नळकारागिर (Plumber)

ITI Admission

नळकारागिर (Plumber)                                    


 शैक्षणिक पात्रता :- दहावी अनुत्तीर्ण (नापास) / पास 
पास असेलेल्या उमेदवारास प्रथम प्राध्यान 
 प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
  व्यवसायाचा प्रकार :- बिगर मशीन गट
                                    अभियांत्रिकी व्यवसाय
मित्रांनो,
नळाचे काम करणारा तो नळकारागिर आता मला सांगा हा कारागिर कोणाच्या घरात आला नाही असे कोणते तरी घर असेल का  ? हो , असे होऊच शकत नाही. थोडक्यात पाईप लाईनचे, नळातून पाणी गळणे ,नळ बदलणे यासाठी हा कारागिर आपल्या घरात एकदा ना एकदा आला असेलच. निवासी आणि व्यावसायिक ठीकाणी गरम पाणी, थंड पाणी  वितरण आणि स्वच्छता प्रणालींशी संबंधित पाईप्स आणि फिक्स्चरची जोडणी, त्यांची  देखभाल आणि दुरुस्ती करणे , ड्रेनेज आणि इतर प्लंबिंग सिस्टमची तपासणी करणे,पाणी ,वायू, वाफ इत्यादीसाठी पाईप लाईनची जोडणी करणे ,
या ट्रेडमध्ये वेल्डर, फीटर, गवंडी (मेसन) आणि सुतारकाम या ट्रेडचे प्राथमिक कौशल्येही शिकविली जातात.

बांधकाम क्षेत्रात या ट्रेडला फार महत्त्व आहे.  अल्पमुदतीचा आणि कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय सुरु करता  येणारा  असा हा  ट्रेड आहे.  आपल्या आजुबाजुला बांधकाम व्यवसाय तेजीत असल्याने  प्लंबरचे महत्त्व गल्लीपासुन ते जागतिक पातळीपर्यंत वाढल्याने त्यास अमाप मागणी आहे.
आपणास आता नळकारागिराच्या  कामाचा विस्तार  लक्षात आला असेलच.

चला तर या ट्रेडमध्ये काय काय शिकविले जाते ते पाहुया....

नळकारागिराचे काम करताना घ्यावयाची आवश्यक खबरदारी आणि सुरक्षा याचे महत्त्व, ट्रेडचे महत्त्व, सुरक्षेची ओळख , अग्नि  म्हणजे काय ? अग्निचा त्रिकोन,अग्निचे प्रकार, अग्निशमन यंत्र त्याचे प्रकार आणि योग्य अग्निच्या प्रकारानुसार वापरावयाचे अग्निशमन यंत्र याचे बाबतचे  शिकविले जाते. प्रथमोपचार , 
 फिटरच्या हॅन्ड टुल्सची ओळख जसे, पंच, फाइल्स, हातोडा, चीझल ,हॅकसो  फ्रेम ,पाने,पकड, स्क्रेव 
वर्णन आणि ते कोणत्या धातुपासुन बनविलेली असतात,
ड्राइवर ,इत्यादी. 
फाइल्सचे प्रकार, वर्गीकरण ,  याचे धातू,फाईलच्या मुख्य भागांचे नाव   ,वेगवेगळ्या फाईलचा  उपयोग आणि फाईलिंगच्या पध्दती, मार्किंग करण्याची साधने, तसेच  हातोडा,हातोड्याचे प्रकार त्यांचा उपयोग, बनावटीचे धातू  चिझल - प्रकार , उपयोग,बनावटीचे धातू. धातु कापण्याची साधने आणि त्यांचा उपयोग. व्हाईस चे प्रकार. , पाईप व्हाईस ची माहिती , मुख्य भाग, बनावटीचे धातू.  आणि उपयोग. 
 फिटिंग ची सोपी ऑपरेशन्स जसे धातु कापणे,  पंचिंग आणि फाईलिंग, फिटिंग याचे कौशल्य शिकविले जाते.
 बेंच ड्रिलिंग मशीनचे वर्णन, त्याचे मुख्य पार्टस्  आणि त्यांचे कार्य, ड्रिल, टॅप्स आणि डाय वापरण्याची पद्धत 
 शिकविली जाते.  ड्रीलिंग मशीनवर जाॅब बांधण्यासाठी विविध प्रकारची उपकरणे आणि साधने आणि ड्रीलिंग मशीनवर ड्रीलिंग ऑपरेशन करण्याचे कौशल्य शिकविले जाते.

सोल्डरिंग आर्यन ( सोल्डरिंगसाठी वापरले जाणारे उपकरण)  आणि 
ब्लो लॅप ( हे एक पोर्टेबल साधन आहे जे सोल्डरिंगसारख्या उष्मा कामासाठी ज्योत तयार करते.) यांचे वर्णन आणि वापर ,सोल्डर वायर, सोल्डरिंग फ्लक्सचे (जेली सारखा पदार्थ याने ज्यावर सोल्डरिंग करावयाची आहे त्या पृठ्षभाग साफ होतो.) प्रकार,
सोल्डरिंग करतानाची सावधगिरी , सोल्डरिंगचे प्रकार , हार्ड  सोल्डरिंगआणि साॅप्ट सोल्डरिंग  - त्यांचे गुणधर्म, रचना आणि वापर तसेच सोल्डरिंग करण्याचे कौशल्य शिकविले जाते.

सुतारकामासाठी वापरली जाणारी हॅन्ड टुल्स आणि साधने, त्यांचे वर्णन आणि वापर, लाकडाचे सामान्य प्रकार- त्यांचे वर्णन लाकुड कापण्यासाठी , मार्किंगसाठी,
 लाकडाचा पृष्ठभाग सपाट करण्यासाठी 
साधे सांधे तयार करण्यासाठीच्या ,
 या ऑपरेशन्ससाठी वापरली जाणारी साधने,तसेच ही ऑ परेशन करण्याची माहिती शिकविली जातात. .
 
गवंडीची (मेसन) हॅन्ड टुल्सचीनावे, वर्णन आणि त्यांचे उपयोग.   भिंती आणि मजल्यांवर छिद्र पाडण्याची पध्दत , विटा, चुना आणि सिमेंटची संकल्पना. रेती,सिमेंट आणि पाणी यांच्या मिश्रणाने माल  (मोर्टार) तयार करणे. विविध रचना साहित्य. सामान्य वीट जोडणी, बंधांचे वर्णन, मचान प्लास्टरिंग. मॅनहोल इ. बांधण्याची पद्धत ,
 साधा सिमेंट, काँक्रीट, आरसीसी आणि त्याचे प्रमाण,
खडीची श्रेणी खडबडीत खडी आणि बारीक खडीची, तसेच  वॉटरप्रूफिंगसाठी वापरली जाणार्‍या  कंपाऊंडचे ज्ञानही शिकविले जाते. तसेच इलेक्ट्रिकल साधनांच्या साहाय्याने भिंत कापणे ( कोरणे ), भिंत प्लास्टरिंग करणे, फ्लोअरिंग दुरुस्त करणे चे कौशल्य शिकविले जाते.


    ITI Admission                                                                    प्रत्येक ईमारतीच्या वापराच्या प्रकारानुसार आवश्यक 
 असलेल्या प्लंबिंग सेवा ओळखणे, नळकारागिराच्या  साधनांचे आणि उपकरणांचे वर्णन, रॅचेट, ब्रेस, थ्रेडिंग डाय,पाईप पाना, सरकता रेंच, स्पॅनर सेट,चेन रेंच इत्यादि साधने आणि त्यातंच वापर  आणि त्यांची निगा राखणे. प्लंबिंग विषयक चिन्हे. नळकारागिराच्या साधनांचा वापरआणि निगा. पाईप्सचे मार्केटमध्ये असणारे  विविध प्रकार. पाईप जोडण्यासाठीच्या  फिटिंग-बेंड, कोपर, सॉकेट, टीज, युनियन इत्यादी,  त्यांचे वर्णन, तपशील आणि उपयोग.वेगवेगळ्या सांध्यासाठी फिटिंगचे प्रकार आणि भिन्न पाईप्स, पाईप फिटिंग्जचे वर्णन. पाईग जोडणीच्या  पद्धती आणि त्यांचे उपयोग. पाईप फीटींगचे   करताना घ्यावयाची खबरदारी तसेच साधे पाईप फिटिंग जोडणीचे कौशल्य शिकविले जाते.

जड आणि साॅफ्ट पाणी, तात्पुरते जडपणा आणि कायमस्वरूपी जडपणा  चाचण्या आणि  स्थिर
दाबाचे मोजमाप, अचानकतेचे दाब अतिशीत आणि गरम पाण्याचा विस्तार.
बर्नौलीची तत्त्वे, पास्कलचा नियम.  जलाशयातील , टाकीतील पाण्याचा दाब, पाईप लाईनमधील पाण्याचा हातोडा ही  संकल्पना . गरम गॅस वेल्डींगसाठीचे उपकरणे व साधने , आणि पाॅलिप्रोपीलेन रॅन्डम कोपोलिमर (PPR)  पाईप ज्वाइंटसाठी ईलेक्टीक हाॅट प्लेट.

जल शुध्दीकरणाचे टप्पे आणि पद्धती, पाण्याच्या  अशुद्धतेचे प्रकार  सेंद्रिय आणि अजैविक शुद्धी , पाण्याचे स्त्रोत, जीआय, पीव्हीसी / सीपीव्हीसी आणि एचडीपीई या मटेरीअलचे पाईप जॉइन करण्यासाठी विविध प्रकारचे सांधे बनविली जातात त्याबाबची माही दीली जाते. 

छोट्या शहरांत असणारी  पाणीपुरवठा यंत्रणा.  विविध प्रकारच्या पंपांचे वर्णन सेंट्रीफ्यूगल पंपाची ओळख, पंपाचे तत्त्व, मोनो प्रकाराचा पंप ,हायड्रो- न्युमॅटीक (बस्टर) पंप आणि  सबमर्जिबल पंप,त्याचे प्रकार, उपयोग आणि मांडणी याबाबत शिकविले जाते.इलेक्ट्रिकल पंप , संकशन व्हाल्व , डिलिव्हरी व्हाल्व , फूट व्हाल्व यांची फिटिंग करण्याचे कौशल्य शिकविले जाते.

भारतीय आणि अमेरिकन टाॅयलेट भांड्याची रचना,फ्लशिंग टँकची रचना, त्यातील मुख्य घटक  आणि कार्य तत्त्व, फ्लशिंग टँक बसविण्याची  पध्दतआणि घ्यावयाची खबरदारी ,
iti  admission 

डीर्वरटर(पाण्याचा प्रवाहाचा मार्ग बदलणारे साधन- टींग), वॉल मिक्सर ( एक युनिट आहे जे भिंतीवर फिट आहे आणि गरम आणि थंड पाण्याची सोय आहे आणि त्यास एक सामान्य स्पॉट जोडलेले आहे.), हॅन्ड शाॅवर यांची रचना, बसविण्याची पध्दत आणि बसविताना घ्यायची खबरदारी,

पिलर कॅक, बाॅटल ट्रॅपबाटलीसारखे जलाशय जे एका नाल्याच्या खाली पाईप बसवतात आणि कचरा गोळा करतात.) आणि बाथरुममधील बाकीच्या साधनांची रचना , उपयोग आणि बसविण्याची पध्दत आणि घ्यावयाची खबरदारी यांचे कौशल्ये शिकविली जातात.

विविध प्रकारचे युविनल ( लघुशंकेचे )भांडे , त्याची रचना, बसविण्याची पध्दत आणि बसविताना घ्यावयाची खबरदारी याचे कौशल्य शिकवितात.

सोलेनॉइड व्हाॅल्व ( इलेक्ट्रिकली कार्य करतो व्हाॅल, सामान्यत: द्रव उर्जा प्रणालींमध्ये हवेचा किंवा द्रवाचा प्रवाह किंवा दिशा नियंत्रित करण्यासाठी वापरतात.)  आणि 
युरीनल सेनसर यांचे कार्य तत्त्व तसेच डीजिटल बेसिनची रचना, कार्य तत्त्व आणि याची रचना / बांधणी आणि मांडणी आणि बॅटरी बदलण्याची पध्दतही शिकवितात.

थोडक्यात मॉडर्न बाथरूम मध्ये जे काही टाॅयलेट पॉट , फ्लशिंग टँक,  डीर्वरटर, वॉल मिक्सर, हॅन्ड शाॅवर , पिलर कॅक, बाॅटल ट्रॅप, युविनल पॉट , सोलेनॉइड व्हाॅल्व , युरीनल सेनसर याचे फिटिंग करण्याचे  कौशल्ये शिकविली जातात.

मित्रांनो हा ट्रेड यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर एक वर्ष शिकाऊ ऊमेदवारी करावी लागते शिकाऊ ऊमेदवारी आपणास भारतीय रेल्वे, ONGC, LPG , हिंदुस्तान पेट्रोलिअम, भारत पेट्रोलिअम ,महापालिकेच्या आस्थापनेतJaguar , Hinware , Kohler  , Johnson , Sona field ceramic या सारख्या स्वच्छता विषयक उत्पादने बनविणार्‍या कंपन्या, थ्री स्टार ,फाय स्टार हाॅटेल मध्ये शिकाऊ ऊमेदवारीही मिळते.
 या. त्यानंतर NCVT ची परिक्षा त्यापरिक्षेत पास झाल्यावर नोकरी अथवा स्वत:चा व्यवसायही करु शकतात.

सरकारी नोकरी :- भारतीय रेल्वे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन  लिमिटेड , भाभा रिसर्च सेन्टर ,ONGC, LPG, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ  ,माझगाव डॉकयार्ड ,  ग्राम पंचायत ,  जिल्हा परीषद , नगरपालिका, महानगरपालिका यांच्या आस्थापनेत . 

खाजगी नोकरी :- 
मोठमोठ्या केमिकल कॅम्पनीज मध्ये पंप ऑपरेटर , पाईप फिटर , प्लम्बिंग  सुपरवायझर , Jaguar , Hinware , Kohler  , Johnson , Sona field ceramic या सारख्या स्वच्छता विषयक उत्पादने बनविणार्‍या कंपन्या, बांधकामविषयक कंपन्या ,  मोठमोठे मॉल मध्ये   , कॉर्पोरेट ऑफिसेस , मोठमोठे हॉस्पिटल थ्री स्टार ,फाय स्टार हॉटेल  मध्ये एजेन्सीमार्फत नोकरीची संधी .

परदेशात कॅनडा, मलेशिया, दुबई, शारजा ,कतार, अबुधाबी, या सारख्य अरब देशात चांगल्या पगाराची नोकरीहि लागू शकते. 
मित्रानो हाच असा एकमेक तांत्रिक व्यवसाय आहे कि कमीत कमी ( अंदाजे दोन ते तीन हजार ) गुंतवणुकीवर आपण व्यवसाय सुरु करू शकतो..सोलर फिटिंगची कामे , वॉटर फिल्टरची दुरुस्तीची कामे. वॉटर मीटर रिपेरिंगची कामेही करू शकतो. 
ITI Admission
मुंबई महापालिका व्यतिरिक्त बाकी महापालिका भागात आय .टी . आय . NCVT  नंतर प्लम्बरचा परवाना मिळून आपणही मोठी काम मिळवू शकतो.   मुंबई महानगरपालिका भागात या परवान्यासाठी सिविल मधून डिप्लोमा किंवा डिग्री असणे आवश्यक आहे.

 जर कोणा कडे प्लम्बर कामाचे कौशल्य आहेत पण  सर्टिफिकेट नसेल तर INDIAN PLUMBER SKILLS COUNCIL ( IPSC ) कडून त्याची  परीक्षा भेटली जाते व त्याचे प्लम्बरचे कौशल्य  पाहिले जाते, या सर्टिफिकेट नंतर तो प्लम्बर  म्हणून आपले करिअर सुरु करू शकतो. 
ITI Admission

टिप्पण्या