- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
ITI Admission
सुतारकामशैक्षणिक पात्रता :- दहावी पास
( गणित आणि विज्ञान बंधनकारक नाही.)
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट
अभियांत्रिकी व्यवसाय
मित्रांनो ,
आपल्या घरात काही लाकडाची वस्तु बनवायची किंवा दुरुस्त करायची झाली तर आपल्या नजरे समोर दिसते ती सुतारकाम करणारि व्यक्ती. या व्यवसायातील कारागिराला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
सुतारकाम हा बांधकाम उद्योगात बहुमुखी व्यवसाय आहे. सुतार सहसा बरीच वेगवेगळी कामे करतात. उदाहरणार्थ, काही कारागीर ऑफिस इमारतींचे इन्सुलेशन करतात आणि काही घरात वाॅलरोप किंवा किचन कॅबिनेट बसवतात.
काही सुतार ईमारती किंवा पूल बांधण्यात मदत करतात ते बहुतेक वेळा सिमेंटच्या पायथ्यासाठी किंवा खांबांसाठी (बीम ,काॅलम आणि स्लॅबसाठी) लाकडी काँक्रीटचे फॉर्म लावण्याची कामे ,मचाण, पुल किंवा गटार , बोगदा आधारासाठी काँक्रिटचे फाॅर्म बनविण्याचे काम करतात आणि म्हणून त्यांना खडबडीत सुतार या नावाने ओळखले जाते.
मित्रांनो या व्यवसायात मराठी माणुस फार कमी प्रमाणात दीसतात. त्यामुळे ईच्छा नसतानाही आपल्या घरातील कामासाठी गैरमराठी माणसास बोलविले जाते. तर चला कमी भांडवलात सुरु करता येणार्या ट्रेडमध्ये नक्की काय शिकविले जाते ते पाहु या....
ईमारतीच्या लाकडाचा परिचय, लाकूडांच्या झाडाची वाढ, बाह्य वृक्षाच्या खोडाचा क्रॉस-सेक्शन, झाडाचे प्रकार, झाडाचे वेगवेगळे भाग, मऊ व कठोर लाकूड, त्यांचे फरक,
सामान्य भारतीय ईमारती लाकूडातील दोष, लाकूडांचे रोग, गाठ, याविषयी शिकविले जाते.
सुतारकामातील हत्यारे / साधने, त्यांचे वर्गीकरण आणि मार्किंग, वर्क होल्डिंग डिव्हाइसेसचा वापर
मोजमापाची साधने आणि तपासणीची साधने, बेंच वाईस आणि त्यांच्या वापराचे प्रकार, वेगवेगळ्या करवती आणि त्यांच्या वापराची ओळख तसेच ,विजेवर चालणार्या करवती आणि त्याचा वापर आणि ओळख.
कॉम्पस सॉ, कॉपिंग सॉ, धनुष्य सॉ, फ्रेट सॉ सारख्या विशेष करवती/ आरीचा प्रकार आणि त्याचा वापर याबाबत शिकविले जाते. करवतीला धार करण्याच्या पध्दती आणि धार लावण्याची साधने.
पोर्टेबल ड्रिल मशिनची माहीती, ड्रीलचे प्रकार , साईज आणि त्याचे मुख्य भाग आणि त्याच्या भागाचे कार्य याबाबत शिकविले जाते. काटकोन्याचा तपशिल, साईज आणि उपयोगाबाबतची माहीती दिली जाते.
लाकूड कामात वापरले जाणारे वेगवेगळे रंदे आणि त्यांचा योग्य उपयोगासाठी वापरावयाचा प्रकार , वर्णन, कार्य आणि त्याचे आकार, सेटिंग, त्यांना धार करण्याची साधने आणि उपयोग तसेच मार्किंग गेज वापरण्याचे ज्ञान दीले जाते.
लाकडाचा सपाटपणा मोजण्याचे साधने, कटरला धार करताना दीले जाणारे ऑगल , आधुनिक तंत्रज्ञानात विजेवर चालणारा पोर्टेबल रंद्याचे महत्त्व, चिझलचे विविध प्रकार आणि त्यांचे उपयोग, त्यांना धार करण्याचे महत्त्व आणि पध्दतयाबाबत शिकविले जाते. फाईल (कानस) चे विविध प्रकार व त्यांचा उपयोग तसेच त्यांची निगा राखण्याचे, वर्क बेंच , वर्क हुक आणि वर्क टेबलचा उपयोग याबाबत शिकविले जाते.
ईमारतीच्या लाकडाचे सिजनिंग , त्याची व्याख्या, फायदे, अपाय , ईमारतीच्या लाकडातील आर्द्रतेचे प्रमाण, लाकडाची वैशिष्ट्ये, लाकूडचे भौतिक आणि यांत्रिक गुणधर्म , चांगल्या लाकडाचे गुण याबाबत शिकविले जाते.
लाकडाचे ज्वाईंटस् चे वर्गिकरण स्पष्ट केले जाते. वेगवेगळ्या ज्वाईंटस् बाबत , फ्रेमिंग ज्वाईंट, अँगल ज्वाईंट आणि लांबलचक ज्वाईंटचा उपयोग , हाऊसिंग ज्वाईंटची व्याख्या, त्यांचा वापर, डोव्हेटेल टेम् वापर करते. वेगवेगळ्या डोव्हेटेल ज्वाईंटचे वर्णन आणि त्यांचे कार्य ,डोवेटेल ज्वाईंटचे महत्त्व आणि उपयोग, लाकडाची जपणुक , जपणुक करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आणि त्यांच्या प्रक्रियेच्या प्रत्येक उपचाराच्या विविध प्रकारच्या संरक्षणाची प्रक्रिया याबाबत सांगितले जाते याबाबत तपशिलवार सांगितले जाते.
गोंद ,फेविकाॅल त्याचा वापर , चिकटविणेचे प्रकार ,वापरण्याचे प्रकार. डोव्हल अॅप्लिकेशनची पद्धत. जास्त लांबीचे ज्वाईंटचे वर्णन, त्याचे प्रकार. वेगवेगळ्या लांबीच्या जोड्यांचा वापर. दोन टॅपर वेजचे सेटिंग. टेबल स्कार्फ ( टोकाच्या) जॉइंटचे तोटे. याविषयीची माहीती दीली जाते
ITI Admission
प्लायवुडचे प्रकार. प्लायवुडचे फायदे. प्लायवुड, ब्लॉक बोर्ड, लॅमिनेटेड बोर्ड, इन्सुलेशन बोर्ड, मायका याचे फायदे. पोर्टेबल डिस्क सॅन्डर मशिनचे मुख्य भाग आणि , वापर व त्याची निगा आणि देखभाल.
लाकडी पार्टीशन करण्याची पद्धत. दरवाजाची चौकट, दरवाजा आणि खिडकीचे पॅनल. स्टूलसाठी आवश्यक असलेल्या लाकडाचा अंदाज. स्टुल बनविण्याच्या क्रियांच्या क्रमाची यादी खरण्याचे कौशल्य दीले जाते.
फर्निचरच्या कामात वापरल्या जाणार्या लाकूडाच्या प्रकाराचे वर्णन जसे साल, सागवान, गामर, पिन, देवनार इत्यादी आणि भिन्न फर्निचर लाकडाची वैशिष्ट्ये.
समांतर साॅईंग (कापणे.), रेडियल साॅईंग, क्वार्टर साॅईंग, टेंजेन्शिअल सॉईंग,त्याची प्रक्रिया आणि फायदे. बेडरूम, डायनिंग हॉल, लायब्ररी, कार्यालय, कार्यशाळा, वर्गात वापरले जाणारे लाकडी भिंत युनिटचे डिझाइन . लहान टेबल बनविण्यासाठी वापरले जाणारे ज्वांईंटचे वापर. विविध बोर्ड व शिट तयार करण्याची प्रक्रिया याचे कौशल्य दीले जाते.
दरवाजा लॉकचे प्रकार आणि त्यांचे भिन्न उपयोग. खिळे आणि स्क्रू, त्याचे प्रकार .नट, बोल्ट आणि वायसर त्याचे प्रकार आणि उपयोग . लॉक बिजागर्या, कड्या आणि मुख्य दरवाजाच्या कड्या, इतर फिटिंग्ज, त्यांचे प्रकार आणि आकार, शोभेच्या कोरीव कामांसाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या कोरीव कामांची साधने यांचे ज्ञान दीले जाते. कामाच्या साहित्याची यादी तयार करणे ,साहित्याचा अंदाज लावणे याबाबतचे कौशल्य् शिकविले जाते.
पेंट्स, पेंट्सचे घटक. पेंट्सच्या एजंटचे नाव. स्टेनिंगसाठी ( पाॅलिश / फीनीशिंग ) पृष्ठभागाची तयारी करण्याची पद्धत. स्टेनिंग करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि उपकरणे.
वेगवेगळ्या ग्रेडच्या पाॅलिश पेपर आणि पोर्टेबल सॅन्डर मशीनचा वापर, पुट्टी तयार करण्याची पध्दत आणि वापरा पुर्वीची तयारी , वेगवेगळ्या इमारती लाकूडांसाठी वापरलेले स्टेनिंगचे (फीनिशिंगचे) प्रकार, प्रक्रिया, पद्धती आणि वर्णन. फ्रेंच पॉलिशची पद्धत , त्याचा वापर, मेण पॉलिशची पद्धत याबाबत शिकविले जाते.
पोर्टेबल डिस्क सॅन्डर मशिनचे मुख्य भाग आणि , वापर व त्याची काळजी आणि देखभाल. लाकडी पार्टीशन करण्याची पद्धत. दरवाजाची चौकट, दरवाजा आणि खिडकीचे पॅनल. स्टूलसाठी आवश्यक असलेल्या लाकडाचा अंदाज. स्टुल बनविण्याच्या क्रियांच्या क्रमाची यादी याचे कौशल्य दीले जाते.
बँड सॉ मशीन आणि सर्क्युलर साॅ मशीन बांधणीच्या, वैशिष्ट्यांचे वर्णन , प्रकार, आकार,त्यांचे मुख्य भाग, मशीनचे कार्य , वापरतानाची सुरक्षितता, मशिनची निगा आणि दुरुस्तीचे बाबत शिकविले जाते.
पेडेस्टल ग्राइंडिंग (अवजारे , हत्यारे यांना धार करण्यासाठीची ) मशीनचे वर्णन, प्रकार, आकार, भाग, कार्य, मशीनचे ऑपरेशन,मशीनसाठी सुरक्षा खबरदारी आणि
टर्निंग लेथ ( लाकडाला दंडगोल आकारात कापणारी ) मशीन - वर्णन, प्रकार, आकार, भाग, कार्य, मशीनचे ऑपरेशन,मशीनसाठी सुरक्षा खबरदारी आणि मशीनची निगा आणि देखभाल याबाबतचे कौशल्य शिकविले जाते.
प्लेनर ( लाकडाचा पृठभाग प्लेन करणारी ) मशिनचे वर्णन, प्रकार, मशीनचे आकार, मुख्य भाग, मशीनचे कार्य.मशीनचे ऑपरेशन.मशीनची निगा ऑईलिंग ग्रीसिंग आणि दुरुस्तीचे कौशल्य शिकविले जाते.
मॉर्टिझ (लाकडावर चौकोनी आणि आयताकृती होल पाडणारी)मशीन आणि सॅटींग ( लाकडाचा पृष्ठभाग गुळगुळीत करणारी ) मशीन - वर्णन, प्रकार, आकार, भाग, कार्य, मशीनचे ऑपरेशन, काम करतानाची सुरक्षितता, तसेच मशीनची निगा आणि दुरुस्तीचे ज्ञान दीले जाते.
पॅटर्न मेकिंगसाठी वापरले जाणारे लाकुड, अवजारे, पॅटर्नचे प्रकार आणि त्यांचा उपयोग, पॅटर्न मध्ये वापरले जाणारे कलर कोडचा वापर, तसेच ड्राईंग, ब्लु प्रिंटचे वाचन करण्याचे कौशलही शिकविले जाते.
हा ट्रेड यशस्वीपणे पुर्ण केल्यावर लाकड्याचे फर्निचर निर्मितीच्या कारखान्यात , पुल , बोगदा , उड्डाणपुल निर्मिती करणार्या बांधकाम कंपनीत एक वर्ष शिकाऊ उमेदवारी .
त्यानंतर NCVT ची परिक्षा, ह्या परिक्षेत पास झाल्यानंतर जाॅबसाठी अर्ज करायला मोकळे...
नोकरीची संधी:- सुतार म्हणुन आपण लाकडी किंवा लाकडासारख्याच मटेरिअल पासुन फर्निचर निर्मिती करणार्या कंपनी , उड्डाण पुल , साधे पुल, बोगदा , कालवे निर्माण करणार्या बांधकाम कंपनीत, कला निर्देशकाच्या टीममध्ये राहून सेट निर्माण करणेचे कामात , एखाद्या इंटीरिअर डेकोरेटर बरोबर काम करु शकता.
बर्यापैकी अनुभव मिळवुन स्वत:चा व्यवसायही सुरु करु शकता . तसेच काम करता करता आपला व्यवसायही सुरु करु शकता .
मित्रांनो या ट्रेडबध्दल अजुन काही शंका / प्रश्न असेल तर comment box मध्ये विचारु शकता.
ITI Admission
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा