- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
ITI Admission
तारतंत्री ( Wireman ) शैक्षणिक पात्रता:- दहावी अनुत्तीर्ण ( दहावी पास झालेलाही या ट्रेडला पात्र ठरतो. मेरिटनुसार त्याचा विचार आधी केला जातो ) प्रशिक्षणाचा कालावधी :- २ वर्षे व्यवसायाचा प्रकार : - बिगर मशिन गट अभियांत्रिकी व्यवसाय
मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,
जर दहावीला कमी मार्क मिळाल्याने ELECTRICIAN ट्रेडला प्रवेश मिळाला नाही तर नाराज होण्याचे कारण नाही.. या ट्रेडचा अभ्यासक्रम आणि वीजतंत्रीचा अभ्यासक्रम जवळजवळ ८० % सारखा आहे. म्हणून ELECTRICIAN ला तारतंत्री चांगला पर्याय आहे
चला तर या ट्रेडमध्ये काय काय शिकविले जाते ते पाहुया........
या ट्रेडमध्ये आपणास खालील कौशल्य शिकविली जातात.
ट्रेडमध्ये वापरल्या जाणाऱ्या हँड टूल्सची ओळख व उपयोगाबाबत माहीती दिली जाते. विजेचे मूलभूत घटक, इलेक्ट्रॉन सिद्धांत, त्याचे मूलभूत टर्म, व्याख्या. सोल्डर, फ्लक्स आणि सोल्डरिंग तंत्र. प्रतिरोधकांच्या गुणधर्माचे प्रकार. राष्ट्रीय विद्युत कोड २०११ ची माहिती , कंडक्टर, सेमीकंडक्टर याबाबतचा माहीती.
विविध प्रकारचे इन्सुलेटर, वायर आणि केबलचे प्रकार, वायर आणि केबल इन्सुलेशनचे मानक वायर गेजचे तपशील.
सामान्य विद्युत उपकरणे उदाहरणार्थ स्विचेस, दिवा धारक, प्लग आणि सॉकेट. घरगुती सर्किट, टू वे स्विच याबाबत ची माहिती . बॅटरी चार्ज करण्याच्या पद्धती आणि खबरदारीचा उपाय. चाचणी उपकरणे, विविध प्रकारच्या लीड ऑसिड सेल बाबत . रिचार्ज करण्यायोग्य ड्राई सेल , त्याचे फायदे आणि तोटे , लीड ऑसिड सेलचे सामान्य दोष आणि उपाय. सेलची देखभाल आणि दुरुस्ती.
इन्व्हर्टर, बॅटरी चार्जर, UPC चे काम करण्याचे सिद्धांत. अर्थिंगचे तत्व, अर्थिंगकरण्याच्या विविध पद्धती . मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स. डीसी रेक्टिफायर सर्किटचे महत्त्व. मापन यंत्रांची माहिती. विद्युत वायरिंग सिस्टमचे परिचय आणि स्पष्टीकरण. वायरिंग सामग्री आणि त्यांचे तपशील. वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल फिटिंग्ज आणि अॅक्सेसरीजबाबत शिकविले जाते.
एखाद्या कामाचा किती खर्च येईल -अंदाज प्रक्रिया, पी.व्ही.सी. केसिंग आणि कॅपिंग मटेरियल, लाइट पॉइंट्सचा लेआउट या बाबतची माहितीहि सांगितली जाते. दिवा, ट्यूब आणि मर्कूरी आणि सोडियम व्हेपरची कार्यपद्धतीची माहिती सांगितली जाते. उद्योगात वापरल्या जाणार्या विविध प्रकारच्या मोटर्सचे कनेक्शन ,बांधणी व कार्य आणि उपयोग तसेच त्याच्या वायरिंग करण्याच्या पद्धतीबाबतही शिकविले जाते.
कार्यशाळेमध्ये आणि कारखान्यांमध्ये वायरिंग बाबत , व्यावसायिक इमारतीत वायरिंग, त्यांची विशेष खबरदारी आणि देखभाल. मीटर बोर्ड लावण्याची आणि कनेक्शन घेण्याची सामान्य कल्पना दिली जाते.
ITI Admission
डी.सी. जनरेटर आणि त्याचे कार्य तत्त्व, प्रकार आणि डीसी जनरेटरची वैशिष्ट्ये. डीसी मोटर्स सिद्धांत व कार्यपध्दतीबाबत , स्टार्टरची गरज. तत्त्व आणि अल्टरनेटरचे काम. AC सिंगल फेज मोटर्स. थ्री फेज इंडक्शन मोटर. त्याचे तत्व आणि कार्यपध्दतीबाबत , स्टार्टरचे प्रकार. ट्रान्सफॉर्मर्सची बांधणी आणि कार्यपध्दत. ट्रान्सफॉर्मरसंबंधित काम , वीज निर्मिती आणि त्यांचे प्रकार , सबस्टेशनची उपकरणे, सबस्टेशनचे प्रकार याबाबतहि शिकविले जाते. पॅनेल बोर्ड बद्दल माहिती व त्याचे महत्त्व आणि देखभाल करण्याचे फायदे, घरगुती आणि औद्योगिक वायरिंगमधील सामान्य दोष, कारणे आणि उपाय याबाबतहि या ट्रेडमध्ये कौशल्य शिकविले जातात.
तसेच संगणकाची माहीतीही जसे पीसीचे मुख्य भाग , की बोर्ड, माऊस , प्रिंटर ,स्कॅनर ,कॅमेरा ,मॉडेम ,बाहेरील माहिती स्टोर करण्याचे उपकरणे , आणि युपीसी ऑपरेटिंग सिस्टिम , इंटरनेट विषयीही शिकविले जाते. अजून यात जोडारी ( FITTER ) या ट्रेड विषयी जसे कि , करवत ,ब्लेड त्याचे प्रकार आणि स्पेसिफिकेशन , हातोडीचे प्रकार आणि उपयोग , चीझल , मार्किंग आणि होल्डिंग टूल त्यांची देखभाल आणि दुरुस्ती . ड्रिल बिटचे प्रकार ड्रिल मशीनचे प्रकार , त्यांचा योग्य वापर , देखभाल आणि दुरुस्ती तसेच सुतार कामातील हत्यारे यांचेविषयीपण शिकविले जाते.
मित्रांनो, थोडक्यात या ट्रेडमध्ये विजेबाबतचे मुलभूत ज्ञान दिले जाते. यामुळे आपण घरातील ,दुकानातील, कार्यालयातील , व्यापारी संकुलातील वायरिंगचे काम करु शकतो. वायरिंग मधील दोष दुर करु शकतो. विजेवर चालविली जाणार्या उपकरणाची जोडणी करु शकतो.
प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यावर एक वर्ष शिकाऊ ऊमेदवारी त्यानंतर NCVT ची परिक्षा. परिक्षेत पास झाल्यावर नोकरी करण्यास तयार
नोकरीची संधी:-
सरकारी नोकरीसाठी भेल (BHEL), GAIL, SAIL या सारख्या कंपनीत.
संरक्षण विषयक आस्थापना, शिक्षण क्षेत्रात सदर विषयाचा शिक्षक, विज निर्मितीच्या कंपनीत. इंडियन ऑईल कंपनीत.
खाजगी क्षेत्रात :- खाजगी वीज निर्मितीच्या कंपनीत ( टाटा , जिंदाल, बेस्ट ) , एखाद्या कंपनीत वायरमन , सोलार पॅनल लावणाऱ्या कंपनीत, व्यापारी संकुलात ( मॉल ) विजेसंबंधित देखभालीची आणि दुरुस्तीच्या कामासाठी , इलेक्ट्रिकल उपकरणे निर्माण करणाऱ्या कंपनीत.
स्वतः चा व्यवसाय म्हणून.......
1) घरातील वायरिंग व औद्योगिक तारांची बांधणी आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये डिस्को लाइटिंगची बांधणीची कामे तसेच दुरुस्तीची कामेहि करू शकतो.
2) लाइनवर ट्रान्सफॉर्मरचे तेल शुध्दीकरण स्वत: ची विद्युत कार्यशाळा सुरु करु शकतो.
ITI Admission
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
Prajwal
उत्तर द्याहटवावायरमन ट्रेड केलानंतर विजतंत्री ट्रेड प्रमाणे पुढे शिकायचे असल्यास डिप्लोमा ला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळु शकतो काय ?
उत्तर द्याहटवामिळतो ना
हटवाYes
हटवा10 वी पास विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा 2 nd इअर ला प्रवेश मिळत नाही. त्यासाठी विद्यार्थी 12 वी सायन्स असावा लागतो. तरच 2 nd इअर ला एडमिशन मिळते...
हटवामाझी 12th झाली आहे मला 12th पेक्षा 10th ला गुण जास्त आहे तर मी कोणत्या बेस वरती अप्लाए करु
उत्तर द्याहटवा10th
हटवाpemeaint kiti aste
हटवासर मी 2007 वायरमन ट्रेड चे प्रशिक्षण पूर्ण केले आहे मी पाहिले चांश मध्ये फेल झालो होतो नतर मी मुबई येते जॉब ला गेलो अनी मला काही कारणास्तव परत येता अल नाही तर मला नवीन परीक्षेला बसता यईल का
उत्तर द्याहटवाआय.टी.आय. मधील परिक्षेचे स्वरुप यात स्पष्टपणे लिहीले आहे की पाच चान्समध्ये परिक्षा पास होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर आपले रजिस्टेशन रद्द होते.
हटवाIti नंतर काय करावे
उत्तर द्याहटवानोकरी ची संधी काशी मिळेल
उत्तर द्याहटवासर माझी 12th arts मधूण झाली आहे मला पाॅलटेकणीक ला अॅडमीशण मीळेलका जर नसेल जमत तर 10th वरती मीळेल का
उत्तर द्याहटवाआपणास दहावी बेसवरच डिप्लोमाला अॅडमिनश घ्यावे लागेल.
हटवाKhrch iti kelyane khup fayda hoto .......maza electrician madhe iti complete zala aahe so me atta pune la apprentiahip kartoy so khrch khup shikayla milt ete .......iti nantr aplyala jyaveli compnay madhe kam karav lagt tyaveli aplyala kamach swarup kam kas karaych ani tymadhil dosh kase shodaych he samjl pahije
उत्तर द्याहटवाआय.टी.आय.मधील सर्वच ट्रेड चांगले आहेत. फक्त संबंधीत ट्रेडमधील कौशल्यै skill शिकताना आपण प्रामाणिकपणे शिकणे आवश्यक आहे. दीलेल्या commentबध्दल धन्यवाद आहे.
हटवा
हटवाMi jar iti kela tar mala mscb mathe job melel Kay sir
हो, का नाही ?
हटवाHo
हटवाखुप छान
उत्तर द्याहटवाSir
उत्तर द्याहटवाHe Delhi board ahe ka
S
उत्तर द्याहटवा