वेल्डर ( संधाता ) Welder


ITI Admission
वेल्डर ( WELDER )      
  
शैक्षणिक पात्रता :- दहावी अनुत्तीर्ण (नापास)   दहावी पास झालेलाही या ट्रेडला प्रवेश घेऊ शकतो. मेरिटनुसार दहावी पासला प्रथम प्राध्यान दिला जातो.
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- मशीन गट 
                                 अभियांत्रिकी व्यवसाय
  मित्रांनो,
वेल्डींग म्हणजे दोन सारख्या धातुंना उच्च तापमानापर्यत गरम करुन तिसर्‍या धातुच्या सहाय्याने जोडण्याची प्रक्रिया होय. 
पुर्वीच्या काळी लोहार कामाच्या सहाय्याने दोन धातु जोडले जात. पण वेल्डींगचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने बरीच प्रगती झाली आहे. प्रत्येक उद्योगात / क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर वेल्डींगची आवश्यकता भासतेच. औद्योगिक विकासाच्या प्रक्रीयेत वेल्डींगचे योगदान महत्त्वाचे आहे. 
चारचाकी दोनचाकी गाडी किंवा साधी सायकल यात ही वेल्डींगचा वापर होतो. 
रेल्वेचे डब्बे बनविण्याचे काम, 
जहाज निर्मितीच्या कामात.
हवाई जहाज निर्मितीच्या कामात.
सुरक्षा मंत्रालयाच्या आयुध निर्मितीच्या कारखान्यात  तोफा, रणगाडे, पाणबुड्या, युध्दनौका निर्मितीच्या कामात.
धरणे , पुल बांधणीची कामे. 
घरातील कार्यालयातील धातुची फर्निचर निर्मितीच्या कामात.
मोठ मोठे कारखाने उभारणीच्या कामात.
कृषि उद्योगातील उपकरणे, अवजारे निर्मितीची कामे. 
गृहनिमार्ण क्षेत्रातही वेल्डींगशिवाय कोणतीही ईमारत पूर्ण होऊच शकत नाही. 
प्रत्येक क्षेत्रात वेल्डींग तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे.

थोडक्यात जरी हा ट्रेड दहावी नापाससाठी असला तरी हा ट्रेड महत्त्वाचा आहे. बाजारात या ट्रेडलापण खुप मागणी आहे. 
तर चला या ट्रेडमध्ये काय शिकविले जाते ते पाहुया....

वेल्डिंग प्रक्रियेबाबत परिचय आणि विविध व्याख्या आणि त्याचा उपयोग. आर्क आणि गॅस वेल्डिंग म्हणजे काय ?  आणि त्यांची व्याख्या.  धातूची जोडणी करण्याच्या पद्धतींची भिन्न प्रक्रिया उदा. बोल्टिंग, रिवेटिंग, सोल्डरिंग, ब्रेझिंग, सीमिंग इ. वेल्डिंग जोड त्याचे उपयोग आणि  प्रकार.
शील्ड मेटल आर्क वेल्डिंग आणि ऑक्सी-एसिटिलीन वेल्डिंग आणि कटिंग मधील सुरक्षा खबरदारी बाबत शिकविले जाते.    कडा तयार करणे आणि वेगवेगळ्या जाडीसाठी फिट.  पृष्ठभाग साफसफाईची पद्धत याबाबत शिकविले जाते. 
आर्क वेल्डिंग आणि त्या संबंधित विद्युत अटी आणि मूलभूत वीजेचा उपयोग याविषयी सांगितले जाते.  उष्णता आणि तापमान आणि वेल्डिंगशी संबंधित माहिती. आर्क वेल्डिंगचे तत्व आणि त्याचे वैशिष्ट्ये.  वेल्डिंग आणि कटिंग, ज्वालाचे तापमान आणि वापरण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सामान्य वायू बाबत शिकविले जाते.  ऑक्सी- एक्सिटीलीन ज्वाला आणि वापर याबाबत सांगितले जाते. ऑक्सी- एक्सिटिलीनसाठी वापरली जाणारी  कटिंग उपकरणे तत्त्व मापदंड आणि उपयोग. आर्क वेल्डिंगचे  उर्जा स्त्रोतट्रान्सफॉर्मर, मोटर, जनरेटर सेट, रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर  वेल्डिंग मशीनचे प्रकार आणि त्याची देखभाल आणि दुरुस्ती  याचे कौशल्यही दिले जाते.  
एसी आणि डीसी वेल्डिंग मशीनचे फायदे आणि तोटे याविषयी शिकविले जाते. वेल्डिंग पोझिशन्सचे प्रकार.  वेल्ड उतार आणि फिरविणे याचे कौशल्यही शिकविले जाते. वेल्डिंगसंबंधीत विविध  चिन्हे, आर्क लेन्थचे प्रकार आणित्यांच्या प्रभावाबाबत सांगितले जाते. पोलाॅरिटी त्याचे प्रकार आणि उपयोग  वेल्डींगची  गुणवत्ता तपासणी, सामान्य वेल्डिंगमधील  चुका /दोष आणि चांगल्या आणि सदोष वेल्डचे स्वरूप याबाबतचे कौशल्य दिले जाते.  अ‍ॅसीटीलिन गॅसचे गुणधर्म आणि निर्मिती पद्धत.  ऑक्सिजन वायू आणि त्याचे गुणधर्म याबाबत शिकविले जाते. हवा द्रवरूप  ऑक्सिजनचे उत्पादन  ऑक्सिजन आणि एसिटिलीन वायूंची चार्ज प्रक्रिया  वेगवेगळ्या गॅस सिलिंडरसाठी रंग कोडिंगबाबतचे ज्ञान दीले जाते.  गॅस रेग्युलेटर त्याचे प्रकार आणि वापरा विषयी शिकविले जाते.  आर्क वेल्डींग आणि गॅस वेल्डिंग यांचे तंत्र आणि पद्धतींमध्ये असलेले फरक याबाबत शिकविले  जाते.  आर्क वेल्डिंगचे पध्दतीतील दोष, कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत शिकविले जाते. 
ITI Admission
विविध प्रकारचे पाईप पाईप्सचे तपशील, पाईप जोड, पाईप वेल्डींग करण्याच्या विविध पोझीशन आणि प्रक्रीया याचे कौशल्य शिकविले जाते.पाईप वेल्डिंग आणि प्लेट वेल्डिंग दरम्यान फरक.  विविध सांध्यासह पाईप डेव्हलोपमेंट याचे कौशल्य दिले जाते.  गॅस वेल्डिंग फिलेट रॉड्स, त्याचा तपशील आणि आकार याबाबत शिकविले जाते.  गॅस ब्रेझिंग आणि सोल्डरिंग.  यांचे तत्त्व आणि त्याच्या वापराचा प्रवाह प्रकार.  गॅस वेल्डिंगचे दोष, कारणे आणि उपाय याविषयी शिकविले जाते. 
इलेक्ट्रोडचे प्रकार  फ्लक्सचे कार्य, कोटिंगचे घटक, इलेक्ट्रोडचे आकार,  कोटींग आणि  साठा करण्याबाबतचे ज्ञान दीले जाते.  विशेष हेतूसाठी वापरले जाणारे  इलेक्ट्रोड व त्यांचा उपयोग. 
विविध धातू आणि त्याचे गुणधर्म आणि वेल्डिंग करण्याच्या पद्धती उदा.  स्टील, धातूंचे मिश्रण स्टील, पितळ, तांबे आणि ऑल्युमिनियम आणि त्याचे धातु, लोखंड. या बाबत शिकविले जाते.  वेल्डिंग तपासणी पद्धतींचे प्रकार.
गॅस मेटल आर्क वेल्डिंगची ( GMAW) ओळख, त्याचे उपकरणे, त्याचे फायदे आणि मर्यादा.  गॅस मेटल आर्क वेल्डिंगची विविध प्रक्रिया.  गॅस मेटल आर्क वेल्डिंगसाठी धातूच्या विविध जाडीची कडा  तयार करणे  याचे दोष, कारणे आणि उपाय. याबाबतचे कौशल्य शिकविले जाते. सबमर्ज वेल्डिंग ( पाण्यातील वेल्डींग) ची प्रक्रिया, त्याचे तत्व, उपकरणे, फायदे आणि मर्यादा याविषयीही शिकविले जाते.   प्लाझ्मा आर्क वेल्डिंग आणि त्याची कटिंग प्रक्रिया.  त्याची उपकरणे आणि ऑपरेशनचे तत्त्व.  प्लाझ्मा आर्क वेल्डिंगचे प्रकार आणि त्याचे फायदे आणि उपयोग याचे ज्ञानही दिले जाते.
वेल्डिंग कोड आणि मानके.  असेंब्ली ड्रॉईंगचे वाचनTIG आणि MIG वेल्डिंगबाबतचे कौशल्यही शिकविले जाते. वेल्डींगच्या कामाची किंमत  काढण्याचे( Work  Estimate ) कौशल्यही शिकविले जाते.

सदरचा एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर एखाद्या कारखान्यात एक वर्ष शिकाउ उमेदवारी. त्यानंतर NCVT ची परिक्षा आणि परिक्षेत पास झाल्यानंतर NCVT Certificate. त्यानंतर नोकरी....

नोकरीची संधी:-
सरकारी नोकरी   भारतीय रेल्वेच्या कार्यशाळेत  , मेट्रोच्या प्रकल्प उभारणीच्या कामाच्या ठीकाणी, सुरक्षा  मंत्रालयाच्या आयुध निर्मितीच्या कारखान्यात , डॉकयार्ड मध्ये जहाज निर्मितीच्या ठिकाणी. इसरोमध्ये . एस.टी. महामंडळाच्या कार्यशाळेत., पॉवर प्लांट मध्ये. 

खाजगी नोकरी सायकल निर्मितीच्या कारखान्यात, वाहन निर्मितीच्या कारखान्यात , विमान निर्मितीच्या कारखान्यात , बिल्डिंग निर्मितीच्या कंपनीत , स्टील निर्मितीच्या उद्योग क्षेत्रात,  धरणे , पूल निर्मितीच्या ठिकाणी.  लोखंडी फर्निचर निर्मितीच्या कंपनीत. कृषी उद्योग संबंधित अवजारे बनविण्याच्या कंपनीत, पाईप निर्मितीच्या कारखान्यांत,सिमेंट कारखान्यात,ऑईल रिफायनरी उद्योग क्षेत्रात,कोळसा खाणीच्या ठिकाणी.  

सदर ट्रेडचा ४-५ वर्षाचा अनुभव झाल्यावर आपण दुबई येथे नोकरीसाठी जाऊ शकतो. कारण या ट्रेडला दुबईत जास्त मागणी असते. 

मित्रांनो, आपण स्वतःचा व्यवसायही सुरु करू शकतो. ग्रिलची कामे. सेफ्टी दरवाजे या सारखी छोटी मोठी कामे मिळू शकतात. 
ITI Admission

टिप्पण्या

  1. सरकारी नोकरी साठी किती मेरीट लागते

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान माहिती दिली धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. माझा वेल्डर हा ट्रेड 2015-2016मध्ये पुर्ण झाला आहे मला बाहेर देशात जायचे आहे .त्या बद्दल मार्गदर्शन करा.मो.7798537790

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा