फोटोग्राफीसंबंधीत ट्रेड Photography Trade

ITI Admission
फोटोग्राफी 

मित्रांनो,
फोटोग्राफी म्हणजे काय ?
असा प्रश्न विचारल्यावर क्षणाचाही विचार न करता आपण " एखादा क्षण कॅमेरात बंद करणे". असेच मोठ्या प्रमाणात उत्तर देतो.
खरचं फोटोग्राफी म्हणजे "क्षणाचे चित्र पकडणे" होय. आपल्या जुन्या फोटोचा आल्बम काढल्यावर एक एक फोटो बघतांना त्या क्षणाची आठवण होते. पुर्वीच्या काळात कसे फोटो काढले जायचे हे आपण टी. व्हीवरील एखाद्या जाहीरातीत पाहीले असेलच. रोल आल्यावर फोटो काढणे सोपे झाले आहे.
 हा पण जेव्हा तो रोल धुवुन यायचा,तेव्हाच समजायचे फोटो कसा आला आहे ते , पण आता तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एका क्लिकमध्ये मोबाईलवर फोटो निघु शकतो. आपणास जो फोटो आवडला तो ठेवला व बाकीचे डीलिट मारले. आता तर फोटो काढायला कोणाची गरजही लागत नाही, आपला फोटो आपणच काढतो काय बरोबर ना ? सेल्फीबध्दल बोलतोय मी.

मित्रांनो फोटोग्राफी करणे म्हणजे कॅमेरा / मोबाईल उचलायचा आणि कचाकच फ्लॅश मारत फोटो काढत जायचे असे नसते. उचलली जीभ लावली टाळुला ईतके सोपे नसते. फोटोग्राफी करण तितकं सोप देखील नाही. त्यासाठी मेहनत आणि एका विशिष्ट दृष्टीकोनाची गरज लागते. ती नजर मोबाईलमुळे तयार होत राहतो. काय तुम्हाला फोटो काढायला आवडते ? खरतरं फोटोग्राफी करणे म्हणजे कला तसेच विज्ञान आहे.याच साठी आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईलरुपी कॅमेरा आला आहे तरी व्यावसायिक छायाचित्रकारांची ( फोटोग्राफर ) मागणी दीवसेंदीवस वाढत आहे.
चलातर मित्रांनो आज या ट्रेडची माहीती करुन घेऊ या.
फोटोग्राफीसंबंधी आय.टी.आयमध्ये दोन ट्रेड आहेत.
१) फोटोग्राफर
२) डिजिटल फोटोग्राफर
यांची माहिती पाहु या.

वरील ट्रेडमध्ये त्यानेच प्रवेश घ्यावा ज्याच्यात 1) फोटोग्राफीबध्दल आवड , वेड आहे
2) कल्पकता , क्रीएटीव्हीटी आहे. एखाद्या वस्तुकडे / गोष्टीकडे बघण्याचा विशिष्ट दृष्टीकोन असणे आवश्यक असते. वेगवेगळ्या आयडिया सुचल्या पाहीजेत.
३) सहनशक्ती व स्वभावात लवचिकता ( Flexibilty ) आहे.
या क्षेत्रा छोट्या छोट्या गोष्टीवरुन रागावुन ,चिडचिड करुन जमत नाही. त्याचबरोबर ग्राहकाच्या वेळेनुसार आपली वेळ जुळवुन घ्यावी लागते,यासाठी ग्राहकाच्या वेळेनुसार आपणास जुळवुन घ्यावे लागते.
४) गुड पिपल स्किल (Good People Skill )आपण ज्याचे फोटो काढणार आहोत तो आपल्याबरोबर मोकळेपणाने वागणे गरजेचे असते, म्हणजे आपणास पाहीजेत त्या पोज सहज मिळतात. आपले काम लवकर होते.
जर हे गुण आपणात नसतील तर आपणात निर्माण करणे आवश्यक आहे नाहीतर यशस्वी होता येणार नाही,

१) फोटोग्राफर 

शैक्षणिक पात्रता:- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक नाहीत.)
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर अभियांत्रिकी व्यवसाय

मित्रांनो या ट्रेडमध्ये आपणास
फोटोग्राफी , कॅमेर्‍याचा ईतिहास लेन्सचे विविध  प्रकार व उपयोग, फोकल लेंथ,पिक्सेलचे प्रकार उपयोग , व्यावसायिक शुटींग व विशेष शुटींगचे तंत्र, नैसर्गिक लाईट, टंगस्टन लाईट, सिंगल आणि मल्टीपल इलेक्टानिक फ्लॅश रिफ्लेक्शन ,एक्सपोशर मीटर, स्टुडिओ फ्लॅश आणि त्यांची उपांगे याबध्दल प्रात्यक्षिक दिली जातात.

डिजिटल व्हीडीओ कॅमेरा, टेप,डीव्हीडी,एचडीडी,व त्यांची  असेसरीज वापरण्यास शिकविले जाते.व्हीडीओ कॅमेरा सीसीटीव्ही आणि स्पाय कॅमेर्‍याने फोटोग्राफी शिकविले जाते. ऑडीओ व्हीडीओ,रेकाॅर्डींग, मिक्सिंग, साऊंड डब्बिंगबाबत ही प्रशिक्षण दीले जाते. DSLR कॅमेर्‍यासोबत शुर्टींगचे विविध तंत्र शिकविली जातात. शाॅट टर्मिनोलाॅजी शिकविली जाते. मल्टीमिडीया तसेच फोटो पोस्ट प्रोसेसिंग साॅफ्टवेअरबाबतही शिकविले जाते. 4 आठवडे विविध स्टुडिओमध्ये ऑन जाॅब प्रशिक्षण दीले जाते.

२)डिजिटल फोटोग्राफर 

शैक्षणिक पात्रता:- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक नाहीत.)
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर अभियांत्रिकी व्यवसाय

फोटोग्राफी , कॅमेर्‍याचा ईतिहास लेन्सचे विविध  प्रकार व उपयोग, फोकल लेंथ,पिक्सेलचे प्रकार उपयोग , व्यावसायिक शुटींग व विशेष शुटींगचे तंत्र, नैसर्गिक लाईट, टंगस्टन लाईट, सिंगल आणि मल्टीपल इलेक्टानिक फ्लॅश रिफ्लेक्शन ,एक्सपोशर मीटर, स्टुडिओ फ्लॅश आणि त्यांची उपांगे याबध्दल  शिकविले जाते.अर्मेटर, शटरची गती, ISO बाबत.लेन्स हुडचा वापर, ट्रीपोड आणि मोनो पोड स्टॅन्ड, फोटोग्राफी मधील  सौदर्याचा  दृढसंवाद, लाईट व त्याचे स्त्रोत.शुटींगचे व्यावसायिक व विशेष तंत्र. फील्टर त्याचे प्रकार व उपयोग.संगणकाबाबतचे ज्ञान , आॅपरेटींग यंत्रणा,इंटरनेट, फोटो सुधारणा ( एडीटींग) चे विविध साॅफ्टवेअर आणि त्यांचा उपयोग , मल्टीमिडीया संगणकामधील मल्टीमिडीया फ्लॅटफार्म , उंपागे आणि सरंचना याबाबत शिकविले जाते. विविध प्रिटींग साधनांचे ज्ञान, प्रिंटरचे प्रकार , फोटो सुधारणा साॅफ्टवेअरची कार्यपध्दती ,त्याचे साधने व त्यांची तंत्र ,स्कॅनरचे विविध प्रकार , कॅपचर कार्ड , एडीटींग आणि कॅपचरिंग पद्धती , कॅमेरा आणि त्याची उंपागे , फोटोग्राफीचे शिष्टाचार , बेसिक नियम ,व्यवसायाचे नितीशास्त्र याबाबतही शिकविले जाते. दृष्टीचिकाटी , व्हीडीओ कॅमेरा आणि त्याचे उपांगे हाताळण्याचे कौशल्य, शुटींगचे टेक्नीक , व्हीडीओग्राफीबध्दल माहीती, डीजिटल कॅमेरा , व्हीडीओ कॅमेरा आणि ड्रोन कॅमेरायांचे  दृष्टीविषयक सरंचना, लाईट व रंगविषयक पायाभुत तत्त्व , लाईटचा दर्जा , लाईटचे गुणोत्तर , लाईट परावर्तनाचा उपयोग , लाईटविषयक विविध लाईटचे उपकराविषयी शिकविले जाते. व्हीडीओच्या कार्यपध्दतीबाबत , त्याच्या तंत्राविषयी , संवादासाठी व्हीडीओचा वापर , व्हीडीओमधील विविध रेकाॅर्डींगची माध्यमे, आवाजाच्या टेक्निकबाबत तसेच विविध मायक्रोफोनचा उपयोग , रेकाॅर्डींग पध्दती , साऊंड मिक्सिंग , एडीटींग , आॅडीओ डबिंगबाबतही शिकविले जाते. व्हीडीओ बाबतच्या लाईटचे ज्ञान , नैसर्गिक स्टुडीओची लाईट उपकरणे , फील्डवरील लाईटची उपकरणे ,लाईटमीटर उपकरणाचा वापर याबाबतही शिकविले जाते. हाय स्पीड शटरचे कार्य , स्वंयमचलित व मानवव्दारा नियंत्रित केले जाणारे फोकसचे कार्य ,रेखीय आणि अरेखीय रेकाॅर्डींगचे एडीटींगच्या उपकरणाविषयीही शिकविले जाते. व्हीडीओ एडीटींगचा सराव , व्हीडीओ साॅफ्टवेअरविषयी शिकविले जाते. दोन  आठवडे विविध लॅब आणि स्टुडिओत प्रात्यक्षिक आणि चार आठवडे प्रोजेक्टवर्क दीले जाते.
प्रशिक्षण झाल्यावर एक एक शिकाऊ उमेदवारी करावी लागते. त्यानंतर NCVT ची परिक्षा , NCVT चे प्रमाणपत्र मिळाल्यावर नोकरीचीसंधी

मित्रांनो दोन्ही ट्रेडनंतर आपणास खालीलप्रमाणे नोकरीची संधी आहे.
१) प्रेस फोटोग्राफर 
विविध वर्तमान पत्रामध्ये बातम्या असतात त्याबातम्यामध्ये काही ठिकाणी फोटोपण असतात. वर्तमानपत्राच्या पेपरवाल्याकडुन फोटोग्राफर ठेवले जातात. त्यास्वरुपाचे काम.
२) Feature Photographer 
या प्रकारात 
वन्यजीवनाची , खेळाची , प्रवासकरुन वेगवेगळे फोटो काढणे , लहान मुलांचे  फोटो काढणेची कामे असतात.
३) कमर्शिअल फोटोग्राफर 
याप्रकारामध्ये एखाद्या जाहीरात विषयक कंपनीत/ ऐजन्सीत  काम, 
४) Portrait & wedding photographer  या प्रकारच्या फोटोग्राफीत लग्नातील फोटो काढणे. लग्नाच्या ऑर्डस् घेऊन काम करणे एखाद्या सभारंभातील फोटो शुट करणे. थोडक्यात स्वत:चा व्यवसाय 
५) जाहीरातविषयक
याप्रकारच्या फोटोग्राफीत जाहीरात करणार्‍या कंपनीत , प्रोडक्टचे फोटो काढणे. प्रमोशन वेळी फोटो काढणे.
६) फॅशन फोटोग्राफर 
यात फॅशन इन्डस्ट्रीत , फील्म इन्डस्ट्रीत  माॅडेलचे  हीरो हीरोईनचे फोटो काढण्याचे काम.
७) Freelance फोटोग्राफर

यात आपल्याला आवडतील ते फोटो काढायचे व नंतर त्या फोटोचे प्रदर्शन भरवुन त्यांची विक्री करायची.
मित्रांनो फोटोग्राफरविषयक माहीती कशी वाटली ते comment box मध्ये नक्की लिहणे.
ITI Admission

टिप्पण्या

  1. 👍👍👌👌उपयोगी माहिती आहे.
    धन्यवाद .

    उत्तर द्याहटवा
  2. ITI che sarve trad disat nahit ple. mahiti taka
    please contact me. mob. 8888745827

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा