ऑनलाईन अर्ज भरणे

 

मित्रांनो 
यावर्षी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया DVET ने गेल्या वर्षापेक्षा सुटसुटीत आणि कमी टाईमात पुर्ण होईल अशी केली आहे.

जर ऑनलाईन अर्ज भरताना येणार्‍या सुचनांचे वाचन करुन step by step  भरला तर  सायबर कॅफेत जाण्याची काही आवश्यकताच नाही . अर्ज भरण्यासाठी सायबरमध्ये  १५० ते २०० रुपयाहुन कमी घेईल असे वाटत नाही. आणि त्यानंतर अर्ज  confirm करण्याचे प्रवर्गाप्रमाणे १०० किंवा १५०/- रुपये म्हणजेच अंदाजे ३००/- आणि अर्ज भरायला वेळ किती लागेल १० ते १५ मिनिटे . मग कशाला घराच्याबाहेर पडा. माझी ही पोस्ट वाचताय म्हणजे तुमच्याकडे स्मार्टफोन असणारच... ( आपल्या मित्राकडे नसेल तर त्याला मदत करा.)
प्रथम आपले हॉल तिकीट / निकाल पत्र  अथवा बोर्डाचे प्रमाणपत्र जवळ ठेवा.
चला तर ऑनलाइन फाॅर्म भरण्याबाबत पाहुया..... 

१) प्रथम मोबाईल वर Google वर जावुन admission.dvet.gov.in  टाईप करा आणि click करा.
पेज ओपन झाल्यावर आपणास 
केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया -2020  
असे दीसेल त्याच्याखाली उजव्या बाजुस तीन  आडव्या लाईन्स दीसतील. त्यावर क्लिक  केले की आपणास Candidate log in असे दीसेल,
त्यावर क्लिक  केले की, New candidate Registration वर क्लिक  करायचे. 
त्यानंतर आपणास स्क्रीन वर स्पेट १ स्टेप २ स्टेप ३ ...  असे दीसेल त्याला स्क्रोल  केले की खाली आपणास New Candidate Registration असे वाचण्यास मिळेल. येथुन आपले काम सुरु होणार...

आय.टी.आय.मध्ये प्रवेश घेणारे 98% मुले/मुली हे स्टेट बोर्डाचेच असतात.  जर आपल्या मार्कशीट, हाॅल तिकीट किंवा दहावीच्या प्रमाणपत्रावर ( या वर्षी पास झालेल्यांना अजुन मार्कशीट मिळाली नसेल, हाॅल तिकीट असेल. आणि बाकीच्याकडे मार्कशीट आणि प्रमाणपत्र असेल .) महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळ असे लिहीले असेल तर पहील्या चौकोनावर click करावे. आणि आलेली सुचना वाचुन OK करायचे.
2) पुढे दहावीबाबतची माहिती  विचारतील.
आपला सीट नंबर.... ( जसा आहे तसा  टाईप करावा )
परिक्षेचे वर्ष ..( जे असेल ते टाईप करावे) 
परिक्षेचा महिना (मार्च /  जुलै योग्य तो निवडायचा  )

त्यानंतर आपली जन्म तारीख आठवत असेल तर ठीक नाही तर पाहुनच लिहावी .)
जन्म तारीख लिहील्यावर जर आपण 2016 पर्यंत दहावी झाले असाल तर खाली आपले नाव येईल. तेव्हा confirm वर click करावे. नाहीतर उमेदवारास सर्व माहीती सादर करणे आवश्यक आहे,असे येईल. त्यावर OK ला क्लिक  करावी.
जन्म तारखेच्या खाली आपले पुर्ण नाव येईल. नाही आले तर Hall Ticket  / Result वर आहे त्याप्रमाणे आहे तसेच टाईप करावे.  त्यानंतर Result मध्ये पास किंवा नापास जे असेल ते निवडावे. 2016 पर्यत जे दहावी झाले आहेत त्यांना हे दोन मुद्दे लिहुनच येतील.)
Candidate Details 
आपले प्रथम नाव           ( वरील प्रमाणे टाईप करावे) 
शेवटचे (आडनाव )         (   वरील प्रमाणेच )

त्यानंतर आपणास मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. हा नंबर टाईप केल्यावर या नंबरच्या बाजुला Verify असे दीसेल Verify वर Click केले की एक चौकोन दीसेल त्यावर OTP नंबर विचारतील. हा OTP   180 सेंकदात आला तर ठीक नाही तर Reset वर क्लिक करायची.  पण OTP लगेच येतो.
 
OTP टाकल्यावर SUBMIT वर क्लिक करावे. त्यानंतर  आपणास OTP VERIFICATION  असे दीसेल त्यावर ok ला click करावे.

त्यानंतर Mail ID  विचारतील. (असेल तर टाईप करावे नाही लिहीला तरी चालेल. ) नंतर पासवर्ड विचार तील  ( Password@123 असे सोपे लिहा. नाहीतर आपले नाव @ जन्म तारीख व महीना जसे Sameer@0708 असे लिहिले तरी चालेल. 
Confirm passward मध्ये वरील प्रमाणेच टाईप करायचे आहे.
 त्यानंतर खालील ईमेज मध्ये जे अक्षर अंक असतील ते टाईप करा.  आपली लिहीलेली माहीती पुन्हा एकदा तपासुन घ्या. व नंतर Register वर क्लिक  करा. क्लिक  केल्यावर प्राथमिक मोबाईल नंबरवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये तुमचा Registration No. व पासवर्ड असेल. हा मेसेज अडमिशन प्रक्रिया पुर्ण होईपर्यत जपुन ठेवा.

पुन्हा संकेत स्थळावर (admission.dvet.gov.in) जा

 Candidate login 
Registration Candidate login वर जाऊन आपला रजिस्टेशन नंबर, पासवर्ड नंतर ईमेजमधील अक्षर व अंक टाईप करा आणि login वर क्लिक  करा. त्यानंतर डाव्याबाजुस Admission Activity असे दीसेल त्यावर क्लिक  करा. मग एक सुचना येईल ती वाचुन ok वर क्लिक  करा.
स्टेप १ 
Candidate Profile दीसेल ..
मग Gender  (लिंग )विचारतील - Male / Female योग्य तो निवडा.
जन्म तारीख ......(आपली आहे ती लिहा)
राष्टीयत्त्व :- Indian
मातृभाषा :- मराठी , हिंदी , उर्दु ..........(जी असेल ती लिहा.)
धर्म - ( जो असेल तो लिहा.)
जातीचा वर्ग जो असेल तो)
जात (जी असेल ती लिहावी. ) - ( स्वतःचे नावाचे जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.)
उन्रत गटात मोडता का ? (चालु आर्थिक वर्षांचे नाॅन क्रीमिलीअर प्रमाणपत्र किंवा यासाठी अर्ज केला असल्यास - Yes नसेल तर No.ला क्लिक  करावे. 

       यानंतर Next Page वर click करावे.
स्टेप  2
Address Details  
County देश :- India निवडा .  
Address :-  येथे आपला संपुर्ण पत्ता लिहावा. 
राज्य State :- Maharashtra निवडावा. 
जिल्हा: जो आपला जिल्हा असेल तो लिहावा.                    तालुका :- जो आपला जिल्हा असेल तो लिहावा
शहर / गावआपले शहर /गाव लिहावे. 
पिन नंबर :- जो असेल तो लिहावा.
    
    Next Page वर क्लिक  करावे.
स्टेप  3
Parent / Gardian Details 
आपण जर अनाथ (अनाथ आश्रमात रहात )असाल तरच Yes वर क्लिक  करावे. नाहीतर NO असुदे. ( जर कोणी अनाथ असेल तर त्याला फार्म भरुन दीला जाईल. about us वर क्लिक करुन मेल करावा.)
त्यानंतर Particulas तपशिल
वडिलाचे प्रथम नाव . जे असेल ते लिहावे.                    आईचे प्रथम नाव जे असेल ते लिहावे. 
वडिलाचे आडनाव.जे असेल ते लिहावे.                       आईचे  आडनाव.जे असेल ते लिहावे.
वडिलाचा व्यवसाय .जो करत असतील तो निवडा       आईचा व्यवसाय. करत असेल तर निवडा 

वडिल अथवा आई कोणी शासकिय कर्मचारी असतील  तर (जो कोणी असेल त्याच्या बाजुस) कार्यरत राज्य , जिल्हा , तालुका निवडा .
वडिलाचे  वार्षिक उत्पन्न ...जे असेल ते निवडा          आईचे वार्षिक उत्पन्न ...असल्यास जे असेल ते निवडा. 
वडिलाचे अधिवास राज्य ...जे असेल ते निवडा .        आईचे अधिवास राज्य जे असेल ते निवडा . 
वडिलाचे अधिवास जिल्हा जो असेल तो निवडा         आईचे अधिवास जिल्हा जो असेल तो  निवडा 
 त्या नंतर 
Next Page वर क्लिक करावे.

स्टेप ४ 
ADDITIONAL WEIGHTAGE 
संरक्षण श्रेणी तपशील 
आपण जर संरक्षण खात्यातील ( डिफेन्स )  मधील असाल तर YES  click करावे नाही तर NO च असुदे. 
जर YES केले तर आपली श्रेणी निवडावी ( कागदपत्रे आवश्यक )

अपंग श्रेणी तपशील असलेली व्यक्ती 

जर आपण ४० % पेक्षा अधिक कायम अपंग असाल तर YES वर click करावी नाही तर  NO च असुदे.
( यासाठी हि प्रमाणपत्र आवश्यकत  आहे. )
विकलांगता टक्केवारी -  ( प्रमाणपत्रावर असते ती निवडणे )

इतर तपशील 
इंटर्मीडिएट ड्राइंग/ चित्रकला  पास केली असल्यास YES करावे नाही तर NO च असुदे ( 

 अभ्यासेत्तर उपक्रम   जर आपण NCC,MCC, Scout & Guide , Civil Defence केले असल्याचे प्रमाणपत्र असल्यास निवडावे.  नाहीतर NONE असे निवडावे.  ( प्रमाणपत्र आवश्यकत  आहे.)

Sport Category  - जिल्हा, राज्य  किंवा राष्ट्रीय पातळीवरचे प्रमाणपत्र असेल तरच YES  click करावे नाही तर NO च असुदे.  असल्यास जिल्हा, राज्य  किंवा राष्ट्रीय  पातळी असेल ती निवडा.  

आपण शासकीय  मान्यताप्राप्त बालसुधारगृहातून पास  झाले असाल तर  YES  click करावे नाही तर NO च असुदे.
जर पास झाले असाल तर
        जिल्हा निवडा .                             तालुका निवडा.  

                          Next Page वर click करावे.

स्टेप ५ 
प्रवेश पात्रता ( दहावी कुठून केली आहे त्याची माहिती )
शाळेचे राज्य 
जर कोणी दहावी महाराष्ट्र राज्या बाहेरून  केले असल्यास Other than Maharashtra वर click करावी नाही तर Maharashtra वरच असू द्यावी .  भारता बाहेरून दहावी केली असेल तर OUTSIDE INDIA वर click करावी. 

शाळेचा जिल्हा - जो असेल तो निवडावा.  शाळेचा तालुका जो असेल तो निवडावा.                                                                                                                          शाळेचे शहर / गाव-जो असेल तो निवडावा 

(  दहावी च्या शाळेचे शहर / गाव निवडताना काळजीपूर्वक निवड करा कारण त्यावर बाजूला Urban / Rural  येईल .  Rural आल्यास १० मार्कचे गुणाधिक्य मिळते जे प्रवेशाच्यावेळी सिद्ध करावे लागते. )


दहावीला तांत्रिक विषय देऊन पास झाले असतील तर YES वर CLICK करावे  , नाही  तर NO च असू द्यावे. 
त्यानंतर
आपण अंध / अपंग शाळेतून दहावी पास आहेत का ? असा प्रश्न  येईल असाल YES वर क्लिक करायची.  नाही तर NOअसू दे.

 त्यानंतर दहावीला  मिळालेले मार्क भरायचे आहेत. ( जर   आपण २०१६   पूर्वी  दहावी पास / नापास 
झाले असाल तर मार्क  भरायची  गरज आहे.  . २०१६ पर्यन्त दहावी झालेल्यांची मार्क तपासून घ्यावेत  )  

विषय                                                                  एकूण गुण                            मिळालेले गुण 
MARATHI ----                                                     100                   ( जे   मिळाले असतील ते मार्क लिहावेत )
HINDI / SANSKRIT / DUSARI BHASHA        100                   ( जे   मिळाले असतील ते मार्क लिहावेत )
ENGLISH / OTHER / 3RD LANGUAGE          100                   ( जे   मिळाले असतील ते मार्क लिहावेत )
SOCIAL SCIENCE ( Geograp)hy & History)     100                  ( जे   मिळाले असतील ते मार्क लिहावेत ) 
Mathematics                                                         100                  ( जे   मिळाले असतील ते मार्क लिहावेत )
Science                                                                 100                    ( जे   मिळाले असतील ते मार्क लिहावेत )
Technical Subject                                                 100              ( विषय असेल तर लिहावेत नाहीतर ZERO )     त्यानंतर     एकूण गुण                                            600            (  सर्व  विषयांची बेरीज ) 

500 च्या प्रमाणात  एकूण गुण                                                     500 च्या प्रमाणात मिळालेले एकूण गुण  
S.S.C

त्यानंतर ADDITIONAL WEIGHTAGE 
यामध्ये 
इंटरमीजिएट ग्राईंग  चे मार्क                                                     10     (  वर  दाखविले असतील तर )
NCC, MCC, Scout & Guide , Civil Defence                        10    (  वर  दाखविले असतील तर )
खेळात सहभाग (  जिल्हा , राज्य , राष्ट्रीय  पातळी                    10/15/20 ( पातळी प्रमाणे वर  दाखविले                                                                                                                         असतील तर )
बाल सुधार गृहातील उमेदवार                                                              असल्यास मिळतील 
अनाथगृहातील  उमेदवार                                                                     असल्यास मिळतील
ग्रामीण भागातील  उमेदवार                                                      10 (  वर  दाखविले असतील तर )
सर्व ऍडिशनल गुणांची बेरीज                                                     45        

या मध्ये आपणस ५० मार्कहून अधिक मार्क मिली शकत नाही. ( कमाल मर्यादा ५० मार्क )
 या मार्कांची बेरीज दहावीच्या मार्कांमध्ये  होऊन  या मार्कावर आपली मेरिट ठरविली  जाणार . 

म्हणजेच दहावीचे मार्क  समजा   २५० मार्क आणि  ADDITIONAL WEIGHTAGE चे  ४५ मार्क म्हणजे 
एकूण मार्क झाले २९५ /५००  ( म्हणजेच आपली मेरिट हि २९५ मार्कांवर ठरणार आहे .)

 HIgh Qualification चा रकाना खाली असेल याने मार्कात  काहीही फरक पडणार नाही . 
Selected Highest qualifcation Level 
जर आपण दहावीतून जास्त शिकले असतील तर ते qualification येथे लिहावे. 
नाहीतर S.S.C. निवडून  पदवीचे नाव त्याखाली Not applicable असे निवडावे. 

                            Next Page वर click करावे.

स्टेप ६ 
येथे आपणास पूर्वी आय . टी . आय . मध्ये प्रशिक्षण घेतले होते का ? असे विचारतील 
 घेतले असेल तर YES वर  Click करून  प्रवेशाचे वर्ष निवडायचे. 
आय . टी . आय . पास झाल्याचे वर्ष निवडायचे.
ज्या आय . टी . आयत प्रवेश घेतला  होता त्याचे नाव लिहायचे. 
ट्रेडचे नाव  लिहायचे. त्यानंतर 
                        Next Page वर click करावे.
स्टेप ७ 
उमेदवाराव्दारे हमी
या ठिकाणी आपल्या दहावी पास जिल्हा होम जिल्हा ( मूळ जिल्हा ) म्हणून येईल. 
त्याखालील अनुक्रमांक १ ते ६ पर्यंत च्या सूचना नीट वाचाव्यात आणि 
त्यानंतर खाली डाव्या बाजूला Accept म्हणून लिहिलेले असेल तेथे click करावी.  
त्या खाली शुल्क भरा म्हणून लिहिलेले असेल. 
यात शुल्क हे आपण भरलेल्या 
माहिती प्रमाणे ( राखीव प्रवर्ग १००/-, अराखीव  १५०/-, महाराष्ट्र राज्याबाहेलील ३००/- आणि अनिवासी भारतीय -५००/-) 
कोणती तरी एक रक्कम असेल.  त्यानंतर MAKE PAYMENT  वर ckick करावी . 
या नंतर आपणास पेमेंट करण्याचे ६ पर्याय दाखवतील जसे Net Banking, Debit Card , wallet , UPI, Credit Card , NEFT / RTGS ( जी आपणास सोपी वाटते त्याने पेमेम्ट करू शकतात. 
 ऑन लाईन  पेमेंट केल्यावर NEXT Page वर click करावी. 

स्टेप ८  
यामध्ये उमेदवाराला सूचना दिलेल्या आहेत .या सर्व अनुक्रमांक १ ते ११ पर्यंत च्या सूचना  काळजीपूर्वक वाचाव्यात .  आणि शेवटी अर्ज मराठी किंवा इंग्रजीत पाहिजे असेल त्या  भाषेतवर क्लिक करावी. 

मित्रांनो या ठिकाणी पॉवर प्रेसेंटेशन वर अर्ज भरताना दाखवता येत नाही त्याबद्दल क्षमस्व ....  
तरी जर कोणाला पॉवर प्रेसेंटेशन पाहिजे असेल तर मला मेल करा त्यावर मी आपणास पाठवू  ..... 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा