खाद्य आणि पेय सेवा सहाय्यक ( Food & Beverages Service Assistant )


मित्र आणि मैत्रिणींनो ,

आतापर्यंत आपण मशीन संबंधित , बांधकाम क्षेत्रासंबंधित ट्रेडची माहिती पाहिलीत .  मागील पोस्टमध्ये आपण जरा हटके ट्रेडची माहिती पाहीली. आज अजुन एका ट्रेडची माहीती करुन घेऊया. हा ट्रेडही हाॅटेल उद्योगाशीसंबंधीत आहे. कीचनमध्ये अन्न तर तयार झाले पण ते ग्राहकापर्यंत आणण्यासाठी र्सव ( Serve ) करणारे पण पाहीजेत ना ? कीचनमध्ये जे अन्न तयार झाले ते  र्सव करण्याची तयारी, र्सविंग , उपभोगणे, आणि उपभोगानंतर      ( वापरानंतर)  साफसफाई ही सर्व कामाची साखळी असतेआणि हि साखळी पूर्ण करतो  तो म्हणजे खाद्य आणि पेय सेवा सहाय्यक . या व्यक्तीला  शास्त्रशुध्द प्रशिक्षण फुड अॅन्ड बेवरेज सर्विस असिस्टंट ( Food & Beverages Service Assistant ) या ट्रेडमध्ये दिले जाते. 

ITI Admission 

  शैक्षणिक पात्रता : - दहावी पास   ( गणित आणि               विज्ञान विषय  बंधनकारक नाही)                      प्रशिक्षण कालावधी :- १ वर्ष                                व्यवसायाचा प्रकार :- बिगर अभियांत्रिकी व्यवसाय                                                                                                       

मित्रानो थोडक्यात या ट्रेडमध्ये हाॅटेलमध्ये जो ग्राहक येतो त्याच्याशी कसे बोलायचे, खाद्य आणि पेय कसे र्सव ( द्यायचे) याचे शास्त्रशुध्दपध्दतीचे शिक्षण दीले जाते. चलातर या ट्रेडमध्ये अजुन काय काय शिकविले जाते ते पाहुया..... 

या ट्रेड मध्ये कॅटरिंग / हॉटेल उद्योगाबाबतची माहिती , विविध प्रकारचे कॅटरिंग आस्थापना, ना नफा आणि नफा कमविणार्‍या आस्थापना, ताराकिंत हाॅटेलमधील विविध श्रेणीमध्ये अन्न आणि पेय सेवा सहाय्यकाचे महत्त्व , खाद्य  आणि पेय सेवा सहाय्यकाचे गुणधर्म , त्याचे कर्तव्य आणि जबाबदार्‍या , हाॅटेलमधील स्वच्छता विभाग, अन्न आणि पेय सेवा सहाय्यक आणि इतर सहाय्यक विभागामधील समन्वय, र्सौदर्य , स्वच्छता आणि शिष्टाचार याविषयी शिकविले जाते.

हाॅटेलमधील टेबल लावताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे, टेबलाजवळ थांबतानाचे नियम , सेवा उपकरणे आणि त्यांचे वर्गीकरण आणि त्यांची देखभाल, ग्लासवेअर (काचेची भांडी), कटलरी (  खाताना वापरले जाणारे काटा , चमेचे आणि सुरी ), क्रोकरी ( मातीची भांडी) याबाबत शिकविले जाते. टेबल लावण्याचे कौशल्य, तागाच्या कपड्याबाबत, त्याचा योग्य वापर , नेपकीनच्या फोल्डींगचे  प्रकार , ताग्याची देखभाल राखणे ते बदलणे, वेटरचे कपडे याबाबतही शिकविले जाते. 

आरोग्यदायीरित्या फ्लॅट वेर ( बशा , ताटे, चमचे, काटे) hollowware ( जेवण वाढताना वापरले जाणारे बाऊल, पाॅट, कीटली,आइस जग ही भांंडी धातुची अथवा काचेची बनविलेली असतात.) हाताळण्याबाबत शिकविले जाते. स्वेवार्ड ( अन्न पदार्थाची व्यवस्था पाहणारी व्यक्ती - कारभारी ) त्याची कर्तव्ये आणि जबाबदार्‍याबाबत सांगितले जाते. विविध प्रकारचे डीश धुण्याच्या पध्दती. अन्न खाताना वापरले जाणारे चमचे, काटे योग्य प्रकारे हाताळण्याचे कौशल्य शिकविले जाते. ट्रेमध्ये उपकरणे, अन्न , पेय ठेवुन बॅलन्स करुन घेऊन जाण्याची पध्दत , सर्विस देण्याचे प्रकार जसे अमेरिकन, फ्रेंच आणि इंग्रजी पध्दती आणि त्यांचे तंत्र शिकविले जाते.

पेनट्री (हाॅटेलमधील काचसामान ) स्टील हॉल्लोववेर  रुम ( अशी रुम जी किचनला लागुन असते व त्यात वाईन व केक्स जतन करुन ठेवतात. शीतपेये , चहा, काॅफी तयार केल्या जातात.  ) मध्ये लागणार्‍या अमेरिकन ,फ्रेंच , इंग्रजी प्रकारच्या सेवा पध्दतीच्या  उपकरणाबाबत शिकविले जाते. साईड स्टेशनवर ( रेस्टाॅरंट फर्निचरचा सर्वात महत्त्वाचा भाग  ) यावर सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवणे, योग्य प्रकाश योजना , फर्निचर व्यवस्था, फुलांची सजावट आणि ईतर प्राॅप्ससह एक चांगले वातावरण तयार करणे याबाबतचे महत्त्व शिकविले जाते. रुम सर्विस (सेवा) बाबतही यात शिकविले जाते जसे रुम सर्विसचे प्रकार, रुम सर्विस श्रेणीची रचना, रुम सर्विस ट्रेची रचना, फास्ट फुडची सर्विस, न्याहारी , ब्रच ( सकाळची न्याहारी घेण्या ऐवजी जरा लवकर घेतलेले जेवण ) , दुपारचे जेवण, दुपारचा चहा , रात्रीचे जेवण , तसेच प्रि प्लेटेड फुड ( ही एक अमेरिकन सर्विस की ज्यात कीचनमधुनच जेवणाच्या डीश शेफ लावतो व खाद्य आणि पेय सेवा सहाय्यकामार्फत र्सव केले जाते. ) ट्रे  मध्ये किंवा ट्रालीमध्ये लावण्याचे कौशल्य शिकवितात.

न्याहारीचे प्रकार जसे अमेरिकन , इंग्लिश , भारतीय आणि खंडीय. बँकेट्सचे सोपस्कार ( बँकेट् स म्हणजे औपचारिक मोठे जेवण किंवा मेजवानी , ज्यात बहुतेक वेळा मुख्य कोर्स आणि मिष्टान्न यांचा समावेश असतो.) या मेजवानीतील बैठक व्यवस्थेचे प्रकार, बँकेट् स ची बुकिंग घेणे, बँकेट् स सभारंभाची संभावना, बुफेची व्यवस्था, विविध प्रकारचे बुफेचे प्रकार, पाहुण्यांचे औपचारिकपणे स्वागत करणे, आणि टेबलाजवळ नेऊन पाणी देणे, मेनु कार्ड दाखविणे, आॅर्डर घेणे, KOT  ( किचन ऑर्डर टीकीट )  ही एक नोट असते प्रामुख्याने यात आॅर्डर केलेल्या वस्तु आणि त्याच्या प्रमाणात संबंधित तपशिल असतो.) तसेच BOT ( म्हणजे बार ऑर्डर टीकीट होय) , र्सव करणे, बिल देणे आणि पेमेंट स्विकारणे , यापध्दतीने येथे कामाचा क्रम असतो आणि त्याप्रमाणे  प्रशिक्षणार्थ्यांकडुन सराव करुन घेतला जातो.ITI Admission

प्रशिक्षणाच्या दुसर्‍या सत्रात खालील बाबींबाबत शिकविले जाते. पेयाचे वर्गीकरण -  अल्कोहोलिक , अल्कोहोल विरहीत.    

अल्कोहोल विरहीत पेय जसे १) उत्साहवर्धक - वायुजन्य ( कार्बनडाय ऑक्साइड वायुशी संयोग घडवलेले पेये. )  २) पोषक पेय -  जसे दुध , शेक आणि ज्युस.    ३) हर्बल चहा.

काॅफी बनविण्याच्या पध्दती, काॅफी बनविताना होणार्‍या चुका, काॅफीची साठवण आणि काॅफी र्सव करण्याची पध्दत तसेच चहा बनविण्याच्या पध्दती, चहा बनविताना होणार्‍या चुका, चहा साठवण व चहाचे प्रकार आणि चहा र्सव करण्याचे कौशल्य शिकवितात.

अल्कोहोलिक पेय ( मादक पेय) फेसाळणारे पेय वाईन, त्याची व्याख्या , तपशिल , द्राक्षाची वाईन, वाईन  उगवणारे देश आणि विशेष प्रदेश ( फ्रान्स, कॅलिर्फोनिया, जर्मनी, ईटली युएसए आणि भारतातील महत्त्वाच्या वाईनची नावे )  शिकविले जाते.

वाईन तयार करण्याची प्रक्रिया, वाईनचे वर्गीकरण जसे टेबल वाईन (  जेवताना पिली जाणारी ) , स्पार्कलिंग  वाईन ( फसफसणारी वाईन  ), फोर्टिफाइड  वाईन (गोड गडद लाल मुळची पोर्तुगालची वाईन  ) ,ऍरोमॅटिज्ड  वाईन (सुंगधित वाईन ) आणि वाईनसंबंधीत व्याख्याची माहीती शिकविली जाते. तसेच वरील सर्व प्रकारच्या वाईन र्सव करण्याचे कोशल्यही शिकविले जाते.

बिअरबाबत , बिअर कशी तयार केली जाते, बिअरची साठवणुक, त्याचे ब्रँड तसेच बिअर कशा पध्दतीने र्सव केली जाते याचे कौशल्य दीले जाते. त्याचप्रमाणे व्होडका, रम , व्हीस्की, ब्रँडी आणि तकीला यांची निर्मिती कशी केली जाते यांचे ब्रँड आणि र्सव करण्याचे कौशल्यही शिकविले जाते.

काॅकटेल ( मिश्र मादक पेय) , माॅकटेल ( विविध प्रकारच्या पेयांना मिक्स करुन बनविलेले पेय ज्यात अल्कोहोल नसते)  यांची माहीती, त्यांचे मिश्रण , सजावट याबाबत,  व्हीस्कीवर आधारीत, जीनवर आधारीत, व्होडकावर आधारीत , रमवर आधारीत काॅकटेल आणि माॅकटेल बाबत शिकविले जाते तसेच ते र्सव करण्याचे कौशल्यही शिकविले जाते.

सिगार म्हणजे काय? त्याचा आकार , ब्रँडची नावे आणि त्याची साठवण तसेच सिगारेट त्याचे ब्रँडचे नावे आणि हे र्सव करण्याचे कौशल्य शिकविले जाते. सलाट , आईसक्रीम आणि सुप यांचे वर्गीकरण ,निवड  आणि र्सव करण्याचे कौशल्य शिकविले जाते

या ट्रेडचे यशस्वीपणे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर 3 स्टार , 5 स्टार हाॅटेल मध्ये, रेस्टारंटमध्ये एक वर्षाची शिकाउ उमेदवारी करावी लागते. त्यानंतर NCVT ची परिक्षा. या परिक्षेत पास झाल्यावर                                      नोकरीची संधी :- 3 स्टार ,5 स्टार हाॅटेल, स्पेसिअलीटी रेस्टोरंट, डाईनिंग हाॅल, रेस्टोरंट / मोटेलस् ,बार,पब , परमीट रुम , हेल्थ क्लब, कॅटरिंग सर्विसेस , हाॅस्पिटल, रेल्वे कॅटरिंग , शिपिंग कार्पोरेशन , एअर लाईन, एअर पोर्ट हाॅटेल, मिलिटरी कॅन्टींग , फास्ट फुड या ठीकाणी नोकरी मिळु शकते.

मित्रांनो  पण खाद्यआणि  पेय सेवा सहाय्यक ( F& B Service Assistant ) हा ट्रेड मुंबईमध्ये आय.टी.आय. मुलुंड आणि आय.टी.आय. बोरीवली येथे आणि पुणे जिल्ह्यात आय.टी.आय.लोणावळा येथेच आणि नाशिकमध्ये   व्दारका सर्कल जवळ  आहे.

ITI  Admission 

टिप्पण्या