते. सदरच्या वस्तुची लांबी, रुंदी, जाडी त्यावर कोणते आॅपरेशन करायचे, कोणते टुल वापरायचे या सर्व गोष्टीचे ज्ञान मिळते. मित्रांनो यातील शब्द पहील्यांदा ऐकता म्हणुन नाही तर हा विषय खुपच सोपा आणि परिक्षेत scoring  आहे. पास होणे सोपे असते म्हणुन घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही.

तर वरील सर्व पाच विषय हे बिगर मशिन गट आणि मशिन गट - अभियांत्रिकी ट्रेडला असतात.
 ट्रेडच्या कालावधीनुसार एक वर्षाचा ट्रेड असेल तर ऑगस्ट महीन्यात मुख्य परीक्षा व दोन वर्षाचा ट्रेड असेल तर ट्रेडच्या कालावधीत दोन मुख्य परीक्षा होतात. जर आपल्या Badluck  ने एकाद्या किंवा जास्त विषयात नापास झालाच तरी दुसरा वर्षाला आपण जातो. अकरावी नापास झालो तर बारावीला प्रवेश नसतो. पण आय.टी.आय. मध्ये आपल्या ट्रेडच्या दुसरा वर्षाला प्रवेश मिळतो सर्व विषय पास होईपर्यंत घरी बसावे लागत नाही. एखादा विषय हा जास्तीत जास्त 5 चान्समध्ये  Clear करणे आवश्यक असते आणि तसे झाले नाही तर आय.टी.आय. सोडुन द्यावा लागतो

मित्रांनो वर सांगितलेला प्रसंग सहसा कोणावर येत नाही पंरतु नियम आहे म्हणुन सांगणे आवश्यक वाटले.
आय.टी.आय. मध्ये एक मुख्य परीक्षा आणि एक पुरवणी परीक्षा अशा वर्षाभरातुन दोन परीक्षा होत असतात.
आय.टी.आय.ची परीक्षा आतापर्यंत OMR Sheet वर बहु निवड पर्यायानुसार (MQC) होत होती.
पण या वर्षापासुन Online घेतली जाण्याची शक्यता जास्त आहे. परीक्षेत पास झाल्यावर शिकाऊ उमेदवारी अधिनियमानुसार एक वर्ष कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणुन काम करायचे.  कंपनीत शिकाऊ उमेदवारी मिळण्यासाठी आय.टी.आय.मध्ये नामांकीत कंपनीच्यावतीने  Campus interview घेतले जातात. आ.टी.आय.मधुन भरती मेळावे भरविले जातात. प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी मिळावी म्हणुन Assistant Apprenticeship Advisor या पदावरील अधिकारी मदत करतो. एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी झाली की मग पुन्हा एक परीक्षा अखील भारतीय स्तरावर घेतली जाते. या परीक्षेत ट्रेड प्राक्षत्यिकची परीक्षा कंपनीतच आणि ट्रेड थिअरीची Online बहु निवड प्रश्न पध्दतीने घेतली जाते. ही परीक्षा पास झाल्यावर विद्यार्थ्याला N.C.V.T.( National Council of Vocational Training ) चे प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्रास आंतराष्ट्रीयस्तरावर मान्यतप्राप्त असल्याने जगाच्या पाठीवर कोठेही नोकरी मिळु शकते

मित्रांनो 
जर तुम्हाला अजुन पुढे शिकायचे असेल तर पदविकेच्या (Diploma) दुसरा वर्षाला थेट प्रवेश मिळु शकतो.

मित्रानो आय.टी.आय. पास होणे सोपे आहे फक्त आपले ट्रेड निदेशकाने सांगितल्याप्रमाणे वेळच्या वेळीच प्रशिक्षणविषयक कामे केली तर आपण नापास होऊच शकत नाही. 

काय ?? बघायची पैज लावुन.
पण त्यासाठी आपणास आधी आय.टी.आय.ला प्रवेश घ्यावा लागेल.
चला तर मग आय.टी.आय.मध्ये शिकविले जाणारे ट्रेडस् ची माहीती करुन घेऊ या. 
आपणास आय.टी.आय. च्या स्वरुपाविषयी अजुन काही प्रश्न असतील तर comment box मध्ये विचारु शकता.
ITI Admission

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा