विकल्प आणि प्राधान्य फॉर्म कसा भरावा ? ( How to fill up option)


 विकल्प आणि प्राधान्य  फॉर्म कसा भरावा. ?

प्रथम तुम्ही Maha ITI हा अँप डाउनलोड केला का ?        केला नसेल तर आधी अँप डाउनलोड  करून घ्या .                  ITI Admission    

     राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज  भरणे, अर्ज पुर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय आणि संस्था निहाय विकल्प व प्राधान्य सादर करणेची    तारीख 31 ऑगस्ट २०२० पर्यंत साय.05.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर Notification या मथळ्याखाली उपलब्ध आहे.आयटीआय प्रवेशाकरिता ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे, दिनांक 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे, ज्या मुलांनी यापूर्वीच अर्ज केला आहे, मात्र अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास, कालपासून एडिट ॲप्लिकेशन(EDIT APPLICATION) सुरू झाले आहे..

  चला मिंत्रांनो आज आपण ऑनलाईन विकल्प कसा भरायचा ते पाहू या.                                                             प्रथम आपल्या मोबाईलवर Google वर जाऊन https://admission.dvet.gov.in टाईप करून click करावे. Candidate login वर जाऊन प्रथम तुमचा रजिस्टर नंबर लिहावा. त्यानंतर तुमचा पासवर्ड  लिहावा.   ( प्राथमिक मोबाईल नंबरवर आलेल्या मेसेजवरून बघून लिहावा. )                                                             त्यानंतर खाली दाखवलेल्या इमेज मध्ये जे अक्षर व अंक असतील ते त्या खाली असेल तसे लिहावे.                      त्यानंतर LOGIN वर CLICK करावे. म्हणजे नवीन विंडो (पेज ) ओपन होईल. त्यावरील Application  Activities   वर click करावे. या वर click केल्यावर आपणास Application Form व त्याखाली Submit / Change Option /Preferances असे लिहिलेले दिसेल त्यावर click करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यावर आपणास 

OPTION SELECTION - 1st Round Onwards असे लिहिलेले दिसेल.

त्याखाली Search मध्ये दोन ऑप्शन दिसतील . पहिला Institute Wise आणि दुसरा Trade Wise . यावर क्लिक करण्यापूर्वी आपण कुठला ट्रेडला प्रवेश घ्यायचा ते ठरवले असेल . यात काही मुलांनी ठरवलेले असते कि मला या I.T.I. मध्ये प्रवेश मिळाला तरच मी  I.T.I. करणार , तर काही मुलांनी ठरवलेले असते मला याच ट्रेडला प्रवेश घ्यायचा आहे. त्याप्रमाणे जर आपण Institute Wise वर क्लिक केलेनंतर  Institute Type ( संस्थेचे प्रकार ) यात GOVERNMENT आणि  PRIVATE असे दोन ऑपशन दिसतील त्यापैकी आपल्या आर्थिक स्थितीनुसार ऑपशन निवडावा. ( माझ्या मते GOVERNMENT योग्य आहे. )   त्यानंतर जिल्हा निवडावा.  निवडलेल्या जिल्ह्यानंतर तालुका निवडायचा. त्यानंतर त्या तालुक्यातील I.T.I. ची यादी दिसेल ( एकापेक्षा जास्त असतील तर नाहीतर एकच ) त्यातील एक निवडून SEARCH वर क्लिक करावे म्हणजे त्या ठराविक I.T.I.मधील  ट्रेड दिसतील त्यातील आपण ज्या ट्रेडला प्रवेश घेल्याचे ठरवले असेल त्या ट्रेडच्या पुढे लिहिलेल्या ADD TO PREFERENCE LIST वर क्लिक करावी म्हणजे  तो ट्रेड निवडला जाईल आणि त्या ट्रेडचे पुढे  ADDED TO PREFERENCE LISTअसे लिहिलेले दिसेल, आणि आपणास स्क्रीन च्या डाव्या बाजूला ( मोबाईलवर वरच्याबाजूला ) Step 2 च्या येथे अंकात आपण निवडलेल्या ट्रेडची संख्या दिसेल जसे तुम्ही ट्रेड ऍड करत जातील त्याप्रमाणात या संख्या वाढत जातील जर एखादा ट्रेड रद्द करायचा असेल तर ADDED TO PREFERENCE LIST वर क्लिक करायची म्हणजे तो   ट्रेड आपल्या लिस्ट मधून कमी होईल व डाव्या बाजूची संख्या पण त्या प्रमाणात कमी झालेली असेल. जर आपणास दुसऱ्या जिह्ह्यातील ,तालुक्यातील ट्रेड वाढवायचे असतील तर वरीलप्रमाणेच कृती करावी.  त्या नंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या STEP 2 वर क्लिक करायचे  म्हणजे आपण निवडलेले सर्व ट्रेड आपणास दिसतील. त्यानंतर आपणास जर ट्रेड चा चॉईस क्रमबदलायचा असेल तर , बदलण्यासाठी त्या विकल्पावर MOUSE  ची डावी KEY दाबून विकल्प वर किंवा खाली करावेत.   त्या नंतर GENERATE AND SAVE वर क्लिक करावी म्हणजे आपण निवडलेले सर्व ट्रेडची यादी PDF फॉरमॅट मध्ये SAVE होईल आणि आपणास पाहिजे असल्यास प्रिंट घेऊ शकता.  ITI Admission

                            

ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत  Trade Wise या पद्धतीत Trade Wise वर क्लिक करावी. त्यानंतर Institute Type ( संस्थेचे प्रकार ) यात GOVERNMENT आणि  PRIVATE असे दोन ऑपशन दिसतील. वरीलप्रमाणेच GOVERNMENT वर क्लिक करावी. त्यानंतर जिल्हा निवडावानिवडलेल्या जिल्ह्यानंतर तालुका निवडायचा. त्यानंतर आपणास जो ट्रेड निवडायचा आहे तो निवडायचा. आणि मग  SEARCH वर क्लिक करावे म्हणजे फक्त तोच ट्रेड दिसेल त्यावर क्लिक करायची. ADD TO PREFERENCE LIST वर क्लिक करावी म्हणजे  तो ट्रेड निवडला जाईल आणि त्या ट्रेडचे पुढे  ADDED TO PREFERENCE LISTअसे लिहिलेले दिसेल, आणि आपणास स्क्रीन च्या डाव्या बाजूला ( मोबाईलवर वरच्याबाजूला ) Step 2 च्या येथे अंकात आपण निवडलेल्या ट्रेडची संख्या दिसेल.  दुसरा ट्रेड निवडताना ट्रेड वर जाऊन त्या तालुक्यातील  दुसरा ट्रेड निवडून पुन्हा SEARCH वर क्लिक करावे.  म्हणजे नवीन ट्रेड खाली दिसेल त्या ट्रेड   पुढे ADD TO PREFERENCE LIST वर क्लिक करावी म्हणजे  तो ट्रेड निवडला जाईल आणि त्या ट्रेडचे पुढे  ADDED TO PREFERENCE LIST. असे येईल. याप्रमाणे आपण ट्रेड निवडू शकतो .  आपणास स्क्रीन च्या डाव्या बाजूला Step 2 च्या येथे अंकात आपण निवडलेल्या ट्रेडची संख्या दिसेल जसे तुम्ही ट्रेड ऍड करत जातील त्याप्रमाणात या संख्या वाढत जातील जर एखादा ट्रेड रद्द करायचा असेल तर ADDED TO PREFERENCE LIST वर क्लिक करायची म्हणजे तो   ट्रेड आपल्या लिस्ट मधून कमी होईल व डाव्या बाजूची संख्या पण त्या प्रमाणात कमी झालेली असेल. त्यानंतर  स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या STEP 2 वर क्लिक करायचे  म्हणजे आपण निवडलेले सर्व ट्रेड आपणास दिसतील. त्यानंतर आपणास जर ट्रेड चा चॉईस क्रमबदलायचा असेल तर , बदलण्यासाठी त्या विकल्पावर MOUSE  ची डावी KEY दाबून विकल्प वर किंवा खाली करावेत.   त्या नंतर GENERATE AND SAVE वर क्लिक करावी म्हणजे आपण निवडलेले सर्व ट्रेडची यादी PDF फॉरमॅट मध्ये SAVE होईल आणि आपणास पाहिजे असल्यास प्रिंट घेऊ शकता. त्यानंतर लॉगऑऊट करावे. 

मित्रांनो जर काही अडचण आलीच तर त्याचेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी विभागनिहाय मदत कक्ष तयार केले असून हेल्पलाईन नंबर दिले आहेत. सदर नंबर वर आपण सकाळी १०. ०० ते सायंकाळी ६. ०० वाजेपर्यंत संपर्क करू शकता. 

हेल्पलाईन नंबर खालीलप्रमाणे आहेत .                                                                                                 मुंबई , मुंबई उपनगर , ठाणे , पालघर, रायगड , रत्नागिरी ,सिंधुदुर्ग साठी  9049876185 आणि                                                                                     7709243555.

पुणे , कोल्हापूर , सोलापूर ,सातारा ,सांगली साठी 9607435415 आणि                                                                                           9607735415.

नाशिक , नंदुरबार , अहमदनगर , धुळे, जळगांव  साठी 7385165239 आणि                                                                                   7385345238

औरंगाबाद , परभणी , हिंगोली , बीड , जालना, उस्मानाबाद , लातूर , नांदेड  साठी   8857836418                                                                                                                        आणि       9322257628.    अमरावती , बुलढाणा ,यवतमाळ, अकोला, वाशीम साठी 9421830360 आणि                                                                                                                               7558260964 

नागपूर, भंडारा , गोंदिया , वर्धा , गडचिरोली , चंद्रपूर साठी 7249541065   आणि                                                                                                                             8669108483

टिप्पण्या