फीटर - FitterITI Admission
फीटर

शैक्षणिक पात्रता :- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय                                                                बंधनकारक )
प्रशिक्षण कालावधी:- दोन  वर्ष
व्यवसायाचा प्रकार :-  अभियांत्रिकी  व्यवसायआय.टी.आय. मधील फीटर हा ट्रेड फार लोकप्रिय आहे. मेकॅनिकल , केमिकल क्षेत्रातली अशी कोणतीही कंपनी नाही जेथे फीटर नाही. फीटर शिवाय कोणत्याही कंपनीत काम होऊच शकत नाही. मोठे मोठे उड्डाण पुल , मेट्रो रेल्वेचे बांधणीचे काम सुरु आहे तेथे पण फीटरची आवश्यकता असतेच.
 
फीटर म्हणजे जोडण्याचे काम करणारा कारागिर. मशिनची बांधणी, वेगवेगळे उपकरणे यांची जोडणी. केमिकल कंपनीत पाईप लाईन जोडणी करण्यासाठी फीटरची आवश्यकता लागते.

फीटर हा ट्रेड ALL ROUNDER ट्रेड आहे या ट्रेडमध्ये फीटर ट्रेड व्यतिरिक्त
वेल्डर(WELDER) ट्रेडची कौशल्ये
नळकारागिर (PLUMBER) ट्रेडची कौशल्ये
कातारी (TURNER) ट्रेडची कौशल्ये
पत्रे कारागिर ( Sheet Metal Worker) ची कौशल्ये शिकविली जातात.

चला तर अजुन यात काय काय शिकविले जाते ते पाहुया....

शाॅप फ्लोअरवर (काम करायचे ठिकाण) सुरक्षिततेचे महत्त्व आणि सर्वसाधारण खबरदारी,
 प्रथमोपचार परिचय ,  स्वत:च्या सुरक्षिततेचे साधने यांचा परिचय  5 एस संकल्पना आणि त्याच्या उपयोग व महत्त्व, आगीची व्याख्या, आगीचा त्रिकोण , आग विझविण्याची साधने, प्रथमोपचार, अपघात याविषयी शिकविले जाते.
  मोजमाप  करण्याची साधने,त्याची युनिट्स, डिव्हिडर्स, कॅलिपर, हर्माफ्रोडाइट, सेंटर पंच, डॉट पंच, त्यांचे वर्णन आणि विविध प्रकारचे हातोडी त्यांचा प्रकार आणि उपयोग,  ‘व्ही’ ब्लॉक्स, अँगल प्लेट,
 कोनीय मोजमाप करणारी उपकरणे त्यांचे मुख्य भाग जसे  ट्राय स्केअर .प्रोटाॅकटर , काँमिनेशन सेट यांचे वर्णन, वापर आणि काम करताना घेतली जाणारी  काळजी ,
 व्हाईस — त्याचे प्रकार, मुख्य भाग , बांधणी , बनावटीचे धातु, उपयोग , काम करताना घ्यावयाची काळजी, आणि देखभाल  याबाबतचे ज्ञान दीले जाते.
फाईल ( कानस )- वर्गिकरण, वर्णन, बनावटीचे धातु ,मुख्य भागांची माहीती, ग्रेड आणि कट वरुन फाइल प्रकार आणि त्यांचा वापर आणि वापरताना घ्यावयाची काळजी, विशेष फाईली त्यांचा प्रकार आणि वापर,
 हॅक्सॉ फ्रेमचे प्रकार व वापर , ब्लेडचे साहित्य, ब्लेडचे भाग आणि ग्रेड, काम करताना घ्यावयाची काळजी याविषयी शिकविले जाते. 
 जाॅब मार्किंग/ लेआउट साधनेची साधने जसे डिव्हिडर्स, स्क्रिबिंग ब्लॉक, आॅड लेग कॅलिपर, पंचचे , प्रकार आणि उपयोग
 कॅलिपरचे प्रकार,त्यांचा उपयोग, काम करताना घ्यायची काळजी व देखभाल.  सरफेर प्लेट आणि  ‘व्ही’ ब्लॉक, अँगल प्लेट्स, यांचे वर्णन, प्रकार आणि उपयोग , छिनीचे बनावटीचे  साहित्य,त्याचे प्रकार आणि त्यांच्या कटींग एजचे कोन, धातु कापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशिन्स जसे  पॉवर सॉ, बँड सॉ, सर्क्युलर सॉ मशीन यांची माहीती.

  व्हर्निअर कॅलिपर , व्हर्निअर हाईट गेज आणि व्हर्निअर बेव्हल प्रोटेक्टर 
यांचे कार्य तत्त्व, मुख्य भाग , बनावटीचे धातु, लहानात लहान मोजण्याची क्षमता, माप रिडींगचे कौशल्य ,
 आऊट साईड आणि इन साईड  मायक्रोमीटर आणि डेप्थ मायक्रोमीटर
त्यांचे मुख्य भाग , बनावटीचे धातु, कार्याचे तत्त्व, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य, कार्य करताना घ्यायची काळजी आणि देखभाल याचे ज्ञान दीले जाते. डिजिटल मायक्रोमीटरचे वर्णन आणि उपयोग,

 व्हर्निअर मायक्रोमीटर आणि  स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर यांचे कार्य तत्त्व, मुख्य भागांची माहीती, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य , काम करताना घ्यायची काळजी, देखभाल ,वरील सर्व अति सुक्ष्म मापन उपकरणांविषयी शिकविले जाते.

या ट्रेडमध्ये शीट मेटल या ट्रेडविषयीची  प्राथमिक कौशल्ये शिकविली जातात
शीट मेटलमधील कौशल्य शिकविली जातात.   शीट मेटल कार्यशाळेत घ्यावयाची सुरक्षितता,  शीटचे आकार, व्यावसायिक आकार आणि विविध प्रकारच्या धातूच्या शीट, कोटेड शीट आणि त्यांचा उपयोग ,मार्किंग आणि मोजण्याचे साधने, विंग कंपास, प्रिक पंच, स्निप्स/ कातरी , प्रकार आणि उपयोग.  शीट मेटलमधील  ज्वांईंटचे विविध प्रकार, कामानुसार त्यांची निवड आणि उपयोग,  रिव्हेटींगची पद्धत.  शियरिंग मशीनचे कार्य , वर्णन, मुख्य भाग याविषयी शिकविले जाते. 

 धातुला ड्रील करण्यासाठी वापरात येणारे   ड्रील बीट त्याचे प्रकार, मुख्य भाग व त्यांचे कार्य आणि आकार (अपूर्णांक, मेट्रिक, संख्या, पत्र ड्रिल)  वेगवेगळ्या मटेरिअलसाठी कटिंग अँगल  ,  ड्रिल होल्डिंग डिव्हाइसेस व  उपयोग,ड्रीलिंगसंबंधीत ऑपरेशन जसे रीमिंग,काउंटर सिंक, काउंटर बोर आणि स्पॉट फेसिंग याबाबतही शिकविले जाते. वेगवेगळ्या ड्रिलिंग मशीन ,त्यांचे मुख्य भाग आणि उपयोगात येणारे कामाचे स्वरुपावरुन वापर याचे ज्ञानही दीले जाते.

अभियांत्रिकी धातुचे भौतिक गुणधर्म जसे रंग, वजन, चुंबकीय गुणधर्म, गुरुत्व. तसेच  यांत्रिकी गुणधर्म जसे  कठोरता, ठिसूळपणा, कडकपणा, आणि लवचिकता.
कास्ट आर्यनचे प्रकार, गुणधर्म आणि वापर.  लोखंडाचे गुणधर्म आणि वापर. 
स्टील: प्रकार, गुणधर्म आणि वापर. 
 अलोह धातू (तांबे, अल्युमिनियम, कथील, शिसे, जस्त) गुणधर्म आणि वापर.
 अल्युमिनियम   उपयोग, फायदे आणि मर्यादा याबाबत शिकविले जाते. 
थ्रेडचे प्रकार , टॅपचे   प्रकार जसे हात टॅपआणि मशिन टॅप, वापरण्याची पद्धत.  
टॅप ड्रिल साईज सुत्र  टॅप रेंजचे प्रकार आणि त्यांचे उपयोग.
जाँबमध्ये तुटलेला टॅप, स्टड काढण्याची पध्दत. डायचे प्रकार आणि उपयोग,
 ग्राइंडिंग व्हीलची माहीती, प्रकार आणि   वापर, माउंटिंग आणि ड्रेसिंगचे महत्त्व आणि करण्याची पध्दत याबाबत शिकविले जाते.
ITI Admission


या ट्रेड मध्ये कातारी ( TURNER ) या   ट्रेडची   प्राथमिक कौशल्ये शिकविली जातात. 
लेथ मशीनवर काम  करताना सुरक्षाघ्यावयाची  खबरदारी ,  लेथचे मशीनच्या मुख्य भागांची नावे आणि त्यांचा उपयोग,  कटिंग टूल्सचे प्रकार,   कटिंग गती आणि फीड आणि कटची खोली याबाबतच्या व्याख्या, आणि  कुलंट आणि वंगण त्यांचा वापर. 
 चक्सचे प्रकार- थ्री जाॅ, फोर जाॅ,  आणि त्यांचा उपयोग.  बॅक प्लेट आणि त्याचा उपयोग,
लेथ मशीनवर केले जाणारे वेगवेगळे ऑपरेशन्स आणि ते करण्याबाबतचे कौशल्य शिकविले जाते.  प्रत्येक ऑपरेशन पार पाडताना लागणारे कटींग टुल , नॅर्लिंग ऑपरेशनचा हेतु , करण्यास लागणारे नर्लिंग टुलचे  वर्णन, प्रकार, ग्रेड, वापर, ऑपरेशन करताना दीली जाणारी गती,
टेपरची व्याख्या, महत्त्व, वापर आणि टेपर करण्याच्या पद्धती , त्या पध्दतीचे फायदे आणि तोटे. 

या ट्रेडमध्ये नळकारागिर (Plumber) या ट्रेडचे कौशल्येही शिकविली जातात.
पाईपचे प्रकार आणि आकार ,पाईपाला कापणे व थ्रेडिंग करणे, सामान्यतः वापरले जाणारे पाईप ज्वाईंटस् ,पाईप कटर, पाईप रॅंच, आणि टॅप, पाईप वाकणे मशीन इत्यादी साधनांचा उपयोग पाईपच्या कामांसाठी वापरल्या जाणार्‍या साधनांची माहीती दीली जाते.

या ट्रेडमध्ये वेल्डींग ट्रेडबध्दलचेही प्राथमिक कौशल्ये शिकविली जातात. 
वेल्डिंग शॉपमध्ये सुरक्षिततेचे महत्त्व आणि सामान्य खबरदारी.  इलेक्ट्रिक आणि गॅस वेल्डिंगकरताना घेतली जाणारी  खबरदारी.  (वेल्डिंग करण्यापूर्वी आणि नंतर).  वेल्डिंग मशीन्स आणि उपकरणे याची माहीती करुन दीली जाते.CO२ वेल्डिंग ऑपरेट करण्याची पद्धत.  गॅस वेल्डिंगची उपकरणे ऑपरेट करण्याची वेल्डींग ज्वाईंटचे प्रकार शिकविली जातात. ऑक्सिजन ऑसिटिलीन कटिंग-मशीनचे भाग, वापर, हाताळण्याची पद्धत, 
 ब्रेझिंग प्रक्रियेचे वर्णन आणि त्याचा उपयोग.
 धातूशी संबंधित उष्णता उपचार, उष्णता उपचारांच्या विविध पद्धती व करण्याची पध्दत याचे ज्ञान दीले जाते.

बेअरिंगचे महत्त्व, वापर आणि वर्गीकरण आणि त्यांचे प्रकार , प्रत्येकाचे वर्णन ,बांधणी जसे  बॉल बेअरिंग रोलर बेअरिंग आणि निडल बेअरिंग यांचा  वापर आणि बांधणी (रचना)
, बेअरिंग बसवितांना , काढतानाची पध्दत, घ्यावयाची निगा याबाबत शिकविले जाते.
जाॅबचे पृष्ठभाग गुळगुळीत (फीनिशिंग देण्याचे) आॅपरेशनची जसे लॅपिंग , होनिंग पध्दती , फायदे याविषयी शिकविले जाते.

मशीनमध्ये वापरले जाणारी हाॅड्रोलिक (प्रेशर दीलेले आॅईल)आणि न्युमॅटीक (प्रेशर दीलेली हवा) यंत्रणाबाबतची संकल्पना , महत्त्व, मशीन मध्ये वापरले जाणारे सर्किट, त्यांचे चिन्ह आणि व्हाल्वस् यांची माहीती शिकविली जाते.वंगणचे महत्त्व, चांगल्या वंगणाचे गुणर्धम, मशिनला वंगण करण्याच्या पध्दती,
अभियांत्रिकी क्षेत्रात वापरले जाणारे नट, बोल्ट आणि वाॅशर आणि चावी( KEY ) यांचे प्रकार रचना तसेच धातु, गती आणि शक्ती एका ठीकाणाहुन दुसर्‍या ठीकाणी स्थतांतरीत करण्याच्या पध्दती, त्यासाठी वापरली जाणारी साधने जसे 
बेल्ट - प्रकार , साईज , मटेरीअल
पुली - प्रकार, साईज , मटेरीअल
गिअर - प्रकार, साईज, मटेरीअल
मशीनवर फीट करण्याची, काढण्याची योग्य पध्दत , निगा राखणे, दुरुस्ती याबाबतचे कौशल्यही शिकविले जाते.

मशिन्स आणि अभियांत्रिकी उपकरणांची स्थापना, त्यांची देखभाल आणि दुरुस्ती.
 मशीन देखभालमध्ये केली जाणारी कामे -उद्दीष्ट  व्हिज्युअल आणि तपशीलवार, वंगण सर्वेक्षण,  असेंब्ली अपयशी होण्याची संभाव्य कारणे आणि उपाय. मशीन कार्यशाळेत स्थापन (ठेवताना) करताना वापरली जाणारी साधने जसे फाउंडेशन बोल्ट: प्रकार (रॅग, लेव्हिस कॉटर बोल्ट)  पुली ब्लॉक, पारई, स्पिरिट लेव्हल, प्लंब बॉब, पाईप , वायर दोरी, मनिला दोरी, लाकडी ब्लॉक तसेच सर्व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करुन यंत्र, उपकरणे स्थापित करण्याचे कौशल्यही शिकविली जाते.

फीटर ट्रेड यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायची इच्छा  असेल तर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला थेठ प्रवेश 
नाहीतर एक वर्षाची शिकाउ उमेदवारी ( खालील कंपनीत ), त्यानंतर NCVT ची परिक्षा आणि NCVT  परिक्षा पास झाल्यावर नोकरीची संधी...

नोकरीची संधी :
सरकारी - भारतीय रेल्वे , इंडीयन ऑईल, ओएनजीसी, हिंदूस्थान पेट्रोलियम, भेल(BHEL), गेल(GAIL), भारत पेट्रोलियम, सुरक्षा मंत्रालयातील आयुधे निर्मितीच्या कंपनीत, डाॅक यार्डमध्ये.

खाजगी नोकरी - उत्पादन आणि निर्मितीच्या कंपनीत, पुल बोगदे कालवे तसेच बांधकाम व्यवसायाच्या कंपनीत, ऑटोमोबाईलच्या क्षेत्रातील कंपनी, जहाज बांधणी आणि दुरुस्तीच्या क्षेत्रातील कंपनीत.
कामाचा चांगला अनुभव झाला की भविष्यात परदेशातही काम मिळु शकते.
मित्रांनो फीटर या ट्रेडबध्दल अजुन काही प्रश्न असेल तर comment box मध्ये विचारु शकता. तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर दीले जाईल.
भविष्यात परदेशातही जॉब मिळू शकतो. 

मित्रांनो या ट्रेडबध्दल अजुन काही शंका / प्रश्न असेल तर comment box मध्ये विचारु शकता.
ITI Admission

टिप्पण्या

 1. प्रत्युत्तरे
  1. फीटर ट्रेडसाठी ४५-५५% असले तरी चालते. पण जितके जास्त मार्क तितके घरा जवळच्या iti ला प्रवेशाचे चान्स जास्त

   हटवा
  2. Diesel Mechanical Course kara Job Garanty 100% institute :ishwariy vidhya prasarak mandal ambijalgaon tal karjat dist ahmednagar .Course name:Diesel mechanic one year course.contact no.9960479590

   हटवा
 2. Purn shikhun jhlyvr job sathi kuthe apply kryche ???konty company mdhe krycha mi nagpur la rhto i kuthe krnr ???

  उत्तर द्याहटवा
 3. सर ITI नंतर पॉलिटेक्निक ला अॅडमीशन मीळेल का

  उत्तर द्याहटवा
 4. Sir...ITI Fitter chya Aprentiship made..kon konte Questions vicharle jatat ...plzzz sir help me...my whatsApp number.. 962399421o ...plzzzz sir can you help me🤗

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Fitter व्यवसायाच्या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारले जातील. त्यादृष्टीने अभ्यास करून परीक्षेची पूर्ण तयारी करावी.

   हटवा
 5. विदेशात जॉब करिता apply कसा करावा त्यासाठी काय अटी आहे

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा