मेकॅनिक मोटार वेहिकल ( Mechanic Motor Vehicle )

ITI Admission

मित्रांनो आणि मैत्रिणीनो, 
आज आपल आय. टी .आय.मध्यें  शिकवला जाणारा यांत्रिक मोटार गाडी ( Motor Mechanic Vehicle - MMV) या कोर्सची माहीती पाहणार आहोत.
शैक्षणिक पात्रता :- दहावी पास ( गणित आणि विज्ञान                                               विषय बंधनकारक )
 कोर्सचा कालावधी - २ वर्ष.
                                                                         व्यवसायाचा प्रकार:- बिगर मशीन गट      
                                                                                                            अभियांत्रिकी व्यवसायाचा
                                                                                                                      

मित्रांनो आमच्यावेळी १५-२० वर्षापुर्वी एखाद्याकडे Four Wheeler गाडी असली का त्याचा रुबाब जास्त असायचा. पण आता अशी परिस्थितीत आहे की सोसायट्यांमध्ये गाड्या लावायला जागा नसते. Two wheeler गाडीतर ९० % लोकांकडे असतेच.
या ट्रेडमध्ये  शॉप फ्लोअरवर (काम करायचे ठिकाण) काम करताना  सुरक्षिततेचे महत्त्व आणि सर्वसाधारण खबरदारी, प्रथमोपचार परिचय ,  स्वत:च्या सुरक्षिततेचे साधने यांचा परिचय , आगीचा त्रिकोण ,आगीचे प्रकार, आग विझविण्याची साधने,अपघात होण्याची कारणे. मार्किंग टूल्स , स्क्रियबर , सरफेस  प्लेट, अँगल प्लेट , काटकोण्या , कॅलिपर्स ( इन साईड , आऊट साईड ), डिव्हायडर ,  पंच , पंचचे प्रकार, हॅमर  त्याचे प्रकार आणि प्रकारावरून उपयोग. प्लायर , ऍलन की,  स्क्रूड्राइवर ,पाईप रेँग्ज  या सारख्या हॅन्ड टूल ची माहिती दिली जाते.  

व्हर्निअर कॅलिपर , व्हर्निअर हाईट गेज 
यांचे कार्य तत्त्व, मुख्य भाग , बनावटीचे धातु, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता, माप रिडींगचे कौशल्य ,
आऊट साईड आणि इन साईड  मायक्रोमीटर ,आणि डेप्थ मायक्रोमीटर, डायल बोअर गेज त्यांचे मुख्य भाग , बनावटीचे धातु, कार्याचे तत्त्व, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य, कार्य करताना घ्यायची काळजी आणि देखभाल याचे ज्ञान दीले जाते. डिजिटल मायक्रोमीटरचे वर्णन आणि उपयोग,डायल टेस्ट इंडीकेटरचे कार्य तत्त्व , मुख्य भाग, बनावटीचे धातु, रचणा/ बांधणी ,कार्य पध्दती, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता. माप रिडींगचे कौशल्य,

ड्रीलिंग मशीन :- ड्रीलिंग मशीनचे प्रकार,त्यांचा उपयोग, बेंच ड्रिल मशीन , पोर्टब्ले  ड्रिल मशीनची बांधणी / रचना, मुख्य भाग.  ड्रिल बिट चे प्रकार , ड्रिल होल्डिंग उपकरणे, जॉब होल्डिंग उपकरणे,  रिमर त्याचे प्रकार, टॅप आणि डाय  यांची माहिती ,ड्रीलिंगशी संबंधीत ऑपरेशन्स जसे रिमिंग, बोअरिंग, काऊंटर बोअरिंग, काऊंटर सिकिंग, टॅपिंग याचे उपयोग आणि करण्याचे कौशल्ये ही शिकविली जातात.

या ट्रेड मध्ये इलेकट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याचे प्राथमिक बाबी शिकविल्या जातात. जसे व्होल्टेज ,करंट,रोधक , शक्ती, ऊर्जा , कंडक्टर , इन्सुलेटर , मल्टिमीटर चे महत्व आणि उपयोग. केबल कलर कोड , कपॅसिटर आणि त्याचे उपयोग, सर्सिटचे प्रकार, सेमीशिकविले  कंडक्टर चा तपशील, ट्रान्सिस्टर , UJT  ईद्यादी . 
हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक हि संकल्पना , पास्कलचा नियम, सिंगल ऍक्टिव आणि डबले ऍक्टिव एंडेड सिलेंडर , कॉम्प्रेसर या बाबत शिकविले जाते. 

ऑटो इंडस्ट्री चा इतिहास, या क्षेत्रात झालेली प्रगती , वाहनाचे वजनवरून वर्गीकरण , इंजिनची ओळख , आय. सी. इंजिन म्हणजे काय, २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक इंजिन चे कार्य तत्व , पेट्रोल इंजिनचे बेसिक , या मधील मुख भाग, गॅसोलीन फ्युएल सिस्टिम , इंजिने मधील घटक आणि त्यांचे कार्य. व्हाल्व  , व्हाल्व टाईमिंग डायग्रॅम , पिस्टनचे त्याचे प्रकार , काँनेकटिंग रॉड याचे कार्य, क्रांक शाफ्ट चे तपशील, महत्व , फायरिंग ऑर्डर ऑफ इंजिन म्हणजे काय, इंजिन मध्ये कूलिंग सिस्टिम चे महत्व , या सिस्टिम मधील घटक जसे रेडिएटर , वॉटर पंप , कूलिंग फॅन. लुब्रिकेशन सिस्टिम चे महत्व, या सिस्टिम मधील घटक आणि त्यांचे महत्व या बाबत शिकविले जाते.

डिझेल फ्युएल  सिस्टिम या मधील मुख घटक आणि त्यांचे कार्य जसे फ्युएल इंजेक्टर , इंजेकशन पंप . 
इंजिन सुरु नहोण्याची यांत्रिक आणि विद्युत करणे आणि त्याचे उत्तर याबाबत शिकविले जाते. जड वजनाच्या वाहनातील मुख्य घटकांची माहिती, जसे क्लच आणि मॅन्युअल ट्रान्समिशन , गिअर बॉक्स लेआऊट आणि         ऑ परे शन , गिअर शिफ्ट मेकॅनिझम , स्टीरींग सिस्टिम या सिस्टिम मधील मुख घटक आणि त्यांचे कार्य या बाबत शिकविले जाते. 
व्हील अलायमेन्ट फंडामेंटल विषयी पण यात शिकविले जाते. व्हील अलायमेन्टचे तत्व , व्हील अलायमेन्ट करताना तपासले जाणारे घटक . सस्पेन्शन सिस्टिम याचे तत्व, सस्पेन्शनचे प्रकार,  स्प्रिंग चे प्रकार , त्यांचा तपशील आणि कार्य. शोक अबसॉर्बेरचे प्रकार त्याची कार्य करण्याची पद्धत या बाबत सविस्तरपने शिकविले जाते. 
गाडीची चाके आणि टायर - चाकांचे प्रकार आणि साईज  , रिमची साईज .तसेच चाकाचे टायरचे प्रकार , टायरचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म,   त्याची बांधणी, टायरचे मटेरियल , त्याची साईज  या बाबतही शिकविले जाते.  
ब्रेकिंग सिस्टिम - याचे तत्व , या सिस्टिम मधील मुख्य घटक आणि त्यांचे कार्य. जसे ब्रेक पायडल ,ब्रेक लाईन, मास्टर सिलिंडर , पॉवर बूस्टर किंवा ब्रेक युनिट. अँटी ब्रेकिंग सिस्टिम (ABS ) आणि यतीन घटक , ड्रम ब्रेक आणि यातील घटक आणि त्यांची कार्य पद्धती प्रॅक्टिकली हि शिकविली जाते. 
लाईट सिस्टिम , चार्जिंग सिस्टिम  तसेच गाडीतील वातानूकुलीन सिस्टिम या सर्व सिस्टिम मधील मुख्य घटक, कार्य पद्धती ,या सिस्टिम मधील दोष दूर करण्याचे  कौशल्ये हि शिकविली जातात. 

ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचे परवाना , वाहनांची नोंदणी , वाहतुकीचे नियम , अपघात त्याची कारणे , ड्राइव्हरची जबाबदारी , नियम भंग केलेतंर दंड , गुन्हा, वेगवेगळे अर्ज , वाहतूक विषयक कायदे,  टॅक्स भरणा, टॅक्स नूतनीकरण , इन्शुरन्स चे प्रकार याबाबतची माहितीपण त्यांना शिकविली जाते. 


डीझेल , पेट्रोल या इंधनावर चालविल्या जाणारा 2 Wheeler , 4 Wheeler गाड्यांच्या इंजिनची कार्यपध्दती, इंजिनमधील मुख्य पार्टस् , त्याचे कार्य , रचना याची सर्व माहीती व दुरुस्तीचे कौशल्य यात शिकविले जाते.
कोर्सच्या शेवटी 4 Wheeler गाडी चालविण्याचेही शिकवतात.तसेच गाड्यांमधील Advance Technology             ( तंत्रज्ञाना ) बाबतही शिकविले जाते.

थोडक्यात डिझल आणि पेट्रोल गाडीच्या दुरुस्तीची  कामे करण्याचे   कौशल्ये  या ट्रेडमध्ये शिकविले जाते.
आजकाल या ट्रेडमध्ये मुलीपण प्रवेश घेतात.

हा कोर्स यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायचे असेल तर  Mechanical , Automobile च्या Diploma ला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश. 

नाहीतर एखाद्या गाडी दुरुस्तीच्या कार्यशाळेत किंवा service station मध्ये  एक वर्ष शिकाऊ उमेदवारी.
त्यानंतर NCVT ची परिक्षा.
एकदा का आपणास NCVT चे Certificate मिळाले की ,  नोकरी आहेच 
ITI Admission

नोकरीची संधी :- या कोर्सनंतर S.T. Workshop , ज्या  महापालिकेच्या वाहतुक सेवा आहेत तेथे कार्यशाळेत        ( Workshop ) उदाहरण द्यायचे झालेच तर BEST, PMPT, TMT, NMMT.
नामाकिंत कंपन्याच्या शोरुम मध्ये, Service centre मध्ये. पोलिसांच्या गाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पोलिस खात्याचे Workshop असते त्याठीकाणी , हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये.
अशाच छोट्या मोठ्या कंपन्यामध्ये पण नोकरीची संधी असते.

मित्रांनो खरं सांगायचे तर योग्य मार्गदर्शन मिळाले तर स्व:ताचा Spare Parts चा धंदाही सुरु करु शकता. पण या धंद्यात पैसे जास्त गुंतवावे लागतात.
त्यापेक्षा आपले गॅरेज टाकु शकता. यासाठी आपली जागा पाहीजे असे गरजेचे नाही. Spare Parts च्या दुकाना जवळचं आपण गाडी दुरुस्तीचे काम सुरु करु शकतो. तुम्ही तुमच्या गाडीचे कधी तरी engine oil बदलायला गेल्यावर, ब्रेक सेटींग करायला गेल्यावर नक्कीच असे एखादे गॅरेज पाहीले असेल.

मित्रांनो रस्त्यावर दिवसागणिक गाड्यांची संख्या वाढते आहे. हा ट्रेड  केलेल्याला कामाची कमी नाही.
हा पण मित्रांनो दुरुस्तीचे काम असल्याने हात काळे ( घाण) करण्याची तयारी ठेवली पाहीजे.
प्रशिक्षणाच्या काळात जितके मन:पूर्वक काम शिकणार त्याचा फायदा भविष्यात नक्कीच होणार...
मित्रांनो जर तुम्हाला दहावीला ७०-७५ % च्यावर मार्क मिळाले ( अनुसुचित जाती , जमाती, आणि इतर मागासवर्गीय वर्गाच्या मुलाला ६०-६५ % असले ) तर नक्कीच या Trade चा विचार  करावा. या ट्रेडला मागणी जास्त असल्याने दहावीला जास्त मेरिट / मार्क काढणे आवश्यक आहे.
मित्रांनो जर तुम्हाला भविष्यात धंदा काढायचा असेल मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेन.
यांत्रिक मोटार गाडी या ट्रेड बाबत काही प्रश्न असतील तर comment box मध्ये विचारा 
पुढील भागात यांत्रिक मोटार गाडीआहेत  सारखेच अजून जे ट्रेड आहेत त्यांची माहिती पाहूया ......
ITI Admission

टिप्पण्या

 1. नक्कीच खूप चांगली माहिती आपण समजून सांगितली आहे यामध्ये ... माझा पण MMV हा ट्रेड झाला आहे २०१४-१६ ल पास झालो . वरती दिलेली माहिती ही खरचं चांगली आहे ... कुणाला जरी या ट्रेड बद्द्ल माहिती हवी असेल तर माझ्या mail id वर विचारू शकता . savannejkar3333@gmail.com

  उत्तर द्याहटवा
 2. मनापासून धन्यवाद मला हीच माहीती पाहिजे होती.🙏

  उत्तर द्याहटवा
 3. माहिती खूप चागली आहे .मला हेच पाहिजे होते

  उत्तर द्याहटवा
 4. खुप शान माहिती आहे ही माझा पन 2014-2016 ला झाला आहे

  उत्तर द्याहटवा
 5. माहिती बरोबर आहे पण job भेटनं कठीन आहे,आणि स्वतः काय करायचं म्हंटलं कि आर्थिक आडचनी

  उत्तर द्याहटवा
 6. मी 10 वी.ची परिक्षा दिलि आहे.रिजल्ट आला नही.मी कर्ण बधीर आहे . काही सवलत आहे का? मला हे काम खूप आवडते.
  वाशी, नवी मुंबई ला तुमची शाखा आहे का?

  उत्तर द्याहटवा
 7. डिझेल मॅकॅनिक साठी अ‍ॅडमिशन साठी काय करावे लागेल..

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा