ड्राफ्समनसंबंधीत ट्रेड Draughtsman trade

ITI Admission 
मित्रांनो ड्राफ्समन संबधीत खालील ट्रेड आहेत . 
१) ड्राफ्समन सिव्हील ( Civil  Draughtsman )
२) वास्तुशास्त्र सहाय्यक ( Architectural Draughtsman )
३) इंटीरिअर डिझाईन  अँड डेकोरेटर  ( Interior  Design and Decorator ) 
४) सर्व्हेअर ( Surveyor )

वरील सर्व ट्रेड एकमेकांशीसंबंधित आहेत. त्यातील ड्राफ्समन सिव्हील हा ट्रेड महत्वाचा ट्रेड असून या ट्रेड मध्ये सर्वांत जास्त कौशल्ये शिकवली जातात. प्रत्येक ट्रेडच्या प्रवेशासाठी असलेली  शैक्षणिक पात्रता , प्रशिक्षण कालावधी, आणि नोकरीची संधी याबाबत पाहूया. 

१) ड्राफ्समन सिव्हील :-
ITI Admission

शैक्षणिक पात्रता:- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक )
प्रशिक्षण कालावधी :- दोन वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट-
                                  अभियांत्रिकी व्यवसाय

मित्रांनो / मैत्रिणींनो आपणास एखादे घर , पार्क , बिल्डींग, कारखाना, शाळा बांधायची असते तेव्हा सर्व प्रथम त्याचा नकाशा     ( टेक्निकल भाषेत Design ) बनवावी लागते. त्या डिझाईननुसारच त्या वास्तुचे बांधकाम पायापासुन कळसापर्यत केले जाते. ते डिझाईन बनविण्याचे काम  ड्राफ्समन सिव्हील करत असतो. 

आता तुम्हाला या ट्रेडला किती मागणी असते हे लक्षात आले असेलच. या ट्रेडमध्ये आपणास अभियांत्रिकी चित्रकला हा विषय महत्वाचा आहे.   खिडकीची , दरवाज्याची , जिन्याची डिझाईन शिकविली जाते. एक मजली घर, बहुमजली बिल्डिंग, फार्म हाऊस, शाळा, कारखाना यांच्या डिझाईन बनविण्याचे कौशल्य शिकवितात.एखाद्या बांधकामास किती खर्च येईल हे Estimation काढण्याचे कौशल्यही यामध्ये शिकविले जाते. सदर डिझाईन संगणकावरही बनविता येण्यासाठी कॅड -  CAD       ( Computerized Added Drafting and Designing ) बाबतही शिकवितात.

हा ट्रेड प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायचे असेल तर Diploma ला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश. 
नाहीतर  एक वर्षाचे शिकाऊ ऊमेदवारी महापालिकेत, वास्तुशास्त्राच्या खाजगी कंपनीत  करुन त्यानंतर NCVT ची परिक्षा, NCVT चे सर्टीफिकेट मिळाल्यावर नोकरी शोधण्यास मोकळे. 

नोकरीची संधी :- 
सरकारी आस्थापना ,P.W.D. , सिडको , बृहनमुंबई महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका ,तसेच इतर महानगरपालिकाचे आस्थापना  आणि  MMRDA  तसेच खाजगी Architecture कंपनीत  नोकरी मिळतेच मिळते.
 सध्या बाजारात या ट्रेडच्या माणसांनापण भरपुर मागणी आहे. 

२) वास्तुशास्त्र सहाय्यक ( Architectural Draughtsman )
ITI Admission

शैक्षणिक पात्रता :- दहावी पास ( गणित व विज्ञान विषय बंधनकारक )
प्रशिक्षण कालावधी :- २ वर्षे 
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट-
                                  अभियांत्रिकी व्यवसाय

मित्रांनो / मैत्रिणींनो ,
हा ट्रेडपण सिव्हील ड्राफ्समन सारखाच आहे. या ट्रेडमध्येही अंभियांत्रिकी चित्रकला हा विषय जास्त महत्वाचा आहे. एखाद्या ब्रिजचे, पार्कचे , एक मजली ईमारत , बहु मजली ईमारतीचे डिझाईन तयार करण्याचे कौशल्य यात शिकविले जाते. सध्या संगणकाचा जमाना असल्याने सदर डिझाईन संगणकावर काढता यावे म्हणुन CAD ( Computerized Added Drafting and Designing) चे कौशल्यही यात शिकविले जाते.

मित्रांनो जर तुम्हाला सिव्हील ड्राफ्समन ट्रेडला प्रवेश मिळाला नाही तर या ट्रेडला प्रवेश घेण्यास हरकत नाही. पण वास्तुशास्त्र सहाय्यक या ट्रेडपेक्षा सिव्हील ड्राफ्समन ट्रेडमध्ये जास्त कौशल्ये शिकविली जातात. 
जर शिकायची ईच्छा , चिकाटी असेल तर ती कौशल्ये नंतरही आपण  आत्मसाद करुन घेऊ शकता.

या  ट्रेडचे  प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायचे असेल तर  Diploma ला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश. 
नाहीतर  वर्ष शिकाऊ ऊमेदवारी त्यानंतर NCVTची परिक्षा. NCVT चे प्रमाणपत्र मिळाले की, आर्किटेक्चरसंबंधी सरकारी आस्थापना , म्हाडा, सिडको, महापालिकेच्या आस्थापना , एमएमआरडीए., खाजगी आस्थापना याठीकाणी नोकरी मिळते.

३) सर्व्हेअर ( Surveyor )
ITI Admission

शैक्षणिक पात्रता :- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक नाही ) 
प्रशिक्षण कालावधी :- 2 वर्षे
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट-
                                अभियांत्रिकी व्यवसाय
कोणतेही एखादे बांधकाम करावयाचे झाल्यास सर्वप्रथम जागा मोजणी करुन चारी बाजुने खांब ठोकून जागेची सीमा ( बाऊर्डी) आखली जाते. त्या जागेच्या आराखड्याप्रमाणे पुढे त्या जागेत एखादी वास्तु कशी बांधायची ते ठरविले जाते. थोडक्यात दीलेल्या नकाशावरुन ( सदरचा नकाशा महसुल खात्याच्या भुमापन विभागाकडे असतो) जागेचे मोजमाप करुन जागेची हद्द ठरविणे आणि हे काम जो करतो त्याला सर्व्हेअर असे म्हणतात.
आपल्या गावात , भागात एखादा रस्ता बांधण्यापुर्वी आपण एक काठी घेऊन आणि एक कॅमेर्‍यासारखी वस्तु            ( उपकरण ) घेऊन काम करताना नक्कीच पाहीले असेल त्या कामालाच सर्व्हे करणे म्हणतात.

या ट्रेडमध्ये पण अंभियांत्रिकी चित्रकला विषय महत्वाचा असतो. या ट्रेडमध्ये सर्व्हेचे वर्गीकरण , साईन , चिन्ह , सर्व्हे करण्याच्या पध्दती , लेवलिंग, काऊटरिंग , डीजिटल देवोडोलिंग , टोटल सर्व्हे, जीपीएस् कॅड ( Computerized Added Drafting & Designing ) व एखाद्या कामाचे अंदाजे खर्च काढण्याचे कौशल्यही शिकवितात.
या  ट्रेडचे  प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायचे असेल तर  Diploma ला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश. 
नाहीतर  शिकाऊ ऊमेदवारी. त्यानंतर NCVT ची परिक्षा. NCVT चे प्रमाणपत्र मिळाल्यावर नोकरी करायला मोकळे. 
नोकरीची संधी :- 
सरकारी आस्थापनेमध्ये, महापालिकेंच्या आस्थापनेत ,सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, पी.डब्लु.डी. तसेच खाजगी आस्थापनेत सर्व्हेची कामे चालतात तिथे नोकरीची संधी असते.

४) इंटेरिअर डिझाईन अँड  डेकोरेशन 
         (Interior Design and Decoration )
ITI Admission


शैक्षणिक पात्रता :- दहावी पास 
                              ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक )
प्रशिक्षण कालावधी:- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट-
                                 अभियांत्रिकी व्यवसाय

मित्रांनो / मैत्रिणींनो या ट्रेडमध्ये घर,इमारत,माॅल ,व्यावसायिक भवन, छोटी मोठी दुकाने यांची आतुन सजावट / चांगला लुक देणे म्हणजेच इंटेरिअर डिझाईन अँड  डेकोरेशन
यांचेच कौशल्य यात शिकविले जाते. या ट्रेडचे महत्व आता फक्त मोठ्या मोठ्या शहरापुरते मर्यादित राहीलेले नाही तर छोट्या मोठ्या गावातही याला महत्व प्राप्त झाले आहे. आजकाल प्रत्येक कार्यक्रमात सजावट करण्याकडे सर्वांचा कल असतो.
ज्या मुलांना सजावट करण्यात आवड आहे, कल्पकता आहे तसेच गोड बोलण्याचे कौशल्य  अशा मुलांचे भविष्य या ट्रेडने नक्कीच उजळणार.
या ट्रेडमध्ये मुख्य करुन मटेरिअल परचेसिंग,पेन्टस् आणि कलरिंग टेकनिक, सुतारकामातील जोड, पार्टीशन वाॅल, बिल्डींग मटेरिअल,दरवाजा , विंडो डिझाईन , डिझाईन ऑफ इंटीरिअर, फर्निचरचे तपशिल  आणि डिझाईन, कॅड ( Computerized Added Drafting & Designing ) त्याचबरोबर एखाद्या सजावटीच्या कामाला कीती खर्च म्हणजेच काॅस्ट ईस्टीमेट टेकनिकही या ट्रेडमध्ये शिकविले जाते

.प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर आय.टी.आयची परिक्षा त्यानंतर एक वर्ष शिकाऊ ऊमेदवारी. NCVT च्या परिक्षेनंतर 
नोकरीची संधी :-  फिल्म स्टुडीओत , टीव्ही सिरीअलचे शो, ईव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत, मोठे मोठे माॅल, दवाखाने,इंटीरिअर डिझाईनच्या कंपन्यात, कार्पोरेट कंपनीत, बांधकाम कंपनीमध्ये , सरकारी आॅफीसेसमध्ये अशा ठीकाणी नोकरीची संधी असते. 
पुढे मागे आपला छोटा व्यवसायही सुरु करु शकतो.


ड्राफ्समन मेकॅनिकल :- 
( Draughtsman Mechanical )
ITI Admission

शैक्षणिक पात्रता :- 
दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक ) 
प्रशिक्षण कालावधी :- 2 वर्षे
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट-
                                 अभियांत्रिकी व्यवसाय

मित्रांनो /  मैत्रिणींनो  ड्राफ्समन मेकॅनिकल  हा ट्रेड ड्राफ्समन सिव्हीलसारखाच जास्त मागणीचा आहे. दोन्होंमध्ये फरक एवढ्याच की ड्राफ्समन सिव्हीलमध्ये बांधकामविषयक ड्राईंग काढायला लागतात , तर 
ड्राफ्समन मेकॅनिकल मध्ये यंत्र / मशीन विषयक ड्राईंग काढल्या जातात.
ड्राफ्समन मेकॅनिकल या ट्रेडमध्ये मशीनच्या ( यंत्राची ) वेगवेगळ्या भागांची , विविध भागांच्या जोडणीनंतरची ड्राईंग , मशीनच्या पार्टसची माहीती, पार्टसच्या जोडणीची पध्दत,मापे दर्शविणे. यांत्रिक उपकरणांच्या उभारणीचे ड्राईंग काढले जाते.
या ट्रेडमध्येही अभियांत्रिकी चित्रकला हा विषय महत्वाचा आहे. 
यामध्ये लेटरिंगच्या पध्दती, डायमेन्शनच्या पध्दती, सेक्शनल View, बोल्टचे विविध प्रकार, मापन उपकरणे, बेअरिंग , पुली, गिअरचे प्रकार व उपयोग, पाईप मटेरिअल, पाईप ज्वाईंटस् , तसेच कॅड ( Computerized  Added Drafting & Designing ) तसेच थ्रीडी माॅडेलिंगचे कौशल्यही शिकविले जाते. त्याचबरोबर आय.टी.आय.मधील कातारी , मशिनिस्ट, ईलेक्टीकल, वेल्डर ट्रेडचे  बेसिक ज्ञानही दीड दोन महिन्यात शिकविले जाते.

मित्रांनो या ट्रेडलाही बाजारात जास्त मागणी असते.या  ट्रेडचे  प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायचे असेल तर  Diploma ला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश. 
 नाहीतर   त्यानंतर संबंधीत आस्थामोकळे. पनांच्या   ( उत्पादन आणि निर्मिती च्या क्षेत्रात . फॅब्रिकेशन उदाहरण म्हणजे ब्रिज ,छत निर्मिती , ऑटोमोबाईल क्षेत्रात, जहाज निर्मिती आणि दुरुस्तीच्या क्षेत्रात, पायाभूत सुविधा आणि डिफेन्सच्या क्षेत्रात, पब्लिक सेक्टर मधील ऊद्योग जसे भेल ( BHEL ) , BEXL , NTPC , भारतीय रेल्वे) ठीकाणी एक वर्ष शिकाऊ ऊमेदवारी. 
त्यानंतर NCVT ची परिक्षा ,NCVT चे सर्टीफीकेट मिळाले कि नोकरी शोधण्यास 

नोकरीची संधी:- उत्पादन आणि निर्मिती च्या क्षेत्रात . फॅब्रिकेशन उदाहरण म्हणजे ब्रिज ,छत निर्मिती , ऑटोमोबाईल क्षेत्रात, जहाज निर्मिती आणि दुरुस्तीच्या क्षेत्रात, पायाभूत सुविधा आणि डिफेन्सच्या क्षेत्रात, पब्लिक सेक्टर मधील ऊद्योग जसे भेल ( BHEL ) , BEXL , NTPC , भारतीय रेल्वे या ठिकाणी ड्राफ्समन मेकॅनिकलला नोकरीची संधी असते. किंवा आपला स्वतःचा  व्यवसाय. 

मित्रांनो वरील ट्रेड मध्ये तुम्हांला काही समजले प्रश्न , शंका असल्यास किंवा  अजून काही माहिती हवी असेल तर comment बॉक्स  मध्ये आपला प्रश्न विचारु शकता.
ITI Admission

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा