प्रवेश प्रक्रीयेतील टप्पे

ITI Admission 
मित्र आणि मैत्रिणींनो 
काल दहावीचा निकाल प्रसिध्द झाला. आपण आपले निकालपत्र पाहीले असेलच. यावर्षीचा दहावीचा निकाल ९५% लागला आहे,आणि आपल्यापैकी जास्त जण या वर्गवारीतच असणार आहात म्हणुन प्रथम आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

जे या वर्गवारी नसतील ते नाराज असणारच, आपण अभ्यासात कुठे तरी कमी पडलो हे सत्य स्विकारावेच लागणार, तरी निराश होऊन चालणार नाही, कारण थांबला तो संपला ही म्हण आपणास माहीत आहेच. आय.टी.आय.मध्ये असेही काही ट्रेड आहेत जे दहावी नापास या शैक्षणिक पात्रतेचे आहेत आणि मार्केटमध्ये या ट्रेडला चांलली मागणी असते जसे गंवडी,नळकारागिर,पत्रेकारागिर,वेल्डर , तारतंत्री , ड्रेस मेकिंग, सुईंग टेकनॉलॉजि,सरफेस ऑर्नामेंटेशन टेकनिक ( भरतकाम ), सुतारकाम ,

जे चांगल्या मार्कांनी पास झाले आहेत त्यांना सर्व दीशा मोकळ्या आहेत. आपल्या आवडीप्रमाणे अकरावी बारावी, डिप्लोमा किंवा आय.टी.आय.मध्ये मनाजोगा ट्रेड मिळु शकतो.आय.टी.आय.चे स्वरुप यामध्ये मी आधीच सांगितले आहे की, 
आय.टी.आय.मध्ये प्रवेश हा सर्वस्वी तुम्हाला मिळालेल्या मार्कांवरच ( मेरिट )मिळतो, म्हणुन कोणाच्या आमिषाला बळी पडु नका.
ऑनलाईन प्रवेश सुरु करण्या मागचा हेतु हाच मुळी पारदर्शकता आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाबरोबर महिलाही वावरल्या पाहीजेत म्हणुन सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक ट्रेडमध्ये मुलींना ३०% जागा राखीव आहेत. मुली आपल्या आवडीनुसार एखाद्या मशीन गटीतील ट्रेडपण निवडु शकतात.

चला तर आज आपण प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे पाहू  या...
माहितीपुस्तिका 
१)  आय.टी.आय.च्या पहिल्या टप्प्यानुसार आय.टी.आय.च्या प्रवेश प्रक्रियेतील नियमावली, प्रवेश पध्दती आणि विविध स्तरावर करावयाच्या कार्यवाही बाबत प्रमाणित नियमावली उपलब्ध करुन दीली आहे. सदरची नियमावली आपणास प्रवेश संकेतस्थळावर आणि आय.टी.आय. मध्ये माहीतीपुस्तिका ठेवल्या आहेत त्यातुन नियम वाचावेत. 
२) आय.टी.आय. मध्ये प्रवेश घेऊ ईच्छुणार्‍या उमेदवारांनी आणि त्यांच्या पालकांनी या माहीतीपुस्तिकेतील नियमांचा अभ्यास करुनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा.
प्रवेश अर्ज 
प्रवेश अर्ज  ऑनलाईन प्रवेशासाठी http://admission.dvet.gov.in या संकेत  स्थळावर भेट द्यावी. ऑनलाईन प्रवेश अर्जात आपली प्राथमिक माहीती भरल्यानंतर
उमेदवाराचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा नोंदणी क्रमांक हाच आपला User ID म्हणुन तयार होईलव आपणास पासवर्ड ठेवण्यास सांगितले जाईल. नंतर आपल्या प्राथमिक मोबाईल नंबरवर मेसेजच्या रुपात तुमचा Registration no.(User ID) आणि पासवर्ड येईल. हा मेसेज व्यवस्थित जपुन ठेवावा.
रजिस्टर नंबर / युजर आयडीचा वापर करुन  आपला प्रवेश खाते उघडल्यावर आपल्याकडील कागदपत्रांच्या आधारे प्रवेश अर्जात सर्व माहीती काळजीपुर्वक भरावयाची आहे. प्रवेश अर्ज पुर्ण भरल्यावर पुन:च्छ एकदा खात्री करावी की, आपण भरलेली सर्व माहीतीबरोबर आहे.

३) प्रवेश अर्जातील माहीती बरोबर असल्याची खात्री करुन प्रवेश अर्ज शुल्क ऑ नलाईन स्वरुपात जमा करावे. फक्त ऑ नलाईन अर्ज करुन चालणार नाही तर आपला अर्ज conform करणे आवश्यक आहे , नाहीतर आपण प्रवेश प्रक्रीयेतुन बाद होउ शकता. आवश्यकता वाटत असेल तर अर्जाची प्रिंट काढुन ठेवणे.  प्रवेश अर्ज निश्चित करताना पुन्हा एकदा अर्जातील माहीती वाचुन घ्यावी कारण प्रवेश अर्ज कन्फर्म झाल्यानंतर कोणत्याच माहीतीत बदल करता येत नाही. हा पण प्रवेश अर्जातील काही निवडक माहीतीबदल करण्याची संधी " हरकत नोंदविणे" या कालावधीत उपलब्ध करुन दीली जाते. पण आपल्यावरही वेळच येवु देऊ नका.
ITI Admission
पहिल्या प्रवेश फेरीतील विकल्प सादर करणेबाबत
४) ऑ नलाईन शुल्क भरुन आपला प्रवेश अर्ज  conform केल्यावर पहिल्या प्रवेश फेरी साठी व्यवसाय (Trade) व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड व्दारे प्रवेश log in करुन सादर करावेत.(यासाठी maha iti  हा app डाउनलोड करुन ठेवा, हा ऑ प तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत मोलाची मदत करेल.) 

 प्राथमिक गुणवत्ता यादी तपासणे व हरकती नोंदविणे.
५)प्राथमिक गुणवत्ता  यादी संकेत स्थळावर प्रसिध्द केली जाईल व याबाबत आपणास मोबाईलवर मेसेजव्दारे कळविले जाईल.
६) जर आपणास आपल्या अर्जातील निवडक माहीती बदल करावयाचा असेल तर सदर साईडवर जाउन आपल्या खात्यावर log in  करुन अर्जातील माहीतीत आवश्यक बदल करावेत. यानंतर आपणास प्रवेश अर्जात कोणताच बदल करता येणार नाही. उमेदवारांना आय.टी.आय.मध्ये प्रवेश निश्चित करताना अर्जात भरलेल्या माहीतीच्या खरेपणासाठी आवश्यक कागदपत्रे आय.टी.आय.मध्ये सादर करणे अनिवार्य राहील. जर आपल्या अर्जातील माहीती आणि कागदपत्रातील माहीतीत विसंगती आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येईल, म्हणुन अर्जातील सर्व माहीती कागदपत्रातील नोंदीप्रमाणे काळजीपुर्वक नोंदवा.

प्रवेश प्रक्रियेत निवड आणि प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही:- 
७)  प्रवेश फेरीसाठी संस्था(आय.टी.आय,)व व्यवसाय निहाय निवडयादी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल व आपणास मेसेजव्दारे कळवीले जाईल.

८) पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनीसर्व मुळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहुन प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावयाची आहे

 पुढील प्रवेशफेरीसाठी  विकल्प सादर करणे.
९) निवड न झालेल्या व प्रथम फेरीला मनाजोगा ट्रेड न मिळाल्याने प्रवेश न घेतलेल्ल्या उमेदवारांनी पुढील फेरीसाठी Online पद्धतीने ट्रेड व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करावेत. एखाद्या उमेदवाराने नविन विकल्प न भरल्यास पुर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेशप्रक्रीयेत लक्षात घेतले जातील.दुसरी, तिसरीआणिचौथी फेरीबाबत मुद्दा ७ ते ९ प्रमाणेच कृती केली जाईल.

 नव्याने अर्ज करणे:- 
१०)  दहावी पुरवणी परिक्षेत उत्तीर्ण / अनुत्तीर्ण व आतापर्यंत कोठेही प्रवेश मिळालेला नाही तसेच आय.टी.आय.मध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही अशा उमेदवारांना प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी समुपदेशन फेरीपुर्वी नव्याने अर्ज करण्याची आणि प्रवेश अर्ज शुल्क भरुन अर्ज निश्चित करणे (कन्फर्म) साठीही सुवर्णसंधी देण्यात येईल.

शासकिय व खाजगी आय.टी.आय.साठी समुपदेशन फेरीसाठी नाव नोंदणी 
११) नोंदणीकृत उमेदवारांनी आय.टी.आय. निहाय व ट्रेडनिहाय जागांचा अभ्यास करुन समुपदेशन प्रवेशफेरीसाठी प्रवेश घेऊ ईच्छीणार्‍या शासकिय अथवा खाजगी आय.टी.आय.मध्ये व्यक्तीश: हजर राहून समुपदेशन फेरीसाठी सकाळी ८:०० वाजेपासुन दुपारी ३:०० वाजेपर्यंत हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे.

समुपदेशन फेरी:- 
सदर फेरीसाठी हजर असणार्‍या उमेदवारांना राज्यस्तर गुणवत्ता क्रमांकाप्रमाणे समुपदेशन करिता बोलविण्यात येईल. संबंधित संस्थेत प्रवेशाकरिता उपलब्ध जागा , उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता (शैक्षणिक पात्रता ) या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल.निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मुळ कागदपत्रे संबंधित संस्थेत पडताळणीसाठी सादर करुन त्याच दीवशी प्रवेश निश्चित करावा.

संस्थास्तरावरील प्रवेश:- 
खाजगी संस्थेमध्ये संस्थास्तरावरील जागा व पाचव्या प्रवेशफेरी नंतर रिक्त राहीलेल्या जांगावर ज्या उमेदवाराची प्रवेश घेण्याची ईच्छा आहे त्यांनाही त्यांची तपशिलवार माहीतीसह प्रवेश संकेत स्थळावर नोंदणी करावी लागेल. नोदंणीकृत उमेदवारांनी ज्या खाजगी संस्थेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्या संस्थेत व्यक्तीश: हजर राहुन सर्व मुळ प्रमाणपत्रे पडताळणीनंतर प्रवेश प्रक्रीया पुर्ण करावी. केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या पहील्या फेरीपासुन ते प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यत खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संस्था स्तरावरील जागांवर उमेदवारांना प्रवेश घेता येतील.

दिनांक १ ऑगस्ट पासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. 
ITI Admission

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा