कोपा ( Computer Operator & Programming Assistant)ITI Admission
कोपा  ( Computer Operator & Programming Assistant) 

शैक्षणिक पात्रता :-      दहावी पास (गणित आणि विज्ञान बधनकारक नाही)
                                     
प्रशिक्षण कालावधी :-  एक वर्ष
व्यवसायाचा प्रकार :-   बिगर अभियांत्रिकी  व्यवसाय     
                                                                                
मित्र आणि मैत्रिणींनो ,
या ट्रेडमध्ये आपणास संगणक मूलभूत, डेटा एट्रीं, मूलभूत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संकल्पना त्यातील घटक, त्यांची कार्यपध्दती.   M.S.Office यामधील वर्ड, एक्सेल यामधील टुल त्याचे कार्य , या टुलच्या सहाय्याने केली जाणारी कामे. प्रेझेन्टेशन आणि ग्राफिक पॅकेज यामुळे पावर प्रेझेन्टेशन बनविणेटॅलीचा सॉफ्टवेअर वापर.  नेटवर्किंग, इंटरनेट ब्राउझिंग आणि ईमेलची मूलभूत संकल्पना.  मल्टीमीडिया संकल्पना, संगणक आणि इतर संबंधित उपकरणे वापर आणि देखभाल या गोष्टी शिकायला मिळतील. 

यामुळे तुम्ही संगणकावर आत्मविश्वासपुर्ण काम करु शकाल . 

चला तर या ट्रेडमध्ये अजुन काय काय शिकविले जाते ते पाहुया...
कामाच्या ठिकाणी काम करत असताना घ्यावयाची सुरक्षितता. सुरक्षिततेचे नियम .अग्निची व्याख्या, अग्निचे प्रकार, अग्निशमन  यंत्रांचे प्रकार आणि अग्निच्या प्रकारानुसार योग्य अग्निशमन यंत्राचा वापर.
 कीबोर्ड ची ओळख, कीचे प्रकारआणि त्यांचा वापर.
 संगणक घटकांची ओळख. संगणक प्रणालीची ओळखहार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची संकल्पना.
 मदरबोर्डचे घटक आणि विविध प्रोसेसरचे कार्य. संगणकावर वापरली जाणारी विविध इनपुट / आउटपुट डिव्हाइस आणि  त्यांची वैशिष्ट्ये याबाबत शिकविले जाते.

 ऑपरेटिंग सिस्टम ( O. S. ) म्हणजे काय ? याचे महत्त्व . विंडोज ऑपरेटिंग सिस्टमची ओळख , त्यांची  मुख्य वैशिष्ट्ये. संगणकावर वापरल्या जाणार्‍या विविध शॉर्टकट कमांडची माहीती शिकविली जाते.
संगणकावरील  बूटिंग प्रक्रियेची ओळख. संगणकाशी संबंधीत  मेमरीज जसे RAM आणि ROM आणि त्यांची वैशिष्ट्ये. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर निर्माण होणार्‍या समस्या आणि त्यांचे निराकरण.
ऑप्लिकेशन सॉफ्टवेयरचा वापर आणि एन्टीवायरस साॅफ्टवेअरचे महत्त्व आणि वापरबाबत शिकविले जाते. 

Disc Operating System बाबतची माहीती. या आॅपरेटींग सिस्टीम मध्ये वापरल्या जाणार्‍या  commands ची ओळख , जसे dir, del, exit, cls इत्यादी
लिनक्स(Linux) ऑपरेटिंग सिस्टमची वैशिष्ट्ये, रचना आणि प्रक्रिया यांचा परिचय आणि या ऑपरेटींग सिस्टीम मधील मुलभूत Commands याबाबत शिकविले जाते.
 
M.S.Office  मध्ये असलेल्या  विविध उपयोगांची माहीती.वर्डमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांची ओळख, ऑफिस बटण, टूलबार.वर्डच्या सहाय्याने  कागदपत्र तयार करणे, सेव करणे आणि त्यात बदल करणे आणि प्रिंट करणे.वर्डमध्ये असलेल्या टुलच्या सहाय्याने काम करण्याचे कौशल्य शिकविले जाते.
एक्सेलचे वैशिष्ट्ये आणि डेटा प्रकारांची ओळख.सेल संदर्भ आणि शीटशी लिकींग ,
एक्सेलच्या सर्व श्रेणींमध्ये विविध कार्यांची ओळख.डेटाची क्रमवारी लावणे, फिल्टरिंग आणि प्रमाणीकरण करण्याच्या संकल्पना यांचे कौशल्ये शिकवितात.चार्ट, डेटा टेबल, पाइवोट टेबल, गोल सिक यांच्या वापराने डेटाचे विश्लेषण करणे

ओपन ऑफिसची ( हे एक फ्रीचे साॅफ्टवेअर आहे. M.S. Office सारखेच काम करते.)ओळख,
यातील राईटर, कॅल्क,ईम्प्रेस,बेस,ड्रा,मॅथ असे यातील घटक असुन त्यांचा उपयोग यांची माहीती,
इमेजेसचे गुणधर्म आणि एडीटींग,  इमेजेसचे भिन्न स्वरूप आणि त्यांचे उपयोग यांची ओळख.  पॉवर पॉईंटची ओळख आणि त्याचे फायदे, स्लाइड शो तयार करणे, पाॅवर पाॅईंटचे सादरीकरण आणि चांगली सादरीकरणाची  उत्तम तंत्रे शिकविली जातात.

डेटा आणि डेटाबेसच्या संकल्पना. चांगल्या टेबलांच्या रचनांचे नियम आणि डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली (DBMS)सबंधीत घटक , विविध प्रकारच्या अडचणी आणि त्यांच्या वापराची ओळख यांचे ही कौशल्य शिकविले जाते.पीअर टु पीअर नेटवर्किंग संकल्पना स्पष्ट केली जाते. संगणक नेटवर्क्सची ओळख , आवश्यकता आणि फायदे शिकविले जाते. प्रॉक्सी सर्व्हर आणि प्रॉक्सी फायरवॉल सर्व्हरची आणि
डीएचसीपी सर्व्हरची संकल्पना ,नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय ? याचे प्रकार  लॅन, डब्ल्यूएएन आणि मॅन नेटवर्कची ओळख.,नेटवर्कचे घटक, उदा.  मॉडेम, हब, स्विच, राउटर, ब्रिज, गेटवे यांची माहीती आणि कार्य पध्दती ,नेटवर्क केबल्स, वायरलेस नेटवर्क आणि ब्लू टूथ तंत्रज्ञान, नेटवर्क प्रोटोकॉलचा सारांश याबाबतही शिकविले जाते.

 इंटरनेटची संकल्पना यामध्ये www, इंटरनेट, वेब ब्राउझर, इंटरनेट सर्व्हर आणि सर्च इंजिनची संकल्पना.
 डोमेन नेमिंग सिस्टम आणि ई मेल संवादाच्या  संकल्पना.व्हिडिओ चॅटिंग साधने आणि सोशल नेटवर्किंग संकल्पनांची माहीती करुन दीली जाते.

वेब डिझाइन संकल्पना स्पष्ट करताना स्टाटीक आणि डायनॅमिक वेब पेज म्हणजे काय ?
 HTML ओळख आणि HTMLमधील विविध टॅग.वेब पेजमध्ये वापरल्या जाणार्‍या भिन्न नियंत्रणाच्या संकल्पना.
 CSS संकल्पना आणि HTMLवर CSS लागू करण्याची पध्दत . ओपन सोर्स सीएमएस अर्थात जूमला, वर्ड प्रेस . आणि वेब ऑथरींग टूल्सचा परिचय. तसेच चांगले वेबपेज डिझाइनिंग तंत्राची संकल्पना यांचे कौशल्य दीले जाते.
ITI Admission
जावास्क्रिप्टचा ही एक वेब विकसित करण्यासाठी वापरली जाणारी भाषा असुन यात प्रोग्रामिंग आणि स्क्रिप्टिंग भाषांचा परिचय करुन दीली जाते. वेब सर्व्हरची ओळख आणि त्यांची वैशिष्ट्ये.
जावास्क्रिप्टची मूलभूत माहिती यात - डेटा प्रकार, व्हेरिएबल्स, स्थिर घटक आणि डेटा प्रकारांमधील रूपांतरण , जावास्क्रिप्टमधील अंकगणित, तुलना, लॉजिकल ऑपरेटर.  प्रोग्राम कंट्रोल स्टेटमेन्ट्स आणि यामधील  लूप.जावास्क्रिप्ट मधील अ‍ॅरे - संकल्पना, प्रकार आणि वापर.जावास्क्रिप्ट मध्ये स्ट्रिंग डेटा प्रकार.  स्ट्रिंग, मठ आणि तारीख यांचा परिचय.जावास्क्रिप्ट मध्ये कार्ये ओळख.जावस्क्रिप्ट मध्ये पॉप अप बॉक्स संकल्पना.दस्तऐवज ऑब्जेक्ट मॉडेल, ऑनिमेशन वापरण्याच्या संकल्पनाआणि जावा मधील मल्टीमीडिया फाइल्स या विषयीचे कौशल्य शिकवितात. 

व्हीबीए, चा विस्तीर्ण रूप  Visual  Basic for  Application  ( VBA )असा असून हि एक मायक्रोसॉफ्टनी विकसित केलेली प्रोग्रामिंग भाषा आहे. हि M .S  Office मधील Acess, Excel ,Power Point , Publisher , Word साठी वापरतात. वैशिष्ट्ये आणि उपयोगाची करून दिली जाते. 
 बटण, चेक बॉक्स, लेबल, कॉम्बो बॉक्स, गट बॉक्स, पर्याय बटण, यादी बॉक्स, स्क्रोल बार आणि स्पिन बटण नियंत्रणाशी संबंधित गुणधर्म, कार्यक्रम आणि पद्धती,व्हीबीए मधील ऑपरेटर आणि ऑपरेटर प्राधान्य.व्हीबीएमध्ये अ‍ॅरेची ओळख.व्हीबीए मधील स्ट्रिंग्सची ओळख. व्हीबीएमध्ये सशर्त प्रक्रिया,  व्हीबीए मधील पळवाटांचा परिचय.व्हीबीए संदेश बॉक्स आणि इनपुट बॉक्स,व्हीबीए मध्ये कार्ये आणि कार्यपद्धती तयार करणे यांचा परिचय या बाबत शिकविले जाते. 

ITI Admission
अकाऊटिंग ( हिशोबीय) सॉफ्टवेअर वापरणे
  अकाऊटची मूलभूत माहिती, अकाउंटचे  नियम, व्हाउचर एन्ट्री, लेजर पोस्टिंग, बेलेन्स शीट, प्रॉफिट ॲंड लॉस अकाऊंट शीट बनविणे ,कॅश बुक, प्रमाण विश्लेषण, घसारा, स्टॉक व्यवस्थापन. व्हॅट, कॅश फ्लो, फंड फ्लो अकाऊंटिंगचे  विश्लेषण,
Tally या साॅफ्टवेअरची ओळख आणि, वैशिष्ट्ये आणि फायदे.टॅलीमध्ये अकाउंटची अंमलबजावणी करणे.
  बुककीपिंगची दुहेरी नोंद,अर्थसंकल्पीय प्रणाल्या, परिस्थिती व्यवस्थापन आणि भिन्नता विश्लेषण....
खर्च प्रणाली, प्रमाण संकल्पना, आर्थिक विधानांचे विश्लेषण.इन्व्हेंटरी बेसिक्स, पीओएस इनव्हॉइसिंग, टीडीएस, टीसीएस,  व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्स सारखी  कामे Tally  साॅफ्टवेअरवर करण्याचे  कौशल्ये  शिकवितात

ई कॉमर्सची ओळख आणि फायदे. नेटवर  बिझिनेस करणे देय आणि ऑर्डर प्रक्रिया, प्राधिकृत करणे, शुल्क आकारणे आणि इतर देय पद्धतीबाबत शिकविले जाते. सायबर सुरक्षा विषयक महत्त्व, सुरक्षा धमकी , माहिती जोखीम व्यवस्थापित करण्याची प्रक्रियेची माहिती यात गोपनीयता ,सचोटी , संस्थेच्या मालमतेची उपलब्धता ओलखणे , मूल्यांकन करणे यांचा समावेश होतो.. माहिती तंत्रज्ञनाही ओळख करून दिली जाते तसेच सायबर गुन्हासाठीच्या दंडाची माहिती करून दिली जाते

हा ट्रेड यशश्वीपणे पूर्ण केल्या .  एक वर्ष शिकाऊ उमेंदवारी , त्यानंतर NCVT ची परीक्षा , NCVT परिक्षा पास झाल्यानंतर.... 
सरकारी नोकरी म्हणाल तर गव्हर्नमेंट ऑफिसेस , महापालिकामध्ये  , कॉम्पुटर ऑपरेटर ,डेटा ऑपरेटर या पदासाठी जाहिराती येत असतात.  

खाजगी नोकरी 
सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट फर्म मध्ये ,
संगणक संस्थेत शिक्षक किंवा लॅब सहाय्यक ,
सायबर कॅफे मध्ये इंटरनेट ऑपरेटर,सर्विस इंजिनिर च्या सहाय्यकाचे  काम , 
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दुकानात सेल्समन / सेल्सगर्लचे काम 
विविध खाजगी ऑफिसेस मध्ये कॉम्पुटर ऑपरेटरचे , डेटा एन्ट्री  ऑपरेटरचे काम 
बीपीओ मध्ये ,  अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम मिळू शकते.
जर आपण आर्थिक दृष्ट्या मजबूत असाल  किंवा शासकिय योजनेच्या मदतीने आपले संगणकाशी संबंधीत स्पेअर पार्ट, उपकरणाचे छोटे दुकान ही काढु शकता. 

नाही तर आज काल ऑनलाइनवरही डेटा एन्ट्री ची भरपूर कामे मिळतात , हा पण या प्रकारच्या कामात  आपली फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. 

या ट्रेड बाबत अजून काही शंका / प्रश्न  असेल कंमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. 
ITI Admission

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा