मेकॅनिक मोटार वेहिकल सारखेच काही ट्रेड ( भाग २ )

ITI AITI Admissiondmission
५) मेकॅनिक ऑटो इलेक्टीकल अँड  इलेक्टोनिक्स
 
     


          
शैक्षणिक पात्रता:- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक ) 
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट 
                                  अभियांत्रिकी व्यवसाय 
मित्रांनो या ट्रेडमध्ये इलेक्टीकलचे व इलेक्टोनिक्सचे  ज्ञान शिकविले जाते. यांत्रिक गाड्यामध्ये जे वायरिंग असते त्या विषयी  शिकविले जाते. Dashboard वरील उपकरणांची माहीती, कार्यपध्दती, देखभाल आणि  दुरुस्तीचे काम शिकविले जाते. हा कोर्स पुर्ण झाल्यावर एक वर्ष शिकाऊ ऊमेदवारी गाड्या निर्मितीच्या कंपनीतील सबंधीत विभागात. NCVT ची परिक्षा पास झाल्यावर 
गाड्या निर्मितीच्या कंपन्यामध्ये संबधीत विभागात नोकरीची संधी. तसेच छोट्या मोठ्या गॅरेजमध्ये गाड्यांच्या वायरिंगची, Dashboard मधील electronics ची कामे चालतात तेथे नोकरी....

६) मेकॅनिक मोटार सायकल
 ITI Admissionशैक्षणिक पात्रता :- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक ) 
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट 
                                  अभियांत्रिकी व्यवसाय 


या ट्रेडमध्ये  शॉप फ्लोअरवर (काम करायचे ठिकाण) काम करताना  सुरक्षिततेचे महत्त्व आणि सर्वसाधारण खबरदारी, प्रथमोपचार परिचय ,  स्वत:च्या सुरक्षिततेचे साधने यांचा परिचय , आगीचा त्रिकोण ,आगीचे प्रकार, आग विझविण्याची साधने,अपघात होण्याची कारणे. मार्किंग टूल्स , स्क्रियबर , सरफेस  प्लेट, अँगल प्लेट , काटकोण्या , कॅलिपर्स ( इन साईड , आऊट साईड ), डिव्हायडर ,  पंच , पंचचे प्रकार, हॅमर  त्याचे प्रकार आणि प्रकारावरून उपयोग. प्लायर , ऍलन की,  स्क्रूड्राइवर ,पाईप रेँग्ज  या सारख्या हॅन्ड टूल ची माहिती दिली जाते.  

व्हर्निअर कॅलिपर , व्हर्निअर हाईट गेज यांचे कार्य तत्त्व, मुख्य भाग , बनावटीचे धातु, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता, माप रिडींगचे कौशल्य ,आऊट साईड आणि इन साईड  मायक्रोमीटर ,आणि डेप्थ मायक्रोमीटर, डायल बोअर गेज त्यांचे मुख्य भाग , बनावटीचे धातु, कार्याचे तत्त्व, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य, कार्य करताना घ्यायची काळजी आणि देखभाल याचे ज्ञान दीले जाते. डिजिटल मायक्रोमीटरचे वर्णन आणि उपयोग,डायल टेस्ट इंडीकेटरचे कार्य तत्त्व , मुख्य भाग, बनावटीचे धातु, रचणा/ बांधणी ,कार्य पध्दती, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता. माप रिडींगचे कौशल्य,

वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू , नट  आणि बोल्ट आणि लॉकिंग डीव्हाईस जसे लॉक नट , सरक्लिप , वॉशर. गास्केट चा उपयोग, गास्केटचे मटेरियल , ऑइल सील ,गास्केट चे प्रकार याबाबत शिकविले जाते. विविध प्रकारचे कटिंग टूल जसे हौक्सो , फाईल , फाईल चे मुख्य भाग, तपशील, ग्रेड , आकार , तसेच कट वरून फाईलची प्रकार आणि त्यांचा उपयोग. बेंच आणि पेडेस्टल ग्राइंडर त्याचे  भाग , काम करताना  घ्यावयाची खबरदारी. बद्धल शिकविले जाते. लिमिट , फिट आणि टॉलरन्स म्हणजे काय ? त्याचे महत्व, तसेच याचा ऑटो कॉम्पोनन्ट मध्ये कसा वापर होतो, 

बेच ड्रिलिंग मशीन चा तपशील , पोर्टेबल ड्रिलिंग मशीन , ड्रिल बिट पकडण्याची साधने , वर्क/ जॉब पकडण्याची साधने, टॅप आणि डाय चा उपयोग. टॅप ड्रिल साईझची गणितीय आकडेमोड .वेगवेगळे डाय आणि डाय स्टॉक, रिमरचे प्रकार, उपयोग. 
या ट्रेड मध्ये  पत्रकारागीर या ट्रेडचे प्राथमिक   कौशल्य,  जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या धातू च्या सीट,शेअरिंग , बेंडिंग , ड्रायविंग ड्रायविंग या ऑपेरेशन बाबत शिकविले जाते.  शीट मेटल चे जॉईंट , तसेच ब्लोव लॅम्प चा पाईप फिटिंग मध्ये उपयोग. 
या ट्रेंड मध्ये बेसिक इलेक्ट्रिकल आणि बेसिक इलेकट्रोनिक्स बाबत जसे करंट , व्होल्टेज ,रोधक ,शक्ती, ऊर्जा , व्होल्ट , करंट तसेच रोधक मोजण्याचे साधन ( मल्टिमेटर ) ,सेमी कंडक्टर , ट्रान्सिस्टर या बाबत ही  शिकविले जाते. 

या ट्रेड मध्ये  याबरोबरच वेल्डिंगचे  तत्व , तपशील, वर्गीकरण आणि उपयोग, अर्क वेल्डिंगचे तत्व , इलेक्टरोड ,इज प्रिपरेशन आणि वेल्डिंगचे कसब. . गॅस वेल्डिंगचे तत्व,  इज प्रिपरेशन तसेच वेल्डिंगचे अड्वन्स वेल्डिंग प्रोसेस जसे मिग , टिग स्पॉट वेल्डिंग , प्लास्मा कटर  याचेही कौशल्य शिकविली जातात. 
हीट ट्रीटमेंट चे महत्व , करण्याचे कारण , तसेच याचे प्रकार व प्रकारावरून उपयोग.  हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक ची माहिती शिकविली जाते. हीट ट्रीटमेंटची गरज, महत्त्व तसेच भेटत ट्रीटमेंटचे प्रकार याबाबतही शिकविले जाते. 

वाहन उद्योगाचा इतिहास , या क्षेत्रात झालेली प्रगती वजन वरून वाहनाचे वर्गीकरण . भारतातील दोन चाकी ,तीन चाकी गाडी च्या उद्योगबाबत , आघाडीवरील निर्माते, नवीन मॉडेल , internal  आणि external ईजिन , २ स्ट्रोक , ४ स्ट्रोक इंजिनचे तत्व आणि कार्य. २ स्ट्रोक , ४ स्ट्रोक इंजिन यामधील फरक .  पिस्टन, पिस्टन रिंग , काँनेकटिंग रॉड  आणि पिस्टन पिन या बाबतचे  कार्य , तपशील. तसेच क्रांक शाफ्टचे कार्य आणि तपशील बाबत शिकविले जाते.  
 व्हाल्व चे कार्य, वेगवेगळ्या प्रकारचे व्हाल्व , बनावटीचे धातू , व्हाल्व ऑपरेटिंग मेकॅनिझम , व्हाल्व सीटचे महत्व , तसेच व्हाल्व टाईमिंग सेटिंग,  अति धूर येणे, इंजिन अति गरम होणे, काही तरी वेगळा आवाज येणे या सारख्या अडचणींवर उपाय यांचे  कौशल्य शिकविली जातात.
कॅर्बोरेटर चे कार्य , कॅर्बोरेटर चे प्रकार , कॅर्बोरेटरची कार्य पद्धती , लुब्रिकेशन आणि कूलिंग सिस्टमचे महत्व, इंजिने ऑइल चे कार्य, ऑईलचे ग्रॅड . गॅसोलीन /  डिझेल फ्युएल सिस्टिम बाबत , फ्युएल सप्लाय सिस्टिम , याच्याशी संबंधित येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय याचे  कौशल्य शिकविली जातात.
स्टेरिंगचे तत्व , वेगवेगळ्या प्रकारचे स्टेरिंग आणि हॅन्डलचे तपशील ,स्टेरिंग स्टिमचे कार्य, तपशील  आणि बांधणी तसेच  स्टेरिंग आणि हॅन्डल विषयी  उध्दभवणारे  प्रॊब्लेम  आणि  त्यावरील उपाय  याचे कौशल्य शिकविली जातात.    सस्पेन्शन सिस्टिमचे हि शिकविले जाते. 

व्हीलचे कार्य , त्याची बांधणी, व्हील टाईप स्पोक , कास्ट व्हील आणि साईज  , व्हील बॅलन्सिंग , रिम साईज ,टायरचे कार्य  आणि त्याची घडण , रेडिअल टायर , ट्यूबलेस  टायर, टायरची बांधणी , त्याचे मटेरियल , टायरमधील धागा याबाबतही शिकविले जाते.  ब्रेकिंग सिस्टिम , क्लच  आणि ट्रान्समिशन आणि यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय. इग्निशनचे तत्व , इग्निशनमधील घटक , यात उद्भवणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय या बाबतहि शिकविले जाते. 
  थ्री व्हीलर गाडीत वापरले जाणारे LPG / CNG पॉवर इंजिनबाबत शिकविले जाते. मोटार वेहिकले कायद्या विषयी हि या ट्रेड मध्ये शिकविले जाते. 

थोडक्यात या ट्रेडमध्ये मोटार सायकलच्या इंजिनची कार्यपध्दत , इंजिनमधील मुख्य पार्टस् त्यांचे कार्य , देखभाल आणि दुरुस्तीविषयीचे शिकविले जाते
हा ट्रेडपुर्ण झाल्यावर एक वर्ष शिकाऊ ऊमेदवारी( बजाज ,एनफिल्ड ,TVS ,HONDA,  HERO , SUZUKI ,आणि YAMAHA यासारख्या गाडी निर्मितीच्या कारखान्यात )  . त्यानंतर NCVT ची परिक्षा आणि त्यानंतर मोटर सायकल निर्मितीच्या कंपनीमध्ये ( वरील सर्व कंपनी ) नोकरीची संधी.

जर आपणास व्यवसाय करायचा असेल तर छोटे गॅरेज सुरु करु शकता , नाही तर स्पेअर पार्टस् चे दुकानही काढु शकता.

७)  मेकॅनिक ट्रॅक्टर

 ITI Admission
शैक्षणिक पात्रता:- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक) 
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट 
                                  अभियांत्रिकी व्यवसाय 
मित्रांनो समजले ना काय शिकवित असतील या ट्रेडमध्ये...
हो बरोबर ट्रॅक्टरविषयीच
ट्रॅक्टरमधील इंजिनची माहीती, त्यामधील मुख्य पार्टस् , रचना, कार्य पध्दती, देखभाल आणि दुरुस्तीचे काम याविषय या ट्रेडमध्ये शिकविले जाते. तसेच ट्रॅक्टरमधील वायरिंगचे दुरुस्तीचे व देखभालीच्या कामासाठी ईलेक्टीकल व ईलेक्टानिकचे बेसिक ज्ञान शिकविले जाते.
प्रशिक्षणानंतर दोन वर्ष शिकाऊ ऊमेदवारी.
शिकाऊ ऊमेदवारी ट्रॅक्टर निर्मितीच्या कारखान्यात मिळते. ट्रॅक्टर निर्मितीचे कारखाने पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.
त्यानंतर NCVT ची परिक्षा. NCVT चे सर्टीफिकेट मिळाले की,
ट्रॅक्टर निर्मितीच्या कारखान्यात नोकरीची संधी  ( पुण्यातच हे कारखाने जास्त आहेत.)
Force Motors Ltd., 
John Deere IndiaPvt.Ltd.,
 Internal Tractor Ltd.,
 New Holland , 
Tractor & Form equipment Ltd.
आणि आपल्या सर्वाच्या परीचित नाव Mahindra & Mahindra.
आपला स्वत:चा ट्रॅक्टर दुरुस्तीचा व्यवसाय ,ट्रॅक्टरच्या स्पेअर्स पार्टस् चे दुकानही काढु शकतो.

मित्रांनो मनात एक गोष्ट पक्की करून ठेवा कि आय. टी .आय . मधील सर्व ट्रेड हे चांगलेच आहेत फक्त आपण मेहनत घेताना कमी पडून जमायचे नाही.

आपणास या विषयी अजून काही प्रश्न अडचण असेल तर comment box मध्ये विचारू शकता.
ITI Admission

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा