कातारी - Turner

ITI Admission
कातारी ( TURNER )

शैक्षणिक पात्रता :- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक)
प्रशिक्षण कालावधी :-  दोन वर्ष
व्यवसायाचा प्रकार :- मशीन गट - अभियांत्रिकी व्यवसायमित्रांनो,
कातारी म्हणजे लेथ मशीनवर काम करणारा कारागिर , कातारी हा शक्यतो दंडगोलाकार धातुच्या/ लाकूड / प्लास्टिक  मटेरीअलवर धारदार कडेच्या ( कटींग टुल ) सहाय्याने स्वतःभोवती फिरणाऱ्या जॉबवरचे अनावश्यक मटेरीअल कापुन जाॅब ड्राईंगनुसार योग्य आकारात  तयार करतो. . याचे  साधे सरळ उदाहरण म्हणजे स्वयंपाकघरातील लाटणे पोळपाट ,  देवाऱ्याला जे नक्षीदार खांब असतात ते कातारी बनवीत असतो.  अशाच आकाराचे मशीनचे पार्टस , शाफ्ट , वेहिकल मधील क्रँकशाफ्ट , समई . 
चला तर या ट्रेड मध्ये शिकविले जाते.काय शिकविले जाते ते पाहूया......

कातारीच्या शॉप फ्लोअरवर (काम करायचे ठिकाण) काम करताना  सुरक्षिततेचे महत्त्व आणि सर्वसाधारण खबरदारी, प्रथमोपचार परिचय ,  स्वत:च्या सुरक्षिततेचे साधने यांचा परिचय   5S संकल्पना आणि त्याच्या उपयोग व महत्त्व, आगीची व्याख्या, आगीचा त्रिकोण , आग विझविण्याची साधने,अपघात होण्याची कारणे  मोजमाप  करण्याची साधने,त्याची युनिट्स, डिव्हिडर्स, कॅलिपर, हर्माफ्रोडाइट, सेंटर पंच, डॉट पंच, त्यांचे वर्णन आणि विविध प्रकारचे हातोडी त्यांचा प्रकार आणि उपयोग,  ‘व्ही’ ब्लॉक्स, अँगल प्लेट. 

या ट्रेडमध्ये आय.टीआय. मधील फीटर या ट्रेडचे प्राथमिक कौशल्ये शिकविली जातात.
लिनिअर मापनाची मापन उपकरणे जसे स्टील रुल , कोनीय मोजमाप करणारी उपकरणे त्यांचे मुख्य भाग जसे  ट्राय स्केअर .प्रोटाॅकटर , काँमिनेशन सेट यांचे वर्णन, वापर आणि काम करताना घेतली जाणारी  काळजी
व्हाईस — त्याचे प्रकार , जसे बेंच व्हाईस, पाइप व्हाईस, पिन व्हाईस, लेग व्हाईस  मुख्य भाग , बांधणी , बनावटीचे धातु, उपयोग , काम करताना घ्यावयाची काळजी, आणि देखभाल  याबाबतचे ज्ञान दीले जाते.
पंचचे प्रकार , बनावटीचे धातु , आणि  वापर.   हॅक्सॉ फ्रेमचे आकार,प्रकार, भिन्न भाग तसेच  हॅक्सॉ ब्लेड-आकार, भिन्न भाग आणि ग्रेड . सरफेस प्लेट, अँगल प्लेट , व्ही ब्लॉक यांची  आवश्यकता आणि वापर .  टॅपचे प्रकार, टॅपचा उपयोग, टॅपिंग करताना घ्यावयाची काळजी आणि निगा.  डायचे वेगवेगळे प्रकार आणि उपयोग याबाबत शिकविले जाते.

मशीन , मशीन टुल यांची व्याख्या, मशीन टूलचे प्रकारलेथ मशीनचा ईतिहास आणि टप्याटप्याने झालेला  विकास आणि आताचे लेथ मशीनचे आधुनिक स्वरूप सी.एन.सी लेथ ( टर्निंग सेन्टर ). 
लेथ मशीनचे मुख्य भाग त्यांचा उपयोग,लेथ मशीनचे प्रकार जसे इंजिन लेथ / सेन्टर लेथ , स्पीड लेथ  ,बेंच लेथ, टूल रूम लेथ , टर्रेट लेथ ,स्पेसिअल परपज लेथ मशीन ,  त्याच्या भांगाची बांधणी, वापर.   लेथ मशीनवर केली जाणारी विविध ऑपरेशन , त्याचा उपयोग आणि करण्याच्या पध्दतीचे कौशल्य शिकविले जाते.

व्हर्निअर कॅलिपर , व्हर्निअर हाईट गेज आणि व्हर्निअर बेव्हल प्रोटेक्टर,यांचे कार्य तत्त्व, मुख्य भाग , बनावटीचे धातु, लहानात लहान मोजण्याची क्षमता ,  माप रिडींगचे कौशल्य ,
आऊट साईड आणि इन साईड  मायक्रोमीटर ,आणि डेप्थ मायक्रोमीटर त्यांचे  मुख्य भाग , बनावटीचे धातु, कार्याचे तत्त्व, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य, कार्य करताना घ्यायची काळजी आणि देखभाल याचे ज्ञान दीले जाते. डिजिटल मायक्रोमीटरचे वर्णन आणि उपयोग. 

अभियांत्रिकी धातुचे भौतिक गुणधर्म जसे रंग, वजन, चुंबकीय गुणधर्म, गुरुत्व. तसेच  यांत्रिकी गुणधर्म जसे  कठोरता, ठिसूळपणा, कडकपणा, आणि लवचिकता.
कास्ट आर्यनचे प्रकार, गुणधर्म आणि वापर.  लोखंडाचे गुणधर्म आणि वापर. 
स्टील: प्रकार, गुणधर्म आणि वापर. 
 अलोह धातू (तांबे, अल्युमिनियम, कथील, शिसे, जस्त) गुणधर्म आणि वापर.
 अल्युमिनियम   उपयोग, फायदे आणि मर्यादा याबाबत शिकविले जाते. 

ड्रिल्सचे वेगवेगळे प्रकार जसे फ्लॅट ड्रील , ट्विस्ट ड्रिल , सेटर ड्रिल त्यांचे भाग,  कटिंग कोन, ड्रीलिंग
संबंधित वेगवेगळे ऑपरेशन जसे बोअरिंग, काउंटर बोअरिंग  आणि काऊंटर सिकींग, रीमिंग, टॅपिंग ईत्यादी. रीमरर्स-त्याचे प्रकार आणि उपयोग, बनावटीचे धातु , बांधणी . ड्रिलला, कटींग टूलला धार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्राइंडिंग मशीनची माहितीहि शिकविली जाते. 
 वंगण (Lubricant ) त्याचे महत्त्व , गुणधर्म आणि प्रकार   तसेच मशीनवर वंगण करण्याच्या पध्दती.  शीतलकाचे  (Coolant) प्रकार , महत्त्व , वेगवेगळ्या मटेरिअल प्रमाणे शीतलकांची निवड.

नर्लिंग म्हणजे काय? त्याची गरज, प्रकार, ग्रेड, याच्या सहाय्याने केले जाणारे ऑपरेशनची , ऑपेरेशन  करताना मशीनचा ठेवला  जाणारा स्पीड.   टेपर म्हणजे काय ? महत्त्व , टेपरचे मुख्य घटक, टेपर करण्याच्या विविध पध्दती , त्या पध्दतीचे फायदे आणि तोटे याचेही  कौशल्य शिकविले जाते.

मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षेत्रात ( मास प्रोडूकशन) पार्टस् ची  अदलाबदल( इंटर चेंजबिलिटी ) करण्याची गरज, त्याबाबतचे मुख्य घटक ,  त्यांची व्याख्या, प्रकार , याच्यासंबंधीत लिमीट , फीट, टाॅलेरन्स यांची व्याख्या आणि प्रकार . पार्टस् ची जोडणि करताना  , होल  आणि शाफ्ट . होल बेसिक आणि शाफ्ट बेसिक म्हणजे काय ? हे शिकविले जाते. अनियमित जाॅब पकडण्यासाठी वापरली जाणारी साधने, जसे ड्रायव्हिंग प्लेट.  फेस प्लेट, ड्रायव्हिंग प्लेट आणि लेथ कॅरियर ,लेथ सेंटर, मॅनड्रील यांचे प्रकार आणि वापर.

कोनीय मापे / टेपरचे कोन मोजण्याची मापन साधने जसे काॅम्बिंनेशन सेट त्याचे मुख्य भाग स्क्वेअर हेड,  सेंटर हेड, प्रोटेक्टर हेड- यांचे उपयोग आणि बांधणी रचना.
बेव्हल प्रोटेक्टर आणि व्हर्निअर बेव्हल प्रोटेक्टर यांचे कार्य तत्त्व, मुख्या भाग त्यांचे कार्य, लहानात लहान कोन मोजण्याची क्षमता , आणि कोन वाचन करणे तसेच साइन बार आणि  स्लिप गेजच्या सहाय्याने  टेपरचा कोन मोजण्याची पद्धत याबाबतचे कौशल्य शिकविले जाते.
सोल्डरिंग, वेल्डिंग आणि ब्रेझिंगची मूलभूत प्रक्रिया समजावुन सांगितली जाते. तसेच लेथ मशीनवर वापरल्या जाणार्‍या टीप टुलला ब्रेझिंग करण्याचे कौशल्य शिकविले जाते.
iti admission

लेथवर मशीनवर थ्रेडींग करण्याच्या पध्दती  शिकविल्या जातात.  थ्रेडचे विविध प्रकार, त्यांचे आकार आणि थ्रेडचे घटक.  प्रत्येक प्रकारच्या थ्रेडचे उपयोग. थ्रेडींग करताना वापरले जाणारे गियर , गियर ट्रेनचे प्रकार. सिंगल स्टार्ट थ्रेडआणि मल्टी स्टार्ट थ्रेड म्हणजे काय ?   जिग आणि फिक्स्चर म्हणजे काय ? याचा उपयोग.  चिप ब्रेकरचे प्रकार आणि उपयोग. मशीनवर मेटल कट करताना जे कटींग टूल वापरले जातात  त्यांच्यासाठी वापरले जाणारे धातु
मशीनचे देखभालीचे ( मेन्टेनन्स ) प्रकार  ,प्रतिबंधात्मक देखभाल म्हणजे काय ?  त्याची आवश्यकता, व ते करताना विचारात घेतले जाणारे मुद्दे,  प्रतिबंधात्मक देखभाल वेळापत्रक.
लेथ मशीनवर  वापरल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या  अटॅचमेट, त्यांचा वापर. अतिसुक्ष्म प्रकारे  थ्रेडचे मापन करण्यासाठी वापरले जाणारी मापन साधने जसे स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर, मायक्रोस्कोप, टूल मेकर'चे बटण आणि त्याचे भाग, बांधणी आणि वापर याबाबत शिकविले जाते.

लेथ मशीनची आधुनिक तंत्रज्ञानाचे रुप म्हणजे सी.एन.सी. लेथ ( टर्निंग सेंटर ) - काॅम्पुटरच्या सहाय्याने नियंत्रित होणारी मशीन. सी.एन.सी. लेथ आणि पांरपांरिक लेथ मशीन यामधील फरक. सी.एन.सी. लेथ मशीनचे  फायदे आणि तोटे. सी.एन.सी. लेथ  मशीनचे मुख्य भाग त्यांचे कार्य, सी.एन.सी. मशीन नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा . सी.एन.सी. मशीनची कार्यप्रणाली . सी.एन.सी. मशीनचे प्रकार आणि त्यांचा वापर. मशीनवर एखादा जाॅब तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोड त्या कोडचा अर्थ आणि कोडने केले जाणारे  कार्य  याचे कौशल्य शिकविले जाते.

 विविध मोडची माहीती आणि त्यांचा वापर,मशीनमधील महत्त्वाच्या पोझिशन,मशीनवर एखादा जाॅब तयार करतानाचा योग्य  क्रियाक्रम जसे जाॅब ड्राईंगचे वाचन , लागणारे टुल, को- ऑ र्डीनेट , प्रोग्राम एडीटींग, वर्क झिरो सेट करणे, मशीन ड्राय रनमध्ये सुरु करुन जाॅब ड्राईंग नुसार मशीनच्या स्क्रीनवर तसाच आकार दीसतो का ? नसेल दीसत तर काय करायचे. त्यानंतर  मशीन योग्य मोडमध्ये घेऊन मशीन सुरु करणे. यासर्व क्रियेनंतर  तयार झालेला जाॅब ड्राईंगच्या मापातच बनला आहे किंवा नाही हे तपासायचे. मापात  नसेल तर काय करायचे ?  थोडक्यात   पार्टचे ड्राईंग रिडींग , टुलपाथ आणि को- ऑर्डिनेट काढणे, पार्ट प्रोग्रॅम तयार करणे, प्रोग्रॅम भरणे , वर्क पीस /  जाँब सेटींग, टुल किंवा कटर सेटींग, वर्क किंवा जाॅबचे वर्क ऑफसेट सेटींग ,ग्राफ किंवा सिम्युलेशन पहाणे,आणि प्रोग्रॅम रन करणे अशा पध्दतीने  स्टेप बाय स्टेप कौशल्ये शिकविली जातात.

विद्यार्थी विश्वासाने सी.एन.सी. मशीन हाताळु शकेलं  हा आत्मविश्वास त्यात निर्माण केला जाते. कारण  आता पांरपांरिक लेथ मशीनपेक्ष्या सी.एन.सी. लेथ ( टर्निंग सेंटर ) चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 
वरील प्रमाणेच   विविध प्रकारचे प्रोग्रामिंग तंत्र जसे जाॅबचे बाहेरील मापे (डायमीटर) / आतील मापे (डायमीटर) ऑपरेशनसाठी वापरली जाणार्‍या विविध  सायकलबाबतची  माहीती करुन दीली जाते आणि  सदरचे कौशल्य शिकविले जाते.थ्रेडींग ( थ्रेड करणे) सायकल, बोअरिंग (जाॅबचा आतील डायमीटर वाढविणे ) सायकल, ग्रुव्हींग सायकल, टॅपिंग सायकल यांची माहीती करुन दीली जाते तसेच सदरची कौशल्ये शिकविली जातात. सी.एन.सी. मशीनवर वापरले जाणारे कटींग टुल , ऑपरेशननुसार टुलची निवड, टुलचे मटेरीअल तसेच  टुलचे स्पेसिफीकेशन याबाबतचे ज्ञानही दीले जाते.

कातारी TURNER  ट्रेड यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायची इच्छा  असेल तर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट  प्रवेश 
नाहीतर एक वर्षाची शिकाउ उमेदवारी ( खालील कंपनीत ), त्यानंतर NCVT ची परिक्षा आणि NCVT  परिक्षा पास झाल्यावर नोकरीची संधी...

नोकरीची संधी :
सरकारी - भारतीय रेल्वे , इंडीयन ऑईल, ओएनजीसी, हिंदूस्थान पेट्रोलियम, भेल(BHEL), गेल(GAIL), भारत पेट्रोलियम, सुरक्षा मंत्रालयातील आयुधे निर्मितीच्या कंपनीत, डाॅक यार्डमध्ये.

खाजगी नोकरी - उत्पादन आणि निर्मितीच्या कंपनीत, पुल बोगदे कालवे तसेच बांधकाम व्यवसायाच्या कंपनीत, ऑटोमोबाईलच्या क्षेत्रातील कंपनी, जहाज बांधणी आणि दुरुस्तीच्या क्षेत्रातील कंपनीत.
कामाचा चांगला अनुभव झाला की भविष्यात परदेशातही काम मिळु शकते.

मित्रांनो  या ट्रेडबध्दल अजुन काही प्रश्न / शंका असेल तर comment box मध्ये विचारु शकता. तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर दीले जाईल.
ITI Admission

टिप्पण्या

 1. Please मला सांगू सक्षाल का असा कोणता ड्रेड आहे की तो केल्याने लवकरात लवकर job लागेल.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. बहुतेक सर्वच ट्रेड ना जॉब opportunity आहेत, पण महत्त्वाचा मुद्दा हा असतो की तुम्हाला नेमके काय शिकायचे आहे? तुमचा इंटरेस्ट कशात आहे,
   तुम्हाला जे आवडत तेच शिका व्यवसाय अथवा नोकरी ची संधी नक्की आहे

   हटवा
  2. हो अगदी बरोबर, धन्यवाद

   हटवा
 2. नवीन अडमिशम घेणाऱ्यान साठी खूप छान माहिती

  उत्तर द्याहटवा
 3. 12arts नंतर पॉलिटेक्निकला अॅडमीशन मीळेल का

  उत्तर द्याहटवा
 4. तुम्हाला दहावी बेसवरच डिप्लोमाला प्रवेश मिळु शकेल.

  उत्तर द्याहटवा
 5. सर मला कातारी बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे म्हणजे लेथ मचीनचे भाग लेथ मशीन टूल चक ऑपरेशन तुमची कोणती लिंक असेल तर पाठवा plz

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा