यांत्रिक प्रशितन व वातानुकुलित ( Mech. Refrigeration & Air Conditioner )ITI Admission
यांत्रिक प्रशितन व वातानुकुलित

शैक्षणिक पात्रता :- दहावी पास
                             (गणित आणि विज्ञान विषय                                                              बंधनकारक )
प्रशिक्षण कालावधी :- दोन वर्ष 
व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट 
                                  अभियांत्रिकी व्यवसाय
हा ट्रेड RAC या नावानेच जास्त प्रसिध्द / ओळखला जातो. याचे खरे नाव M. R.A.C. असे आहे. 
या ट्रेडमध्ये वातानुकूलन आणि रेफ्रिजरेसन प्रक्रियेशी संबंधित विषय आणि कूलिंग डिव्हाइसेसच्या वेगवेगळ्या भागांचे काम समाविष्ट आहे.  रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग (वातानुकूलन ) उपकरणांच्या वेगवेगळ्या भागांच्या देखभालीविषयी आणि दुरुस्तीची कौशल्ये शिकविली जातात

आता तुम्हाला  या ट्रेडचे महत्त्व कळाले असेलच . पुर्वीच्या काळी एखाद्याच्या घरात फ्रीज असली म्हणजे श्रीमंत समजला जायचा. पण आता तसे नाही, फ्रीजही आता जीवनावश्यक वस्तु झाली आहे. थोड्या फार प्रमाणात एअर कंडीशनरचे ही तसेच म्हणता येईल. थोडक्यात वस्तुचे प्रमाण वाढायला लागले म्हणजे त्याची निगा / देखभाल आणि दुरुस्तीचे काम आलेच ना ?  यासाठी या ट्रेडलाही बाजारात खूप मागणी आहे. 

या ट्रेडच्या दरम्यान  विद्यार्थ्यांना रेफ्रिजरेटर, वॉटर कूलर, बाटली कूलर, डीप फ्रीजर, व्हिझी कूलर, वॉक इन कूलर, आईस्क कँडी प्लांट, कोल्ड स्टोरेज, आईस्क प्लांट, स्प्लिट एअर कंडिशनर, पॅकेज एअर कंडिशनर,  सेंट्रल एअर कंडिशनर, ऑटो मोबाइल एअर कंडिशनर, ट्रान्सपोर्ट रेफ्रिजरेशन, एअर क्राफ्ट वातानुकूलन,  आणि वातानुकूलन आणि या सेवांशी संबंधित इतर अनेक बाबीचे कौशल्ये शिकविली जातात. 

आर.ए.सी च्या कार्यशाळेत घ्यावयाच्या सुरक्षिततेची खबरदारी आणि प्रथमोपचार, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनचा इतिहास ,रेफ्रिजरेशनची मूलभूत तत्त्वे.  युनिट्स आणि मोजमाप.  दाब आणि त्याचे मोजमाप.  उष्णता आणि तापमान.  वाफ कॉम्प्रेशन सायकलचे काम.  वाफ कम्प्रेशन सिस्टमचे निम्न बाजू आणि उच्च बाजूचे घटक आणि घटकांचे कार्य रेफ्रिजंटचे वर्गीकरण, गुणधर्म, रासायनिक नाव आणि सूत्र.  ओझोनचा नियम, ओझोन नियम 2000 या बाबतची माहिती सांगितली जाते. 

या ट्रेडमध्ये फीटर ट्रेडचे प्राथमिक कौशल्ये शिकविली जातात ,
जसे विविध प्रकारचे फिटिंग हँड टूल्स, विजेवर चालणारी  साधने , अचूक मोजमाप साधने  जसे व्हर्निअर कॅलिपर , हाईट गेज, डेप्थ व्हर्निअर कॅलिपर , आउट साईड व इनसाईड मायक्रोमिटर या साधनांची कार्य तत्त्व, मुख्य भाग त्यांचे उपयोग, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता, एखाद्या वस्तुच्या मापाचे वाचन याबाबतचे कौशल्य शिकविले जाते.    ड्रिलिंग मशीन, ग्राइंडिंग मशीन, यांचे प्रकार, वैशिष्ट्य आणि काम करताना घ्यावयाची निगा आणि दुरुस्तीबाबत शिकविले जाते.

या ट्रेडमध्ये पत्रे कारागिर या ट्रेडचे प्राथमिक कौशल्ये शिकविली जातात.
जसे शीटचे आकार, व्यावसायिक आकार आणि विविध प्रकारच्या धातूच्या शीटचे आकार, व्यावसायिक आकार आणि विविध प्रकारच्या धातूच्या शीट पत्रे  धातूची साधने आणि उपकरणे , त्यान्ची निगा  आणि देखभाल .  शीट मेटल मध्ये वापरले जाणारे सांधे/ जॉईंट आणि त्यांचा वापर प्रकार.  रीव्हेटचे प्रकार आणि रिव्हेटींगचा वापर.

 या ट्रेडमध्ये ईलेक्टीकलचे प्राथमिक कौशल्यही  शिकविली जातात 
जसे इलेक्ट्रिकल हँड टूल्स आणि मापनाची  साधने , त्यांचे प्रकार, वैशिष्ट्य, वापर, काम करताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षाविषयक नियम. ट्रेडमध्ये वापरल्या जाणार्‍या सामान्य संज्ञा.  कंडक्टर आणि इन्सुलेटर.  निवडक सिम्बोलस् बाबत शिकविले जाते. प्रथमोपचार  विद्युत प्रवाह, व्होल्टेज, प्रतिरोध आणि त्यांची युनिट्स  साधे विद्युत सर्किट, विद्युत सर्किटची  आवश्यकता, सिरिज आणि पॅरलर सर्किट.  विविध प्रकारचे रेझिस्टनस्.  अर्थिंग आणि फ्यूज  प्रकार, ग्रेड आणि इन्सुलेटेड वायर आणि केबल्सचे आकार - त्यांचीकामानुसार  निवड आणि वापर.  वायरिंगसाठी सामग्रीची यादी तयार करणे.  स्विचेस, एसी मोटर, स्टार्टर्स आणि ट्रान्सफॉर्मर.  त्यांची कार्यरत तत्त्वे, तपशील आणि वापर.   कॅपेसिटर आणि पीटीसी चालु करणे  मोटर संरक्षण उपकरणे. 
ITI Admission

या ट्रेडमध्ये ईलेक्टोनिक्सचे  प्राथमिक कौशल्यही  शिकविली जातात . 
जसे ईलेक्टोनिक्सची ओळखसेमी कंडकटरची ओळख.  सेमी कंडकटरचे  मूलभूत तत्त्वे, डायोड्स सुधारणेचे तत्त्वे आणि उपयोग, व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून झेनर डायोड - ट्रान्झिस्टर पॅरामीटर्स- सीबी, सीई, सीसी, कॉन्फिगरेशन, एम्पलीफिकेशन.
 
 या ट्रेडमध्ये वेल्डर ट्रेडविषयी प्राथमिक माहीतीही  शिकविली जाते.
जसे सामान्यतः वापरल्या जाणार्‍या वेल्डिंग प्रक्रियेच्या मूलभूत तत्त्वांचा परिचय, आर्क वेल्डिंग, ऑक्सी इंधन गॅस वेल्डिंग, ब्रेझिंग.
 वेल्डिंग साधने आणि उपकरणे  आणि वापर.  वेल्डिंगमधील सुरक्षा पद्धत.  गॅस वेल्डिंगची पद्धत, वापरलेली गॅस आणि ज्वाला समायोजन उपकरणे . फिलर मटेरियल, जॉईंट चे सामर्थ , सोल्डरिंग आणि ब्रेझिंग त्यांचा उपयोग आणि सोल्डरिंग आणि ब्रेझिंग मधील फरक , ब्रेझिंग / सोल्डरिंगसाठी ऑक्सी        एसिटिलीन, ऑक्सी एलपीजी आणि एअर एलपीजीचा वापर.
 सिंगल डोर रेफ्रिजरेटरची माहिती: - रेफ्रीजरंट ( एक घटक जे कृत्रिमरित्या थंड असते आणि अन्न व पेय साठवणुक करण्यासाठी वापरले जाते.) प्रकार, त्याची बांधणी अभ्यासणे व कॉम्प्रेसर(रेफ्रिजरंट दाबण्यासाठी वापरले जाणारे उपकरण), कंडेन्सर (वाफेचे रुपांतर घनरुपात करणारे उपकरण), कॅपिलॅरिज (केसासारखी आतील व्यास असणारी नळी) आणि बाष्पीभवन, सक्शन हीट एक्सचेंजर (उष्णता एका माध्यमातुन दुसर्‍या माध्यमात स्थानातंरित करणारे उपकरण), डोर  , गॅस्केट याबाबत शिकविले जाते.  उष्णता इन्सुलेशन साहित्य, विद्युत घटक.  बाष्पीभवन आणि कंडेन्सरमध्ये फ्लशिंगचे महत्त्व, कॅपिलॅरिज ड्रायर बदलण्याची आवश्यकता, रेफ्रीजरंट गळतीची चाचणी करणे, गॅस चार्ज करण्याची पद्धत.  रेफ्रिजरेटर्समध्ये जे रेफ्रिजरेट्स वापरतात त्याचे गुणधर्म याविषयी शिकविले जाते. 

फ्रॉस्ट फ्री  रेफ्रिजरेटर (२- 3 दरवाजा रेफ्रिजरेटर ) : - (2- 3 दरवाजा) फ्रॉस्ट फ्री  रेफ्रिजरेटरच्या बांधणी/ रचनेचा अभ्यास करणे,      एअर डक्ट सर्किट, फ्रीजरमध्ये तापमान नियंत्रण आणि रेफ्रिजरेटरचे कॅबिनेट, स्वयंचलित डीफ्रॉस्ट (बर्फ काढण्यासाठीची) यंत्रणा. विद्युत उपकरणे आणि त्यांचे कार्य  रेफ्रिजरेटर कॅबिनेट व्हॉल्यूमची  गणना. यात येणार्‍या  दोषांचा अभ्यास करणे,  आणि त्यावर उपाय करणे  याबाबतचे कौशल्ये शिकविली जातात.

विंडो एअर कंडिशनर: - विंडो एअर कंडिशनरची बांधणी/ रचना,  आणि कार्य.  विंडो एअर कंडिशनरची निगा आणि नियमित देखभाल, ईंन्टोल करण्याची  प्रक्रिया.  विंडो एअर कंडिशनरमध्ये आढळणारे दोष  आणि त्यावरील उपाय बाबतचे कौशल्य शिकविली जातात.

स्प्लिट एअर कंडिशनर: - बांधणी /रचना  आणि कार्य , विविध घटक, इलेक्ट्रिकल सर्किट्स, चाचणीचे घटक.  फॉल्ट शोधणे, रेफ्रीजरंट लीक होतेय का त्याची टेस्ट.  गॅस चार्जिंग .इन्सुलेशन .येर्‍या अडचणी सोडविण्याचे कौशल्य शिकवितात.

 कंडेन्सर (वाफेचे - वायु रुप घनरुपात करण्यासाठीचे एक उपकरण ): - कंडेन्सरचे कार्य,  प्रकार.  एअर कूल्ड कंडेन्सरची  बांधणी / रचना , एअर कूल्ड कंडेनसरची गणना क्षमता. चॉक केलेल्या कंडेनसरचा प्रभाव.  एअर कूल्ड कंडेनसर चे फायदे याविषयी शिकविले जाते.

काॅम्प्रेसर (रेफ्रीजरंट दाबण्यासाठीचे एक उपकरण): - कॉम्प्रेसरचे   कार्य सिद्धांत  आणि त्याचे प्रकार जसे कि रेसिप्रोकेटींग , रोटरी, स्क्रोल, स्वॅश प्लेटसाठी वापरली जाणारी  ल्युबिंकेशन पद्धत. ल्युब्रिंकेटरचे प्रकार , त्याचे कार्य, गुणधर्म, ल्युब्रिंकेशनच्या पध्दती. कॉम्प्रेसरची  कार्यक्षमतेचे  घटक.  
तसेच व्यावसायिक काॅम्प्रेसचे प्रकार , त्यांची बांधणी आणि  व्यावसायिक काॅम्प्रेसरचे  कार्य ,त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे घटक सेंट्रीफ्युगल आणि  स्क्रु काॅम्प्रेसरचे कार्य तत्त्व आणि त्याची बांधणी याविषयी शिकविले जाते. 

 इव्हापोरेटर (घनरुपाचे वाफेत वायुत रुपातंर करणारे साधन ): -  कार्य करणारे तत्त्व , रेफ्रिजरेटरमध्ये वापरले जाणारे इव्हापोरेटरचे  प्रकार. वॉटर कूलर, बाॅटल कुलर, विंडो आणि स्लिट एअर कंडिशनर. ऑ कुमुलेटर कार्य आणि प्रकार. डीफ्रॉस्टिंगच्या ( बर्फ साफ करण्याची क्रीया ) पद्धती. घरगुती रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये वापरले जाणारे एक्सपान्शन व्हाॅल्व ( विस्तार व्हाॅल्व हे रेफ्रिजरेशन सिस्टममध्ये रेफ्रिजंट प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे एक  साधन)  आणि ड्रायर  (रेफ्रीजरंटधील ओसावा किंवा द्रव काढणारे साधन ). याचे कार्य शिकविले जाते. 
ITI Admission


कॅपिलॅरिज ( केसासारखी आतील व्यास असणारी नळी.), स्वयंचलित आणि थर्मोस्टॅटिक एक्स पानशान व्हाॅल्व यांचा कार्याबाबतही शिकविले जाते.
थर्मल इन्सुलेशन (म्हणजे उष्णता हस्तांतरण कमी करणारे उपकरण) चे कार्य , त्याचे प्रकार,
रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये वापरल्या जाणार्‍या उष्णता इन्सुलेशन सामग्रीचे थर्मोडायनामिक (उष्णता व यांत्रिक काम यांच्या परस्परसंबंथीचे शास्त्र ) गुणधर्म.

कोल्ड स्टोरेज: - कोल्ड स्टोरेज प्लांटममधील मुख्य पार्टस् , त्याची बांधणी /  रचना,   अॅप्लिकेशन्स, कंट्रोल आणि इलेक्ट्रिकल डायग्रामचा अभ्यास.  अन्न संरक्षण  रेफ्रिजरेशन सिस्टमद्वारे जतन कसे केले जाते, कोल्ड स्टोरेजचे प्रकार आणि त्याची विस्तीर्ण माहीती याबाबत शिकविले जाते.

कार वातानुकुलन यंत्रणा :-  या यंत्रणेत वापरले जाणारे विविध घटक, ईलेक्टीकल सर्किट , यंत्रणेतील दोष शोधणे, रेफ्रीजरंट लिक होत आहे का त्याची चाचणी, या यंत्रणेत रेफ्रीजरंट भरणे, ही यंत्रणा स्थापीत करणे, येणारे दोष दुर करणे याबाबतचे कौशल्य शिकविले जाते.

कुलिंग टॉवरचे  महत्त्व, त्याचे प्रकार , बांधणी . विविध प्रकारच्या कुलिंग टाॅवरचे फायदे आणि तोटे. कारखान्यात वापरल्या जाणार्‍या पाण्यावर प्रक्रिया करण्याची आवश्यकता. वापरात येणारे पंप या  दिली जाते. 

बर्फ प्लांट / कॅंडीचे 
कार्य, बांधणी, कार्य तत्त्व, सर्किट आकृती, क्षमता आणि प्रकार.   कार्य पध्दती देखभाल राखण्याचे कौशल्य शिकविले जाते.

हा  ट्रेड यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायची इच्छा  असेल तर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट  प्रवेश 
नाहीतर एक वर्षाची शिकाउ उमेदवारी ( खालील कंपनीत ), त्यानंतर NCVT ची परिक्षा आणि NCVT  परिक्षा पास झाल्यावर नोकरीची संधी...
iti admission
नोकरीची संधी :
सरकारी - भारतीय रेल्वे , इंडीयन ऑईल, ओएनजीसी, हिंदूस्थान पेट्रोलियम, भेल(BHEL), गेल(GAIL), मंत्रालयातील आयुधे निर्मितीच्या कंपनीत, BARC,  BMC , TMC , या सारख्या ठिकाणी . 

खाजगी नोकरी - परिवहन रेफ्रिजरेटर , विमान एअर कंडिशनिंग,ऑटोमोबाइल एअर कंडीशनिंग , शिप रेफ्रिजरेटर ,आणि एअर कंडिशनिंग या सारख्या मोठ्या  ठिकाणी, आईस प्लांट ,कोल्ड स्टोर, आईस कँडी प्लांट  या ठिकाणी प्लांट ऑपरेटर म्हणून.  गोदरेज , टाटा , हिताची , ब्लू स्टार , व्हिडिओकॉन , या सारख्या एअर कंडिशनिंग आणि फ्रिज ,वॉटर कूलर, डिप फ्रीझर, सेंट्रल ए सी प्लॅन्ट, आईस कँडी प्लँट बनविणाऱ्या कंपनीत नोकरी लागू शकते. मोठ्या गॅरेज मध्ये वाहनांतील एअर कंडिशनिंग यंत्रणा दुरुस्तीचे काम , मोठे मॉल, हॉस्पिटल, कार्पोरट ऑफिसेस मध्येहि , A.C. , सेंट्रल A.C. प्लांट ची निगा आणि दुरुस्ती करण्यासाठी RAC मेकॅनिकल ची गरज असतेच. 

याव्यतिरिक्त ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते अशा होतकरू प्रशिक्षणार्थीना स्वतःचा व्यवसाय सुरू करून नोकरी पेक्षा जास्त पैसा कमविण्याची संधी प्राप्त होते. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घर, शाळा, दुकाने, लहान ऑफिसेस,  या ठिकाणी फ्रिज  आणि एअर कंडिशनर  च्या संबधित मशीन  चा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो,

कामाचा चांगला अनुभव झाला की भविष्यात परदेशातही काम मिळु शकते.

मित्रांनो  या ट्रेडबध्दल अजुन काही प्रश्न / शंका असेल तर comment box मध्ये विचारु शकता. तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर दीले जाईल.
ITI Admission

टिप्पण्या

 1. Good morning sar
  Sar mla kam jamat nahi aajun pan mla kam करायची खूप इच्छा आहे पण मला काम लागत आहे कुठ आसेल तर मग मला सांगा सर

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. आपण जेथे रहाता तेथे एखाद्या mechanical कडे काम करा. म्हञजे काम जमेल. फक्त जिद्द सोडायची नाही.

   हटवा
 2. Tu course purn kar kaam 100% milel. maza contact no.9960479590 Ha aahe Diesel mechanic course kar course kelyavar companyit job garanty mazi

  उत्तर द्याहटवा
 3. Sir ya RAC Tread madhe kontya sector madhe Dimand aahe government ki private

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. हा trade पूर्ण केल्यानंतर Govt job पण लागू शकतो, आणि private job पण लागू शकतो.
   आणि विशेष म्हणजे थोड्याश्या साधनसामुग्रीत स्वतःचा व्यवसाय करून भरपूर पैसा कमवू शकतो.

   हटवा

टिप्पणी पोस्ट करा