मशिनिस्ट (Machinist)

ITI Admission
मशिनिस्ट  ( यंत्रकारागीर )

शैक्षणिक पात्रता:- दहावी पास  ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक) 
प्रशिक्षण कालावधी :- दोन वर्ष
व्यवसायाचा प्रकार :-   मशीन गट  - अभियांत्रिकी व्यवसाय 


मित्रांनो,
मशिनिस्ट या ट्रेडला उत्पादन निर्मितीच्या क्षेत्रात फार मागणी आहे. ड्रिलिंग मशीन, लेथ मशीन , ग्राइंडर मशीन, स्लोटिंग ,  तसेच इडिस्ट्री मध्ये  असलेल्या ऍडव्हान्स टेकनॉलॉजिच्या  सी.एन.सी. मशीनटर्निंग सेंटर, व्ही .एम. सी. मशीन ) प्रोग्रामिंग आणि ऑपरेटिंगचे   कौशल्ये या ट्रेडमध्ये शिकविली जातात. 

या ट्रेडमध्ये आपणास फीटरचे कौशल्ये , कातारीचे कौशल्ये  तसेच घर्षणकाराचे कौशल्ये शिकायला मिळतात

चला तर या ट्रेडमध्ये काय शिकविले जाते ते पाहुया...

औद्यागिकक्षेत्रात काम करताना घ्यावयाची सुरक्षा,सर्वसाधारण सुरक्षिततेची काळजी , प्रथमोपचार, विद्युत दुरुस्ती आणि विद्युत सुरक्षेबाबत सुरक्षा, व्यक्तीगत सुरक्षाविषयक साधने,त्यांचा वापर , 5s या संकल्पेने महत्त्व आणि याचा उपयोग.
मोजमापनाचे प्रकार , रेषीय मोजमापनाची एकके, स्टील रूल , डीव्हायडर, कॅलिपर यांचे प्रकार आणि उपयोग.पंच ,याचे प्रकार ,प्रकारानुसार त्यांचे उपयोग , बनावटीचे धातु.हातोड्याचे प्रकार , वर्णन,उपयोग आणि निगा व देखभाल. यावियषी शिकविले जाते.

व्हाईसचे प्रकार, बेंच व्हाईसची रचना/बांधणी , व्हाईसच्या प्रकारानुसार त्यांचे उपयोग, निगा आणि देखभाल.हेक्सो फ्रेम आणि बेल्ट आणि त्यांचा उपयोग,हेक्सोचा वापर .फाईल- फाईलचे वर्गीकरण, मुख्य भागांची माहीती, फाईलचे प्रकार , बनावटीचे धातु , फाईलचे त्याच्या प्रकारानुसार उपयोग, फाईलिंगच्या पध्दती , त्यांची निगा,देखभाल याचे कौशल्य शिकविले जाते.

पेडस्टल ग्रांईडर चा उपयोग, मुख्य भाग, काम करताना घ्यावयाची खबरदारी, ग्रांईडरची निगा. जाॅबवर मार्किंग करण्यासाठी वापरले जाणारे टुल , मार्किंग ब्लाक त्यांची निगा आणि देखभाल.
ट्राय स्केअरचा उपयोग, बनावटीचे धातु, त्याचे प्रकार. कोल्ड चिझलचे बनावटीचे धातु, मुख्य भाग, प्रकार आणि प्रकारानुसार उपयोग, चिझलचे कटींग अॅगल. काॅम्बिनेशन सेट ,याचे मुख्य भाग त्याचा वापर , निगा आणि देखभाल. मार्किंग मिडीया याचे महत्त्व आणि प्रकार .जाॅबवर मार्किंग करण्याच्या कामात वापरली जाणारी ईतर साधने जसे सरफेस प्लेट , ऑगल प्लेट, व्ही ब्लाक यांचे वर्णन , प्रकार,बनावटीचे धातु, उपयोग, अचुकता, निगा आणि देखभाल . ड्रील , टॅप, डाय यांचे वर्णन, बनावटीचे धातु, प्रकार आणि उपयोग टॅप ड्रील साईज काढण्याचे सुत्र, स्क्रु थ्रेडच्या घटकांची नावे आणि वर्णन.रिमर याचे बनावटीचे धातु , प्रकार आणि रिमिंग करण्याची कृती.

व्हर्निअर कॅलिपर , व्हर्निअर हाईट गेज आणि व्हर्निअर बेव्हल प्रोटेक्टर,
यांचे कार्य तत्त्व, मुख्य भाग , बनावटीचे धातु, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता, माप रिडींगचे कौशल्य ,
आऊट साईड आणि इन साईड  मायक्रोमीटर ,आणि डेप्थ मायक्रोमीटर
त्यांचे मुख्य भाग , बनावटीचे धातु, कार्याचे तत्त्व, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य, कार्य करताना घ्यायची काळजी आणि देखभाल याचे ज्ञान दीले जाते. डिजिटल मायक्रोमीटरचे वर्णन आणि उपयोग,

 व्हर्निअर मायक्रोमीटर आणि  स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर यांचे कार्य तत्त्व, मुख्य भागांची माहीती, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य , काम करताना घ्यायची काळजी, देखभाल ,वरील सर्व अति सुक्ष्म मापन उपकरणांविषयी शिकविले जाते. डायल टेस्ट इंडीकेटरचे कार्य तत्त्व , मुख्य भाग, बनावटीचे धातु, रचणा/ बांधणी ,कार्य पध्दती, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता. माप रिडींगचे कौशल्य,

Mass  Production इडिस्ट्रीत   पार्टस् ची अदलाबदल (ईंटर चेंजबिलीटी)  करण्याची आवश्यकता, संकल्पना,संबंधित शब्दांच्या व्याख्या  लिमीट, फीट आणि टाॅलेरन्स म्हणजे काय ? त्याचे प्रकार. मशीन, मशीन टुलची व्याख्या, मशीन टुलचे वर्गीकरण . 

ड्रीलिंग मशीन :- ड्रीलिंग मशीनचे प्रकार,त्यांचा उपयोग, पीलर टाईप , रेडीअल ड्रीलिंग मशीनची बांधणी / रचना, मुख्य भाग. ड्रीलिंगशी संबंधीत ऑपरेशन्स जसे रिमिंग, बोअरिंग, काऊंटर बोअरिंग, काऊंटर सिकिंग, टॅपिंग याचे उपयोग आणि करण्याचे कौशल्ये ही शिकविली जातात.

लेथ मशीन :- मशीनचे तत्त्व , मशीन,मशीन टुलची व्याख्या, मशीन टुलचे वर्गीकरण
लेथ मशीनचा ईतिहास आणि टप्प्या टप्प्याने झालेला विकास, लेथ मशीनचे प्रकार सेंटर लेथची रचना,वेगवेगळ्या मुख्य भागांचे कार्य. लेथ मशीनवर काम करताना घ्यावयाची सुरक्षितता. लेथ मशीनवर वापरले जाणारे टुल , त्याचे प्रकार , कटींग टुलचे बनावटीचे धातु, आकार आणि त्याचे वेगवेगळे कोन आणि त्यांचा परिणाम. ग्राईंड्रींग मशीनवर टुलला ग्राईंड्रींग करण्याची पध्दत. लेथ मशीनचे ड्रायविंग मेकाॅनिझम, त्यातील घटक आणि त्यांचे महत्त्व.  चक आणि मशीनवर जाॅब पकडण्यासाठी वापरली जाणारी  विविध साधने. चकचे प्रकार आणि त्यांचा उपयोग याबाबतही शिकविले जाते. 

लेथ मशीनवर केली जाणारी विविध ऑपरेशन्स जसे फेसिंग , टर्निंग, पार्टींग ऑफ, ग्रुव्हींग,चापरिंग, ड्रीलिंग, बोअरींग ईत्यादी. नर्लिंग ऑपरेशन त्याचे महत्त्व, ऑपरेशन करण्यासाठी वापरले जाणारे टुल (नर्ल) , त्याचे श्रेणी. टेपर टर्निंग -  टेपर दर्शविण्याच्या विविध  पध्दती , टेपरचे प्रकार , टेपर टर्निंगच्या पध्दती, प्रत्येक पध्दतीचे फायदे आणि तोटे याबाबत शिकविले जाते.. साईन बार आणि स्लीप गेजचे वर्णन, बनावटीचे धातु आणि त्यांचा उपयोग. आणि करण्याचे कौशल्ये ही शिकविली जातात.

थ्रेडचे विविध आकार/ प्रकार  , त्यांची मापे आणि थ्री वायर पध्दतीने स्क्रु मापनाची आकडे मोड. स्क्रु पिच गेजचा वापर. मॅनड्रेल , लेथ सेंटर, लेथ डाॅग,कॅच प्लेट,/ ड्रायविंग प्लेट, फेस प्लेट, त्यांचे प्रकार आणि उपयोग. स्क्रु थ्रेडचे घटक जसे मेजर डायमिटर, मायनर डायमिटर, पिच, लिड, थ्रेडची खोली . सिम्पल आणि कम्पाउड गिअर ट्रेन . लेथ मशीनवर थ्रेड कटींग (व्ही थ्रेड,  स्केअर थ्रेड  , ऑकमे थ्रेड ) करण्याचे कौशल्य शिकविले जाते.
सिंगल स्टार्ट आणि मल्टी स्टार्ट थ्रेडची संकल्पना , दोहोतील फरक, त्यांचे फायदे आणि तोटे याबाबत शिकविले जाते.

स्लोटर मशीन :- मशीनचा उपयोग, मशीनचे मुख्य भाग,  वर्गीकरण, कार्याचे तत्त्व , बांधणी, काम करताना घ्यावयाची सुरक्षितता. ड्रायव्हींग मेकॅनिझम , क्विक रिर्टन मेकॅनिझम, मशीनवर जाॅब पकडण्याच्या साधनांची माहीती.स्लोटींग ऑपरेशननुसार वेगवेगळे टुल, त्यांचे ऑगल.सदर मशीनवर वेगवेगळे ऑपरेशन करण्याचे कौशल्ये शिकविली जातात.
 
मिलिंग मशीन :- मिलिंग मशीनची ओळख, प्रकार,मुख्य भाग बांधणी / रचना , तपशिल. ड्रायव्हींग आणि फीड मेकॅनिझम याची माहीती शिकविली जाते. मशीनवर वापरले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे कटर आणि त्यांचा उपयोग.मशीनवर केली जाणारी वेगवेगळी ऑपरेशन्स याचे कौशल्ये शिकविली जातात.
मीलिंग मशीनवर वापरल्या जाणार्‍या विविध अटाॅचमेंट आणि त्यांचा वापर

व्हर्टीकल मीलिंग मशीन :- मशीनचे मुख्य भाग , बोअरिंग करण्याची पध्दत, व्हाॅरीझोनल आणि व्हर्टीकल मशीनमधील फरक. ईंडेक्सिंग म्हणजे काय? याची ओळख, ईंडेक्सिंगच्या पध्दती. ईंडेक्सिंग हेडचे प्रकार, त्यांचे वर्णन, मुख्य भाग , बांधणी/ रचना, ईंडेक्सिंग प्लेटचे प्रकार कार्य, सेक्टर आर्म चे कार्य. वेगवेगळ्या ईंडेक्सिंग पध्दतीचे गणितीय आकडेमोड.

जिग आणि फीक्चर यांची माहीती, प्रकार,उपयोग आणि फायदे व तोटे. गेज म्हणजे, त्याचे महत्त्व, वर्गिकरण, प्रकार, त्यांचा उपयोग तसेच टेमप्लेटचे महत्त्व आणि गेज व यामधील फरक याबाबतही शिकविले जाते.
वंगण (Lubricant ) त्याचे महत्त्व , गुणधर्म आणि प्रकार   तसेच मशीनवर वंगण करण्याच्या पध्दती. शीतलकाचे  (Coolant) प्रकार , महत्त्व , वेगवेगळ्या मटेरिअल प्रमाणे शीतलकांची निवड. याबाबत  शिकविले जाते. 
अभियांत्रिकी धातुचे भौतिक गुणधर्म जसे रंग, वजन, चुंबकीय गुणधर्म, गुरुत्व.   यांत्रिकी गुणधर्म जसे  कठोरता, ठिसूळपणा, कडकपणा, आणि लवचिकता.

कास्ट आर्यनचे प्रकार, गुणधर्म आणि वापर.  लोखंडाचे गुणधर्म आणि वापर. स्टील: प्रकार, गुणधर्म आणि वापर. 
 अलोह धातू (तांबे, अल्युमिनियम, कथील, शिसे, जस्त) गुणधर्म आणि वापर.अल्युमिनियम   उपयोग, फायदे आणि मर्यादा याबाबत शिकविले जाते. उष्णोपचार :-  उष्णोपचार म्हणजे काय ? याचे महत्त्व, प्रकार ,हेतु,उष्णोपचाराच्या विविध पध्दती.

ग्राईंडींग :- ग्राईंडींग व्हीलची ओळख, त्यात वापरल्या जाणार्‍या घटकांबाबत, ड्रेसरबाबत, ग्लेझिंग आणि लोडींगबाबत,
सरफेस ग्राईंडर  :- उपयोग, मुख्य भाग , रचना/ बांधणी, तपशील , मशीनवर काम करायची पध्दत आणि काम करताना घ्यावयाची सुरक्षितता. 
सिलिड्रीकल ग्राईंडर :- उपयोग, मुख्य भाग, रचना / बांधणी, तपशील,सिलिड्रीकल ग्राईडींगच्या वेगवेगळ्या पध्दती. विविध प्रकारचे ग्राईडींग व्हील त्यांचे उपयोग, व्हील मधील दोष आणि त्यावर उपाय.
टुल कटर ग्राईंडर :- मशीनची माहीती, मुख्य भाग, बांधणी / रचना,उपयोग आणि तपशिल,  वेगवेगळ्या प्रकारचे टुल रेस्ट, विविध कटर ग्राईंडरच्या अटाॅचमेंट आणि त्याचे उपयोग.

ITI Admission
या ट्रेडमध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार ईलेकट्रीकलचे बेसिक माहीती शिकवीली जाते. व्होलटेज् ,करंट,सोनेनाॅइड ( विद्युत प्रवाह वाहुन नेताना चुंबकाची भुमिका करणारा वायरची दंडगोलाकृृती काॅईल) चे कार्य. ईन्डकटर( विद्युत सर्कीटमधील घटक), मोटार,विद्युत चुंबकीय प्रेरण आधारित जनरेटरचे स्विच, फ्युज आणि सर्किट ब्रेकरचे कार्य तत्त्व, सेंसरची ओळख, प्रॉक्सिमिटी सेन्सर , त्याचे वर्गिकरण, प्रकार, कार्य पध्दती आणि कार्यरत औद्योगिक उपयोग , अंतर आणि विस्थापनासाठी सेन्सर , अल्टासोनिक आणि ऑपटीकल सेंसर यांचे कार्यरत औद्योगिक उपयोग.

गिअरची ओळख, आणि याचे प्रकार जसे स्पर गिअर, हेलिकल गिअर रॅक आणि पिनीयन, बिवेलगिअर ,वर्म आणि वर्म शाफ्ट, प्रकारानुसार प्रत्येक गिअरचे उपयोग. स्पर गिअरचे घटक आणि त्यांची व्याख्या.
रॅक:-  प्रकार , उपयोग आणि गणितीय आकडेमोड,कटरची निवड,

स्पर गिअर आणि हेलिकल गिअर , बिव्हेल गिअर, वर्म गिअर यांच्या घटकांचे मापांचे सुत्रे, गिअर कटींग करण्याचे कौशल्य शिकविले जाते. रीमर कटींगचे गणितीय आकडेमोड.ट्विस्ट ड्रील कटींगचे गणितीय आकडेमोड..रिमर आणि ट्विस्ट  ड्रील तयार करण्याचे कौशल्य शिकविले जाते.


एन.सी. आणि सी.एन.सी. मशीनची ओळख, सी.एन.सी. मशीनचा ईतिहास, सी.एन.सी. मशीन आणि पांरपांरिक मशीन यामधील फरक, सी.एन.सी. चे फायदे आणि तोटे याची माहीती शिकविली जाते. सी.एन.सी. मशीनचे वर्गिकरण, सी.एन.सी. मशीनचे प्रकार आणि त्यांचा उपयोग. सी.एन.सी. मध्ये वापरली जाणारी मुख्य भाग आणि त्यांचे वैशिष्ट्ये. उदा. सर्वो मोटर, बाॅल  बाॅल स्क्रु ,लिनिअर मोशन गाईडवेज, कट्रोल पॅनल, टरेट हेड , टुल मॅगझीन, ए. टी. एम. फीड बॅक कंट्रोल सिस्टीम, त्याचे प्रकार,
को - आॅर्डिनेट पध्दतीची संकल्पना आणि त्याचे प्रकार. सी.एन.सी. प्रोग्रामची भाषा, टर्निंग सेंटरसाठी वापरलेले जाणारे प्रिप्रेटरी फंक्शन ( G code ) त्यांचे उपयोग ,मिस्लेनिअस फंक्शन ( M  code  ) , त्यांचे उपयोग यांची माहीती शिकविली जाते.

विविध मोडची माहीती आणि त्यांचा वापर,मशीनमधील महत्त्वाच्या पोझिशन जसे मशीन झिरो पाॅइंट ,होम ,मशीनवर एखादा जाॅब तयार करतानाचा योग्य  क्रियाक्रम जसे जाॅब ड्राईंगचे वाचन , लागणारे टुल, को- ऑ र्डीनेट , प्रोग्राम एडीटींग, वर्क झिरो सेट करणे, मशीन ड्राय रनमध्ये सुरु करुन जाॅब ड्राईंग नुसार मशीनच्या स्क्रीनवर तसाच आकार दीसतो का ? नसेल दीसत तर काय करायचे. त्यानंतर  मशीन योग्य मोडमध्ये घेऊन मशीन सुरु करणे. यासर्व क्रियेनंतर  तयार झालेला जाॅब ड्राईंगच्या मापातच बनला आहे किंवा नाही हे तपासायचे. मापात  नसेल तर काय करायचे ?  
थोडक्यात   पार्टचे ड्राईंग रिडींग , टुलपाथ आणि को- आॅर्डिनेट काढणे, पार्ट प्रोग्रॅम तयार करणे, प्रोग्रॅम भरणे , वर्क पीस /  जाँब सेटींग, टुल किंवा कटर सेटींग, वर्क किंवा जाॅबचे वर्क आॅफसेट सेटींग ,ग्राफ किंवा सिम्युलेशन पहाणे,आणि प्रोग्रॅम रन करणे अशा पध्दतीने  स्टेप बाय स्टेप कौशल्ये शिकविली जातात

को - ऑर्डिनेट पध्दतीची संकल्पना आणि त्याचे प्रकार. सी.एन.सी. प्रोग्रामची भाषा,
व्ही.एम.सी.साठी वापरले जाणारे प्रिप्रेटरी फंक्शन ( G code ) त्यांचे उपयोग ,मिस्लेनिअस फंक्शन ( M  code  ) , त्यांचे उपयोग यांची माहीती शिकविली जाते.
विविध ऑ परेशनसाठी वापरले जाणारे कॅनड् सायकल , सब प्रोगाॅम यांची संकल्पना शिकविली जाते. तसेच वर्क ऑपसेट , टुल ऑपसेट नंतर पांरपांरिक मिलिंग वर केली जाणारी विविध ऑ परेशनचे प्रोग्राम तयार करणे आणि त्या प्रमाणे जाॅब करण्याचे कौशल्ये शिकविली जातात. 
सी.एन.सी मिलिंग टुल्स आणि होल्डरर्सची तसेच सी.एन.सी. मशीनवर वापरले जाणारे इन्सर्ट आणि जाॅमेट्रीविषयीची माहीती शिकविली जाते.
विविध अंतर्गत, बाह्य ऑपरेशन्ससाठी कॅनड्  सायकल.  कटिंग टूल्स मटेरियल, विविध मटेरियलचा वापर, विविध ऑपरेशन्ससाठी कटिंग टूलचे विविध प्रकार, कटींग टुलशी संबंधित टुल नोज रेडीअस कम्पेनशेसन , कटींग टुल एज जाॅमेट्री,टुल विअर,टुलाचे आयुष्यमान आणि कटींग पॅरामिटर याबाबतही शिकविले जाते.

वर्क ऑपसेट , टुल ऑपसेट वरच न थांबता, लेथ मशीनवर केली जाणारी ऑपरेशन सी.एन.सी. लेथ (टर्निंग सेंटर ) करण्याचे कौशल्ये दीली जातात.
सी.एन.सी. लेथ प्रमाणेच सी.एन.सी. मिलिंग मशीन ( मशिनिंग सेंटर ) बाबतही शिकविले जाते.
ITI Admission
विद्यार्थी विश्वासाने सी.एन.सी. मशीन हाताळु शकेलं  हा आत्मविश्वास त्यात निर्माण केला जातो . 

कारण  आता पांरपांरिक लेथ , मिलिंग मशीनपेक्ष्या सी.एन.सी. मशिनचा  चा वापर इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात केला जातो. 
वरील प्रमाणेच   विविध प्रकारचे प्रोग्रामिंग तंत्र जसे जाॅबचे बाहेरील मापे (डायमीटर) / आतील मापे (डायमीटर) ऑपरेशनसाठी वापरली जाणार्‍या विविध  सायकलबाबतची  माहीती करुन दीली जाते आणि  सदरचे कौशल्य शिकविले जाते.थ्रेडींग ( थ्रेड करणे) सायकलबोअरिंग (जाॅबचा आतील डायमीटर वाढविणे ) सायकल, ग्रुव्हींग सायकलटॅपिंग सायकल यांची माहीती करुन दीली जाते तसेच सदरची कौशल्ये शिकविली जातात. 
गुणवत्ता ही संकल्पना , याचे महत्त्व आणि आवश्यकता या बाबतहि शिकविले जाते. 

यंत्रकारागिर ( Machinist)   ट्रेड यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायची इच्छा  असेल तर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट  प्रवेश मिळतो.
नाहीतर एक वर्षाची शिकाउ उमेदवारी ( खालील कंपनीत ), त्यानंतर NCVT ची परिक्षा आणि NCVT  परिक्षा पास झाल्यावर नोकरीची संधी...

नोकरीची संधी :
सरकारी - भारतीय रेल्वे , इंडीयन ऑईल, ओएनजीसी, हिंदूस्थान पेट्रोलियम, भेल(BHEL), गेल(GAIL), भारत पेट्रोलियम, सुरक्षा मंत्रालयातील आयुधे निर्मितीच्या (ऑर्डनन्स ) कंपनीत, डाॅक यार्डमध्ये.

खाजगी नोकरी - उत्पादन आणि निर्मितीच्या कंपनीत,  ऑटोमोबाईलच्या क्षेत्रातील कंपनी, जहाज बांधणी आणि दुरुस्तीच्या क्षेत्रातील कंपनीत, विमान निर्मितीच्या क्षेत्रात. ASB International Pvt. Ltd.
NCGC, Gorej, L&T, Mahidra  & Mahindra, Themax Ltd., Bharat forge Ltd., Kirloskar Brothers Ltd., Kirloskar Pneumatic co. Ltd. या सारख्या बर्‍याच नामांकित कंपन्यात.

 अनुभव झाला की भविष्यात परदेशातही काम मिळु शकते.

मित्रांनो  या ट्रेडबध्दल अजुन काही प्रश्न / शंका असेल तर comment box मध्ये विचारु शकता. तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर दीले जाईल.
ITI Admission

टिप्पण्या