Machinist Grinder

ITI Admission
यंत्रकारागिर घर्षक
शैक्षणिक पात्रता:-  दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बधनकारक)
प्रशिक्षण कालावधी:- २ वर्षे
व्यवसायाचा प्रकार :-  मशिन गट


मित्रानो , 
या ट्रेड मध्ये जॉबवर फिनिशिंग  करण्याचे  कौशल्य शिकविले जाते.
आपल्या भाषेत म्हणायचे तर जॉब गुळगुळीत करण्याचे शिकविले जाते. 
उत्पादन क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध ग्राइंडिंग मशीनवर वर काम करणे तसेच त्यांची निगा  राखणे,   सी.एन.सी. लेथ ( टर्निंग सेन्टर ) वर काम करण्याबाबतचे   कौशल्य शिकविले जाते.

चला तर या ट्रेड मध्ये काय काय   पाहूया...... 
या ट्रेडमध्ये  शॉप फ्लोअरवर (काम करायचे ठिकाण) काम करताना  सुरक्षिततेचे महत्त्व आणि सर्वसाधारण खबरदारी, प्रथमोपचार परिचय ,  स्वत:च्या सुरक्षिततेचे साधने यांचा परिचय   5S संकल्पना आणि त्याच्या उपयोग व महत्त्व, आगीची व्याख्या, आगीचा त्रिकोण , आग विझविण्याची साधने,अपघात होण्याची कारणे  मोजमाप  करण्याची साधने,त्याची युनिट्स, डिव्हिडर्स, कॅलिपर, हर्माफ्रोडाइट, सेंटर पंच, डॉट पंच, त्यांचे वर्णन आणि विविध प्रकारचे हातोडी त्यांचा प्रकार आणि उपयोग,  ‘व्ही’ ब्लॉक्स, अँगल प्लेट बाबत शिकवितात 

लोह आणि अलोह धातु त्यातील फरक, ते ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती. हीट ट्रीटमेट म्हणजे काय? त्याचे महत्त्व, उपयोग, हीट ट्रीटमेटचे विविध प्रकार जसे हार्डनिंग, टेम्परिंग, अनिलिंग, केस हार्डनिंग इत्यादी आणि त्या करण्याची पध्दत. ग्राईडींग शापमध्ये वापरले जाणारे मापन साधने , त्यांचा तपशिल , उपयोग आणि काम करत असताना घ्यावयाची निगा व देखभाल याबाबत शिकविले जाते.

ड्रीलचे प्रकार बनावटीचे धातु, ट्वीस्ट  ड्रिल चे मुख्य भाग, टॅप आणि डाय त्याचा उपयोग ,बनावटीचे धातु आणि ड्रील व टॅप मधील संबंध , टॅप , ड्रील साईजचे सुत्र, टॅप आणि डायची काम करताना घ्यावयाची निगा आणि त्यांचा योग्य वापर याबाबत शिकविले जाते तसेच ड्रीलिंग ,टॅपिंग  आणि डाईग करण्याचे कौशल्य शिकविले जाते.
कुलंट , लुब्रीकंट चे महत्त्व, उपयोग, गुणधर्म आणि धातुनुसार त्याची कामाच्या वेळी निवड.
ड्रीलिंग मशीनचा उपयोग , त्याचे प्रकार आणि त्याचा तपशिल तसेच काम करत असताना घ्यावयाची सुरक्षितता. ड्रीलिंग मशीनवर जॉब आणि टुल पकडण्याची साधने याची माहीती तसेच त्यांचा  वापर करुन दाखविला जातो. 
फाईलचे वर्गीकरण, उपयोग,बनावटीचे धातु,फाईलचे मुख्य भाग त्याचबरोबर फाईलचे कट आणि आकारावरुन प्रकार, फाईलिगकरण्याच्या पध्दती आणि फाईलिग करण्याचे कौशल्य शिकविले जाते.
 
या ट्रेडमध्ये कातारी ट्रेडचे प्राथमिक कौशल्येही शिकविली जातात. लेथ मशीनचा ईतिहास, मशीनचे मुख्य भाग, लेथ मशीनचे प्रकार आणि त्याचा उपयोग. लेथ मशीनमध्ये इलेक्टीकल मोटार पासुन स्पिडलपर्यत गतीचे स्थलातर कसे होते ते स्पष्ट केले जाते. लेथ मशीनवर वापरले जाणारे विविध टुल्सचे ऑगल्सची माहीती शिकविली जाते. लेश मशीनवर केल्या जाणार्‍या ऑपरेशननुसार टुलची निवड करणेबाबतचे, टेपर म्हणजे,त्याचे प्रकार आणि करण्याच्या पध्दतीचे , फेसिग, ,टर्निग,ट्रीलिग, बोअरिग, आणि टेपर टर्निगचे कौशल्ये शिकविली जातात. लेथ मशीनवर स्क्रु कटीग करण्याची पध्दत तसेच हे ऑपरेशन करताना स्पिंडल  स्पिडबाबतचेही ज्ञान दीले जाते.

पेडेस्टल ग्राईडरची माहीती आणि उपयोग , ग्राईडर व्हील ड्रेसिग करण्यास वापरले जाणारे डायमंड ड्रेसर, स्टील टाईप ड्रेसर, अब्रेसिव्ह ड्रेसरबाबत शिकविले जाते.
व्हर्निअर कॅलिपर ,मायक्रोमीटर ( इन्साईड , आऊट साईड , डेप्थ ), डायल टेस्ट इंडिकेटर यांचा उपयोग, बनावटीचे धातू, मुख्य भाग,लहानात लहान माप मोजण्याची क्षमता  तसेच त्याचे वाचन करणे याबाबत जाते. कॉम्बिनेशन सेट , त्याचे मुख्य भाग, बनावटीचे धातू आणि उपयोग.   डिजिटल  ,मिझरिंग साधनांचा उपयोग. 
न्यूमॅटिक गेजेस ची  असेसेरीज ,मापन करतानाच उपयोग, अब्रासिव्ह अब्रेसिव्हचे विविध प्रकार ,  ग्राइंडिंग व्हीलची निर्मिती ,  फिनिशिंग प्रोसेस मध्ये ग्राइंडिंग चे तत्व आणि  मूल्य , विविध   प्रकारचे ग्राइंडिंग व्हील , त्यांची बांधणी /रचना याबाबत शिकविले जाते. अँगल प्लेट च्या साहाय्याने वर्क पीसला  प्लेन कसा करायचा   या  बाबत  शिकविले जाते ग्रीट आणि विविध प्रकारचे   बॉण्ड बाबत शिकविले जाते.
जॉबचा पुष्ठभाग ग्राईड करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ग्राईडर मशीनची जसे प्लेन , रोटरी, हॉरीझॉन्टल , व्हर्टिकल  ग्राईडीगमशीनचे मुख्य भाग ,बांधणी , उपयोग , काम करत असताना घ्यावयाची खबरदारी आणि मशीनची देखभाल याविषयी  माहीती शिकविली जाते. टेपरला ग्राईडीग करण्याबाबत शिकविले जाते.
ITI Admission


प्लेन सिलिट्रीकल  मशीनचे प्रकार जसे एक्सटर्नल  आणि इंटर्नल ग्राइंडिंग  , युनिव्हर्सल ग्राइंडिंग मशीनची मुख्य भाग, बांधणी, तपशील ,कार्य पद्धती , काम करताना घ्यावयाची सुरक्षितता आणि मशिनची देखभाल बाबतची माहीती शिकविली जाते. ग्राईडीग व्हीलचे ब्लांसिग , अलायमेन्ट करणे , याचे फायदे, आणि त्यांची  तपासणी करणे तसेच विविध प्रकारच्या ग्राईड्रिग व्हीलला ड्रेसिग करण्याबाबत आणि त्याचा तपशिल आणि उपयोगयाबाबत शिकविले जाते. 
ग्राईडिग करावयाच्या जॉब  ला पकडण्याची साधने, चेकचे  प्रकार ,मॅग्नेटिक चक,  चक, फेस प्लेट , कोलॅट ,  सेन्टर चे विविध प्रकार आणि त्यांचा उपयोग,  त्यावर जॉब  पकडण्याची पध्दत शिकविली जाते. जिग आणि फिक्चरचेत्याचे प्रकार, महत्व  याविषयीही  शिकविले जाते.  
ऑगल प्लेट , व्ही ब्लाॅक याबाबती माहीती आणि त्यांचा उपयोग याबाबत शिकवितात. कुलंटचे महत्त्व आणि त्याचे गुणधर्म , साईन बार , स्लिप गेज त्यांचा उपयोग बनावटीचे धातु तसेच साईन बार , स्लिप गेजयांच्या साहाय्याने टेपर चे आणि अँगलचे मापन करण्याची पद्धत  तसेच वापरतानाची योग्य पध्दत आणि निगा  याविषयी शिकवितात.

मास प्रोडक्शन इंडस्ट्रीत पार्टस् ची अदलाबदल (ईंटर चेंजबिलीटी)  करण्याची आवश्यकता, संकल्पना,संबंधित शब्दांच्या व्याख्या  लिमीट, फीट आणि टाॅलेरन्स म्हणजे काय ?  
लिमिट , फीटचे प्रकार याबाबत शिकविले जाते. होल बेसिस आणि साफ्ट बेसिस सिस्टिम म्हणजे काय? त्याचा वापर केव्हा केला जातो ते शिकवितात.

विशेष प्रकारची ग्राइंडिंग  मशीन जसे सेंटरलेस मशीन तिचा तपशिल , कार्य पध्दती,मुख्य भागांची माहिती  ऑपरेशन करताना घ्यावयाची सुरक्षितता आणि देखभाल. डायमंड ग्राईडींग व्हील आणि त्याचा उपयोग, प्रिव्हेन्टीव मेंटेनंन्स  म्हणजे, त्याचे महत्त्व, या प्रकारात मशीनला लुब्रिंकेशन करण्याचे प्रमाण.
सिलिड्रीकल ग्राईडीं ग मशीनचेमुख्य भाग, त्याभागांची माहीती , काम करताना घ्यावयाची सुरक्षितता आणि मशीनची देखभाल, सरफेस ग्राईडीं ग मशीनचे मुख्य भाग , त्यां चा तपशिल,  काम करताना घ्यावयाची सुरक्षितता आणि मशीनची देखभाल, युनिव्हर्सल ग्राईडींग मशीन ,मुख्य भाग, त्या भागां ची माहीती , काम करताना घ्यावयाची सुरक्षितता आणि मशीनची देखभाल, इंटर्नल ग्राइंडिंग मशीन चे  मुख्य भाग, त्या भागांची माहीती , काम करताना घ्यावयाची सुरक्षितता आणि मशीनची देखभाल याबाबत शिकविले जाते.

मिलिंग मशीनवर वापरले जाणारे कटर त्यांचे कटिंग ऑगल , बुशला आणि दंडगोलाकार भागावर स्टेप ग्राइंडिंग करणे, ऑगुलर ग्राइंडिंग , स्लॉट आणि ग्रूव्हला ग्राइंडिंग, बाहेरील बाजूस टेंपर आणि स्टेप  करण्याची पद्धत शिकविली जाते.  ते काम करताना घ्यावयाची सुरक्षितता याबाबत सांगितले येते.गेजेस चे महत्व , बनावटीचे धातू,  गेजेसचे वर्गीकरण, प्रकार आणि त्यांचा उपयोग. सिलिंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर हेड स्टॉक आणि टेल स्टॉक ची अलायमेन्ट करणे, स्टेडी रेस्टचे प्रकार , तपशील , बनावटीचे धातू,  टू आणि थ्री जौ स्टेडी रेस्टचा उपयोग. होनिंग प्रोसेस ( सुपर फिनिशिंग सरफेस बनविण्याची पद्धत ), या साठी वापरले जाणारे अब्रासिव्ह स्टोन ,त्यांचा प्रकार, तपशील आणि उपयोग याबाबत शिकवितात.  
थ्रेडिंगला ग्राइंडिंग करण्यासाठी वापरले जाणारे विविध व्हील , त्यांची निवड. 
लॅपिंगची पद्धत हॅन्ड लॅपिंग आणि मशीन लॅपिंग , फ्लॅट सरफेसला , सिलिंड्रिकल सरफेसला  पॉलीश करण्यासाठी वापरले जाणारे व्हील . ग्राइंडिंग मधील दोष आणि त्याचे उपाय याबाबत शिकविले जाते. 

सी.एन.सी.  मशिनची संकल्पना ,  सी.एन.सी. ग्राइंडिंग मशिनची माहिती सांगितली जाते.   
सी.एन.सी. लेथ ( टर्निंग सेन्टर ) आणि पांरपांरिक लेथ मशीन यामधील फरक. सी.एन.सी. लेथ मशीनचे  फायदे आणि तोटे. सी.एन.सी. लेथ  मशीनचे मुख्य भाग त्यांचे कार्य, सी.एन.सी. मशीन नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा . सी.एन.सी. मशीनची कार्यप्रणाली सी.एन.सी. मशीनचे प्रकार आणि त्यांचा वापर. मशीनवर एखादा जाॅब तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोड त्या कोडचा अर्थ आणि कोडने केले जाणारे  कार्य  याचे कौशल्य शिकविले जाते.

विविध मोडची माहीती आणि त्यांचा वापर,मशीनमधील महत्त्वाच्या पोझिशन,मशीनवर एखादा जाॅब तयार करतानाचा योग्य  क्रियाक्रम जसे जाॅब ड्राईंगचे वाचन , लागणारे टुल, को- ऑ र्डीनेट , प्रोग्राम एडीटींग, वर्क झिरो सेट करणे, मशीन ड्राय रनमध्ये सुरु करुन जाॅब ड्राईंग नुसार मशीनच्या स्क्रीनवर तसाच आकार दीसतो का ? नसेल दीसत तर काय करायचे. त्यानंतर  मशीन योग्य मोडमध्ये घेऊन मशीन सुरु करणे. यासर्व क्रियेनंतर  तयार झालेला जाॅब ड्राईंगच्या मापातच बनला आहे किंवा नाही हे तपासायचे. मापात  नसेल तर काय करायचे ?  थोडक्यात   पार्टचे ड्राईंग रिडींग , टुलपाथ आणि को- ऑर्डिनेट काढणे, पार्ट प्रोग्रॅम तयार करणे, प्रोग्रॅम भरणे , वर्क पीस /  जाँब सेटींग, टुल किंवा कटर सेटींग, वर्क किंवा जाॅबचे वर्क ऑफसेट सेटींग ,ग्राफ किंवा सिम्युलेशन पहाणे,आणि प्रोग्रॅम रन करणे अशा पध्दतीने  स्टेप बाय स्टेप कौशल्ये शिकविली जातात आणि स्ट्रोक रिमुव्हल पद्धतीने  फेसिंग , टर्निंग , ग्रूविंग , थ्रेडींग आणि  ड्रिलिंग ऑपरेशन करण्याचे कौशल्य शिकविले जाते.

यंत्रकारागिर घर्षक ( Machinist Grinder )   ट्रेड यशस्वीपणे पुर्ण केल्यावर पुढे शिकायची इच्छा  असेल तर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट  प्रवेश मिळतो.
नाहीतर एक वर्षाची शिकाउ उमेदवारी ( खालील कंपनीत ), त्यानंतर NCVT ची परिक्षा आणि NCVT  परिक्षा पास झाल्यावर नोकरीची संधी...

नोकरीची संधी :
सरकारी - भारतीय रेल्वे , इंडीयन ऑईल, ओएनजीसी, हिंदूस्थान पेट्रोलियम, भेल(BHEL), गेल(GAIL), भारत पेट्रोलियम, सुरक्षा मंत्रालयातील आयुधे निर्मितीच्या (ऑर्डनन्स ) कंपनीत, डाॅक यार्डमध्ये.

खाजगी नोकरी - उत्पादन आणि निर्मितीच्या कंपनीत,  ऑटोमोबाईलच्या क्षेत्रातील कंपनी, जहाज बांधणी आणि दुरुस्तीच्या क्षेत्रातील कंपनीत, विमान निर्मितीच्या क्षेत्रात. ASB International Pvt. Ltd.
NCGC, Gorej, L&T, Mahidra  & Mahindra, Themax Ltd., Bharat forge Ltd., Kirloskar Brothers Ltd., Kirloskar Pneumatic co. Ltd. या सारख्या बर्‍याच नामांकित कंपन्यात.

 अनुभव झाला की भविष्यात परदेशातही काम मिळु शकते.
ITI Admission

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा