मेकॅनिक मोटार वेहिकल सारखेच काही ट्रेड ( भाग १ )

ITI Admission.
मित्रांनो,
दहावीला ७० - ७५ % च्या कमी मार्क मिळाले आणि गाडी दुरुस्तीचा Trade करायचीच इच्छा असेल तर नाराज होण्याचे कारण नाही, कारण Motor Mechanic Vehicle सारखेच थोड्याफार फरकाने अजुन आय.टी.आय. मध्ये कोर्स ( ट्रेड )आहेत. त्या कोर्सबाबतही माहीती करुन घेऊया....

) Mechanic Agricultural Machinery
ITI Admission

शैक्षणिक पात्रता :- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक )
प्रशिक्षण कालावधी :- 2 वर्षे
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट 
                                   अभियांत्रिकी व्यवसाय 

थोडक्यात सांगायचे तर शेतीसाठी जी यंत्रे वापरली जातात त्यांची रचना , कार्यपध्दती , उभारणी , देखभाल व दुरुस्ती याबाबत या ट्रेडमध्ये शिकविले जाते. हा कोर्स यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायचे असेल तर  Mechanical , Automobile च्या Diploma ला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश. 
नाहीतर शेतीविषयक अवजारे निर्मितीच्या कंपनीत एक वर्ष शिकाऊ उमेदवारी. त्यानंतर NCVT ची परीक्षा , NCVT चे certificate मिळाले की नोकरी करायला मोकळे. 
पुढे अजुन शिकायचे असेल तर डिप्लोमाच्या दुसऱ्या  वर्षाला थेट प्रवेश

नोकरीची संधी :- शेती विषयक यंत्र निर्मितीच्या विविध कारखान्यात. सदरच्या कंपनीच्या शोरूम  मध्ये , सर्विस स्टेशन मध्ये नाही तर आपणा शेती वियषक उपरणे , यंत्रे यांची सुटेभाग ( Spare Parts ) नाही तर शेती विषयक यंत्रे  दुरुस्तीचा  व्यवसायही करु शकतो.

२) मेकॅनिक ऑटो बाॅडी रिपेअर
ITI Admission

शैक्षणिक पात्रता: - दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक नाही )
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट 
                                   अभियांत्रिकी व्यवसाय 
एखाद्या गाडीचे अपघात झाल्यावर गाडीला मार लागल्याने  जो भाग दाबला जातो (खोंबतो) तो पुर्ववत करणे. थोडक्यात गाडीच्या बाॅडीची डागडुगी करण्याबाबतचे कौशल्य या ट्रेडमध्ये शिकविले जाते. कधी कधी बाॅडीला वेल्डींगही करावे लागते म्हणुन वेल्डींग करण्याचेही कौशल्य शिकविले जाते.
 ट्रेड पुर्ण झाल्यावर गाडी निर्मितीच्या कारखान्यात संबंधित विभागात एक वर्ष शिकाऊ ऊमेदवारी. त्यानंतर NCVT ची परिक्षा, परिक्षेत पास झाल्यावर NCVT चे प्रमाणपत्र मिळते. त्यानंतर सदरचे काम ज्या गॅरेजमध्ये चालते तेथे नोकरीची संधी. 
व्यवसाय सुरु करायची ईच्छा असल्यास व्यवसाय , पण व्यवसाय करण्यासाठी भांडवल जास्त लागते नाहीतर भाड्यावर जागा घेऊनही व्यवसाय सुरु शकतो.

३) मेकॅनिक डिझेल
ITI Admission

शैक्षणिक पात्रता :- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक)
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट 
                                   अभियांत्रिकी व्यवसाय 

मित्रांनो मेकॅनिक डिझेलचा अर्थ डिझेलववेल्डिंग र चालणाऱ्या  गाड्या.
या ट्रेडमध्ये डिझेल इंजिनची कार्यपध्दती, इंजिनमधील मुख्य भाग त्यांची रचना , देखभाल आणि दुरुस्तीविषयी शिकविले जाते.

या ट्रेडमध्ये  शॉप फ्लोअरवर (काम करायचे ठिकाण) काम करताना  सुरक्षिततेचे महत्त्व आणि सर्वसाधारण खबरदारी, प्रथमोपचार परिचय ,  स्वत:च्या सुरक्षिततेचे साधने यांचा परिचय , आगीचा त्रिकोण ,आगीचे प्रकार, आग विझविण्याची साधने,अपघात होण्याची कारणे. मार्किंग टूल्स , स्क्रियबर , सरफेस  प्लेट, अँगल प्लेट , काटकोण्या , कॅलिपर्स ( इन साईड , आऊट साईड ), डिव्हायडर ,  पंच , पंचचे प्रकार, हॅमर  त्याचे प्रकार आणि प्रकारावरून उपयोग. प्लायर , ऍलन की,  स्क्रूड्राइवर ,पाईप रेँग्ज  या सारख्या हॅन्ड टूल ची माहिती दिली जाते.  

व्हर्निअर कॅलिपर , व्हर्निअर हाईट गेज यांचे कार्य तत्त्व, मुख्य भाग , बनावटीचे धातु, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता, माप रिडींगचे कौशल्य ,आऊट साईड आणि इन साईड  मायक्रोमीटर ,आणि डेप्थ मायक्रोमीटर, डायल बोअर गेज त्यांचे मुख्य भाग , बनावटीचे धातु, कार्याचे तत्त्व, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य, कार्य करताना घ्यायची काळजी आणि देखभाल याचे ज्ञान दीले जाते. डिजिटल मायक्रोमीटरचे वर्णन आणि उपयोग,डायल टेस्ट इंडीकेटरचे कार्य तत्त्व , मुख्य भाग, बनावटीचे धातु, रचणा/ बांधणी ,कार्य पध्दती, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता. माप रिडींगचे कौशल्य,

धातू जोडण्याच्या पद्धती जसे सोल्डरिंग , ब्रेझिंग, बोल्टिंग , रिवेटिंग , वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू , नट  आणि बोल्ट आणि लॉकिंग डीव्हाईस जसे लॉक नट , सरक्लिप , वॉशर. गास्केट चा उपयोग, गास्केटचे मटेरियल , ऑइल सील ,गास्केट चे प्रकार याबाबत शिकविले जाते. विविध प्रकारचे कटिंग टूल जसे हौक्सो , फाईल , फाईल चे मुख्य भाग, तपशील, ग्रेड , आकार , तसेच कट वरून फाईलची प्रकार आणि त्यांचा उपयोग. बेंच आणि पेडेस्टल ग्राइंडर त्याचे  भाग , काम करताना  घ्यावयाची खबरदारी. बद्धल शिकविले जाते. लिमिट , फिट आणि टॉलरन्स म्हणजे काय ? त्याचे महत्व, तसेच याचा ऑटो कॉम्पोनन्ट मध्ये कसा वापर होतो, 

बेच ड्रिलिंग मशीन चा तपशील , पोर्टेबल ड्रिलिंग मशीन , ड्रिल बिट पकडण्याची साधने , वर्क/ जॉब पकडण्याची साधने, टॅप आणि डाय चा उपयोग. टॅप ड्रिल साईझची गणितीय आकडेमोड .वेगवेगळे डाय आणि डाय स्टॉक, रिमरचे प्रकार, उपयोग. 
 
या ट्रेड मध्ये  पत्रकारागीर या ट्रेडचे प्राथमिक   कौशल्य,  जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या धातू च्या सीट,शेअरिंग , बेंडिंग , ड्रायविंग ड्रायविंग या ऑपेरेशन बाबत शिकविले जाते.  शीट मेटल चे जॉईंट , तसेच ब्लोव लॅम्प चा पाईप फिटिंग मध्ये उपयोग. 
या ट्रेंड मध्ये बेसिक इलेक्ट्रिकल आणि बेसिक इलेकट्रोनिक्स बाबत जसे करंट , व्होल्टेज ,रोधक ,शक्ती, ऊर्जा , व्होल्ट , करंट तसेच रोधक मोजण्याचे साधन ( मल्टिमेटर ) ,सेमी कंडक्टर , ट्रान्सिस्टर या बाबत ही  शिकविले जाते. 
या ट्रेड मध्ये  याबरोबरच वेल्डिंगचे  तत्व , तपशील, वर्गीकरण आणि उपयोग, अर्क वेल्डिंगचे तत्व , इलेक्टरोड ,इज प्रिपरेशन आणि वेल्डिंगचे कसब. . गॅस वेल्डिंगचे तत्व,  इज प्रिपरेशन तसेच वेल्डिंगचे अड्वन्स वेल्डिंग प्रोसेस जसे मिग , टिग स्पॉट वेल्डिंग , प्लास्मा कटर  याचेही कौशल्य शिकविली जातात. 
हीट ट्रीटमेंट चे महत्व , करण्याचे कारण , तसेच याचे प्रकार व प्रकारावरून उपयोग.  हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक ची माहिती शिकविली जाते. हीट ट्रीटमेंटची गरज, महत्त्व तसेच भेटत ट्रीटमेंटचे प्रकार याबाबतही शिकविले जाते. 

वाहन उद्योगाचा इतिहास , या क्षेत्रात झालेली प्रगती वजन वरून वाहनाचे वर्गीकरण . internal  आणि external ईजिन , २ स्ट्रोक , ४ स्ट्रोक इंजिनचे तत्व आणि कार्य. २ स्ट्रोक , ४ स्ट्रोक इंजिन यामधील फरक . इंटर्नल combustion इंजिनचे मुख्य भाग. वाल्व आणि वाल्व अक्चुअटींग मेकॅनिझम , पिस्टन , चे तपशील आणि कार्य,  कनेक्टिन्ग रॉड चे तपशील आणि कार्य तसेच यातील मुख्य भाग तसेच सिलेंडर ब्लॉक , याची बांधणी ,इंजिनची जोडणी  याबाबत शिकविले जाते. 
कूलिंग सिस्टिमचे महत्व यतीन मुख घटक जसे रेडिएटर , वॉटर पंप ,,कूलिंग फॅन , तापमानसूचक , रेडिएटर प्रेशर कॅप . लुब्रिकेशन सिस्टिम , यातील मुख्य भाग त्यांचे कार्य, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल पंप. डिझेल फ्युएल सिस्टिम यातील  वेगवेगळे घटक त्यांचे कार्य  जसे डिझेल टॅंक आणि लाईन ,फ्युएल फिल्टर ,वॉटर सेपरेटर ,पलुंगेर पंप ,इलेक्ट्रिक डिझेल कंट्रोल सिस्टिम . ए .सी . आणि डी .सी . जनरेटर बाबतची मूलभूत माहिती.
डिझेल इंजिन सुरु करताना येणारे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अडचणीची करणे त्यावर उपाय ,इंजिन  जास्त गरम होणे, इंधन जास्त  जळणे , इंजिन मध्ये कमी शक्ती बनंने, इंजिनमध्ये आवाज येणे या सर्वांची कारणे आणि त्यावरील उपाय या सर्व बाबींचे   कौशल्य शिकविली जातात.

 प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यावर  या ट्रेडसाठी दोन वर्षाचा शिकाऊ उमेदवारीचा कालावधी असतो. डिझेल गाड्या बनविणाऱ्या गाड्यांच्या कंपनीत , सर्विस स्टेशनमध्ये शिकाऊ उमेदवारी मिळु शकते. शिकाऊ उमेदवारीनंतर NCVT ची परिक्षा व त्यानंतर पुढे शिकायची ईच्छा असल्यास डिप्लोमाच्या दुसऱ्या  वर्षाला थेट प्रवेश...

नोकरीची संधी :- डिझेल गाड्या निर्मितीच्या कंपनीत , नांमाकित गाड्याच्या शोरुममध्ये, सर्विस स्टेशनमध्ये,महापालिकांच्या वाहतुक सेवेच्या आस्थापनेतुन कार्यशाळेत गाड्या दुरुस्ती, छोट्या मोठ्या गॅरेजमध्ये नोकरी मिळु शकते.
व्यवसाय करायची ईच्छा असल्यास आपल्या मालकीचे गॅरेज सुरु करु शकतो , पाहीजे तर प्रथम भाडाच्या जागेतुन सुरुवात करावी.

मित्रांनो आपण वर पाहीले आहेच या ट्रेडमध्ये फक्त डिझेल इंजिनबाबत शिकविले जाते पण आपल्याला कामाची आवड असल्यास डिझेल गाड्यांचे दुरुस्तीचे काम करता करता पेट्रोल इंजिनच्या दुरुस्तीचे कामही शिकु शकता.

टेक्निकल शिक्षणात आपण जेवढे हार्डवर्क करणार तेवढे तुमचा भविष्य काळ उज्वल....

४) मेकॅनिक ऑटो बाॅडी पेंटींग
ITI Admissionशैक्षणिक पात्रता :- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक नाही )
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट 
                                  अभियांत्रिकी व्यवसाय 

मित्रांनो या ट्रेडमध्ये आपणास गाड्यांना रंग लावण्याचे कौशल्य शिकविले जाते. पेटींग करण्याच्या स्टेप बाय स्टेप कृती ( प्रोसेस )शिकवली जाते. 

या ट्रेडमध्ये  शॉप फ्लोअरवर (काम करायचे ठिकाण) काम करताना  सुरक्षिततेचे महत्त्व आणि सर्वसाधारण खबरदारी, प्रथमोपचार परिचय ,  स्वत:च्या सुरक्षिततेचे साधने यांचा परिचय , आगीचा त्रिकोण ,आगीचे प्रकार, आग विझविण्याची साधने,अपघात होण्याची कारणे. काम करताना सुरक्षा विषयक साधनांचा वापर करण्या बाबत सांगितले जाते. रंग लावताना करावयाच्या पूर्व तयारी बाबत, रंग काम करतानाची कृती जसे मटेरियल ची निवड,टूल आणि उपकरणे- गाडीचा खराब  पुष्ठभाग पोलिश पेपरने साफ करणे, त्यानंतर त्यावर प्रायमर कोटिंग करणे, बसे कोटिंग बेस कोट रंग लावून करणे,मेट्टालिक रंग लावण्यासाठी  पोलिश पेपरने तो क्लीन करणे , मग गंज विरोधी रंग लावण्याची प्रोसेस . या बाबतचे प्रॅक्टिकली शिकविले जाते. 
वेगवेगळ्या प्रकारचे पोलिश पेपर , पेंटिंग मध्ये  येणारे दोष , कारण आणि त्यावर उपाय याबाबत ही शिकविले जाते. 
याच बरोबर वेल्डर ट्रेडचे प्राथमिक कौशल्येहि शिकविली जातात. इलेकट्रोड , त्याचे प्रकार, तपशील ,आणि आर्क वेल्डिंग करण्याची पद्धत ,गॅस वेल्डिंग , ब्रेझिंग आणि सोल्ड्रिंग  करण्याची  पद्धत  , गॅस कटिंगचा तपशील. त्याच बरोबर मिग वेल्डिंगचे बाबतही शिकविले जाते.    

हा ट्रेड पुर्ण झाल्यावर एक वर्षाची शिकाऊ ऊमेदवारी. या ट्रेडमधील मुलांना गाड्या निर्मितीच्या पेटींग सेक्शनमध्ये शिकाऊ ऊमेदवारी मिळु शकते. तसेच छोट्या मोठ्या गॅरेजमध्ये जेथे पेटींगचे काम चालते तेथे.

NCVT ची परिक्षा त्यानंतर पास झाल्यावर गाड्या निर्मितीच्या कंपनीमध्ये पेटींग विभागात नोकरी. छोट्या मोठ्या गॅरेजेस् मध्ये जेथे पेटींगची कामे तेथे नोकरी मिळु शकते..
आर्थिकस्थिती चांगली असल्यास आपले स्वत:चे गॅरेज.....
ITI Admission

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा