डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर ( D.T.P.O.)

ITI Admission
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर 
शैक्षणिक पात्रता:- दहावी पास  ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक नाही) 
प्रशिक्षण कालावधी :- एक  वर्ष
व्यवसायाचा प्रकार :-   बिगर अभियांत्रिकी व्यवसाय 

मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,
तुम्ही रस्त्याने जाताना  मोठे मोठे बॅनर पाहत असाल , त्या बॅनर मधील  फोटो ,  त्यातील रंग , इमेज स्पष्टपणा हि सर्व कलाकारी या  ट्रेडवाल्याची  असते.  एखादी लग्न पत्रिका त्यावरील  शब्द त्यांची ठेवणं आणि सर्व मापात हे सर्व या ट्रेड वाल्याचीच कमल असते. हा D.T.P. ऑपरेटर संगणकावर मचकूर आणि ग्राफिक्समध्ये जाहिराती , ब्रोशर , न्युज पेपर, लग्न पत्रिका या सारखा मुद्रित साहित्याची निर्मिती करतो. 

या ट्रेड आपण एम .एस .ऑफिस, पेज मेकर सॉफ्टवेअर ,,koral  draw सॉफ्टवेअर  ,फोटो शॉप, इन डिझाईन सॉफ्टवेअर , पब्लिशिंग सॉफ्टवेअर ,ईमेज एडिटिंग सॉफ्टवेअर ,ग्राफिक डिझायनर सॉफ्टवेअर आणि   इंटरनेट , नेट वर्किंग या बाबी शिकायला मिळतात. 

चला तर या ट्रेडमध्ये अजुन काय काय शिकविले जाते ते पाहुया...
कामाच्या ठिकाणी काम करत असताना घ्यावयाची सुरक्षितता. सुरक्षिततेचे नियम .अग्निची व्याख्या, अग्निचे प्रकार, अग्निशमन  यंत्रांचे प्रकार आणि अग्निच्या प्रकारानुसार योग्य अग्निशमन यंत्राचा वापर.
 कीबोर्ड ची ओळखकीचे प्रकारआणि त्यांचा वापर.
 संगणक घटकांची ओळख. संगणक प्रणालीची ओळख.  हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची संकल्पना.
 मदरबोर्डचे घटक आणि विविध प्रोसेसरचे कार्य. संगणकावर वापरली जाणारी विविध इनपुट / आउटपुट डिव्हाइस आणि  त्यांची वैशिष्ट्ये याबाबत शिकविले जाते.

 ऑपरेटिंग सिस्टम ( O. S. ) म्हणजे काय ? याचे महत्त्व . विंडोज ऑपरेटिंग सिस्टमची ओळख , त्यांची  मुख्य वैशिष्ट्ये. संगणकावर वापरल्या जाणार्‍या विविध शॉर्टकट कमांडची माहीती शिकविली जाते.
संगणकावरील  बूटिंग प्रक्रियेची ओळख. संगणकाशी संबंधीत  मेमरीज जसे RAM आणि ROM आणि त्यांची वैशिष्ट्ये. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर निर्माण होणार्‍या समस्या आणि त्यांचे निराकरण.
ऑप्लिकेशन सॉफ्टवेयरचा वापर आणि एन्टीवायरस साॅफ्टवेअरचे महत्त्व आणि वापरबाबत शिकविले जाते.

 मूलभूत विंडो अ‍ॅक्सेसरीजचा परिचय.  text file आणि document file ची व्याख्या, document file मधील  मूलभूत वैशिष्ट्यांचा परिचय, document file आणि text file यामधील  फरक ,  तसेच ईमेज फाईल याबाबत शिकविले जाते. Document (दस्तऐवज) सेटअप: - दस्तऐवजाची संकल्पना,   डेस्कटॉप प्रकाशन म्हणजे काय  त्याची  प्रस्तावना, त्याची गुणवत्ता आणि कार्यक्षमता.  

 वर्क प्रोसेसिंग सॉफ्टवेअर - एम.एस. ऑफीसमधील विविध ऑम्लिकेशन ची ओळख.  ऑफिस  वर्डच्या वैशिष्ट्यांची ओळख, ऑफिस बटण टूल बारची माहीती,  शब्द वापरुन कागदपत्र तयार करणे, जतन करणे, स्वरूपित करणे आणि मुद्रित करणे ,वर्ड मध्ये ऑब्जेक्ट्स, मॅक्रो, मेल विलीनीकरण, टेम्पलेट्स आणि इतर साधनांसह कार्य करण्याबाबतचे कौशल्य शिकविले जाते.  ITI Admission

नेटवर्किंग संकल्पना: - संगणक नेटवर्किंगची ओळख, आजच्या जमान्यात त्याची आवश्यकता आणि फायदे.  क्लायंट सर्व्हर आणि पीअर टू पीअर नेटवर्किंगची संकल्पना .  LAN, WANआणि MANची ओळख.  नेटवर्कचे घटक उदा.  मॉडेम, हब,स्विच, राउटर, ब्रिज, गेटवे इ. नेटवर्क केबल, वायरलेस आणि ब्ल्यु टुथचे  तंत्रज्ञान.  www ही संकल्पना,इंटरनेट, वेब ब्राउझर, इंटरनेट सर्व्हर व  सर्च इंजिन  यांची ओळख.
डोमेन म्हणजे काय? याची संकल्पना , नामकरण प्रणाली आणि ईमेल कम्युनिकेशन. व्हिडिओ चॅटींग करण्याची साधने आणि सोसिअल नेटवर्किंग म्हणजे काय? त्याची संकल्पनांचा  याविषयी शिकविले जाते.
प्रकाशन सॉफ्टवेअरबध्दलची माहीती:-   अ‍ॅडॉबपेज मेकरच्या सहाय्याने तयार केले जाणारे वृत्तपत्र, मासिक, पुस्तक, वृत्तपत्र, व्हिजिटिंग कार्ड्स, लेटर हेड,  ब्रोशर्स यासारख्या विविध प्रकारच्या प्रकाशनांची व्याख्या,  मजकूराची ओळख.  पेज लेआउट वापरणे, तयार करणे, जतन करणे, तयार करणे आणि मुद्रण करणे.  पेजमेकरमध्ये ऑब्जेक्ट्स, टेम्पलेट्स आणि इतर साधनांसह काम करण्याचे कौशल्य शिकविले जाते.

पेज  लेआउट सॉफ्टवेअर: - पेज  लेआउटचे साॅफ्टवेअरचे  विविध प्रकार , यातील एक  क्वार्क एक्सप्रेस(     (Quark xpress ) त्याची ओळख , गुणधर्मांची ओळख व मजकूर संपादन , पृष्ठ लेआउटची ओळख, तयार करणे, जतन करणे, स्वरूपन आणि मुद्रण प्रकाशन क्वार्क एक्सप्रेसचा वापर करणे ,ऑब्जेक्ट्स, टेम्पलेट्ससह कार्य करणे.  आणि क्वार्क एक्सप्रेस मधील इतर साधने आणि मेनू  यावर काम करण्याचे कौशल्य शिकविले जाते.

स्कॅनिंग: - स्कॅनिंगचे तत्व , स्कॅनरचे प्रकार आणि त्याचा उपयोग , ग्राफिक्स ड्रॉईंग इनपुटस् स्पेक्टर्स, स्केसेस इत्यादी , ऑप्टिकल कॅरेक्टर रीडरची तयारी याबाबत शिकविले जाते.
ईमेज मूलभूत आणि ईमेज एडिटिंग  सॉफ्टवेअर: - विविध प्रकारचे ईमेजेस - पिक्सेल आणि वेक्टर - त्यांचे गुणधर्म आणि त्यातील फरक , चित्र गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी ओळख - चित्राचे रिसोल्युशन आणि ठराव्यावर अवलंबून त्यांची गुणवत्ता , चित्रांची रंगीत गुणवत्ता स्पष्ट करण्याबाबत.  टोनलचे ग्रेडेशन. फोटोशॉपमध्ये उपलब्ध असणारे विविध टुल आणि मेन्युज यांची ओळख आणि त्यांचे कार्य याचे कौशल्य शिकवितात.

ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअर: - लाइन आर्ट डिझाईनची ओळख , रंगाची परिभाषा  , वेगवेगळे कलर मोड आणि कलर चक्र कि जे प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय रंग दर्शवितात त्याची ओळख, कोरल ड्रॉ या साॅफ्टवेअरची माहीती आणि त्यातील  टूलबार आणि मेनूबारची वैशिष्ट्ये .कोरल ड्रॉ वापरुन एखादी ग्राफीक्स डिझाईन  तयार करणे, जतन करणे  ,  आणि प्रिंट करणे याचे कौशल्य शिकविले जाते.

पेज ले आउट साॅफ्टवेअर: - अडोबइनडिझाईन या साॅफ्टवेअरची ओळख , त्याच्या गुणधर्मांची ओळख व मजकूर संपादन करण्याची ओळख, पेज लेआउट तयार करणे, जतन करणे, रचना तयार करणे आणि मुद्रण प्रकाशन डिझाईनद्वारे वापरणे आणि पेज  लावण्याची तयारीची कौशल्ये शिकविली जातात.
द्विभाषिक सॉफ्टवेअर: - परिचय, आवश्यकता आणि द्विभाषिक सॉफ्टवेअरचे ओवर ऑ ल परिणाम.
 प्रिंटींग : - प्रिंटिंगचे  तत्व,  प्रिंटरचे प्रकार आणि त्याचा वापर .. पृष्ठभिमुखता, कागदाचा आकार, ऑटो फ्लिप, गुणवत्ता, रंग समायोजन आणि प्रिंट आउट मधील  टेक्निक शिकविले जातात. 

हा ट्रेड यशस्वीपणे पूर्ण केल्यावर एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी. 
गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस , ऍडव्हर्टीझिंग एजन्सी , प्रिंटिंग प्रेस ,DTP सेन्टर या ठिकाणी शिकाऊ उमेदवारी मिळते. 

नोकरी :- नोकरीचे म्हणाल तर DTP सेन्टर, ऑफसेट प्रिंटिंग प्रेस , ऍडव्हर्टीझिंग एजन्सी, शासकीय तसेच अशासकीय आस्थापना या ठिकाणी नोकरी मिळू शकते. 
तसेच स्वतःचा व्यवसाय करायचा तर व्यवसायहि सुरु करू शकतो.   
ITI Admission

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा