Food Production ( General ) फूड प्रोडक्शन ( जनरल )

ITI Admission  
मित्र आणि मैत्रिणींनो ,

आतापर्यंत आपण मशीन संबंधित , बांधकाम क्षेत्रासंबंधित ट्रेडची माहिती पाहिलीत .  आज आपण जरा हटके ट्रेडची माहिती पाहणार आहोत. हा ट्रेड किचन ( स्वयंपाकघराशी संबंधित आहे. या ट्रेडचे नाव आहे फूड प्रोडक्शन ( जनरल )  असे आहे. 

शैक्षणिक पात्रता : - दहावी पास   ( गणित आणि विज्ञान विषय                          बंधनकारक नाही)                                             प्रशिक्षण कालावधी :- १ वर्ष                                                                                                                         व्यवसायाचा प्रकार :- बिगर अभियांत्रिकी व्यवसाय                                                                        

मित्रानो खरे तर घरगुती जेवण  बनविणे आणि व्यावसायिक म्हणजेच हॉटेलात किंवा एखाद्या कार्यक्रमात जेवण बनविणे या दोन्ही बाबी भिन्न आहेत. फुड प्रोडक्शनहा हाॅटेल मॅनेजमेंटचा आत्मा आहे.निवांत वातावरणात चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहक हाॅटेलात जातो. व्यावसायिकरित्या तुम्हांला जेवण तयार करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीने  शिकणे महत्वाचे आहे. आणि हेच या ट्रेडमध्ये शिकविले जाते. यात चोख दर्जा, अचुक वजन, योग्य पध्दत, उत्कृष्ट सजावट याचा समावेश असतो. या ट्रेडमध्ये सलाट, सूप , भाताचे वेगवेगळे प्रकार, केकचे विविध प्रकार, ब्रेडचे प्रकार,  बनविण्यास शिकविले जातात. चला तर या ट्रेडमध्ये अजून काय काय शिकविले जाते ते पाहूया..... 

या ट्रेड मध्ये कॅटरिंग / हॉटेल उद्योगाबाबतची माहिती , किचनचा परिचय ( किचन  म्हणजे फक्त जेवण तयार करण्याची  जागा किंवा रूम  नव्हे तर किचन हे एक  बंधनकारक   क्षेत्र  आहे जे  केवळ आपल्या घरास  एकत्र जोडत  नाही तर आपल्या प्रियजनांनाही जोडते.) . पाककलेचे उद्देश , किचनमधील आपल्या  जबाबदाऱ्या आणि  कर्तव्ये  , किचनमधील लहान ,माध्यम  आणि मोठे आकाराचे उपकरणे आणि ते हाताणल्याची पद्धत , चाकू , सुरे आणि काही इतर साधने वापरतानाचे सुरक्षाविषयक नियम, अग्नीचा धोका , कापणे ,जळणे  यावरचे प्रथोमपचार ,स्वतःची सुरक्षितता म्हणजे त्वचा , हात, पाय,  जेवण पदार्थ हाताळताना , संरक्षणात्मक साधनांचा उपयोग करणे. किचनची स्वछता आणि किचनमधील स्वछतेचे, किचन मध्ये आणीबाणी ( आपत्ती ) निर्माण झाली तर काय करायचे, कचरा व्यवस्थापन करण्या बाबत शिकविले जाते.    

न शिजविलेल्या ( कच्च्या ) भाज्यांचे वर्गीकरण , पदार्थ मिसळन्याची पद्धत , पदार्थावर होणारा उष्णतेचा परिणाम ,जेवणाची  पोत / दर्जा , त्याचे वजन  याची माहिती दिली जाते. किचन मधील काही शब्दांची माहिती , भाज्या कापण्याचे तंत्र आणि डिश सजविण्याचे  कौशल्य शिकविले जाते. 

मासे , भाज्या, चीज , डाळी  आणि अंडी इत्यादी वेगवेगळे पदार्थ शिजवल्याची पद्धत शिकविली जाते.  अन्न  शिजविण्याची पारंपरिक आणि आधुनिक अश्या दोन्ही पद्धती शिकविल्या जातात. जसे सौर उर्जेवर, ओव्हनमध्ये. डाळ पालेभाज्या यांचे दहा प्रकार ,चटणीचे दहा प्रकार,रायत्याचे पाच प्रकार, भाताचे पाच प्रकार, ब्रेडचे पाच प्रकार, अशाप्रकारचे पदार्थ बनविण्यास   कौशल्य शिकविले जाते. चांगल्या प्रतीचे अंडी निवडीचे ,अंड्याच्या साहाय्याने न्याहारीचे पदार्थ बनविण्या बाबतही शिकविले जाते. अंडी शिजविण्याचे  विविध प्रकार शिकविले जातात. ITI Admission

सलाट आणि त्याचे वर्गीकरण , लिंबाचे काप  ( तुकडे ) करण्याच्या पद्धती,सूपची व्याख्या , वर्गीकरण , पांढरा सूप, ब्राऊन सूप आणि फिश सूप तसेच काही प्रसिद्ध राष्ट्रीय सूप, बनविण्यासाठी लागणारे साहित्य , बनविण्याची पद्धत तसेच तयार करतानाची खबरदारी  याचेही   कौशल्य शिकविले जाते.  मदर सॉसचे प्रकार (  टोमेंटो सॉस, अंड्यातील बलकचे सॉस ) १ लिटर सॉस बनविण्यास लागणारे साहित्य , सॉस बनविताना घ्यावयाची खबरदारी , नुसते शिकविले  जात नाही तर बनविण्याचेही  कौशल्य शिकविले जाते. लोणीचा इतिहास, लोणीचे प्रकार, लोणी बनविण्याची प्रक्रियाही  शिकविली जाते.

वेगवेगळ्या पाले भाज्यावर होणार  उष्णेतेचा  परिणाम , वेगवेगळ्या पालेभाज्या बनविण्याच्या ( जेवणात )पद्धती. अन्न ठेवण्याची खोली , तिचे ले आऊट , या  खोलीतील उपकरणांची देखभाल, हे उपकरणे पुरविणारे पुरवठादार  याची माहिती / शिकविले जाते.  माशांचे वर्गीकरण, त्यांचे साफ करणे, आणि स्वच्छ करणे आणि किचनमध्ये बनविण्यास तयार करणे. ते  कापण्याची पद्धत  आणि साठवणूकबाबत शिकविले जाते. कसाई कडून केले जाणारे कोकरू , डुकराचे , मटणाचे तुकडे आणि त्यांचे वापर आणि वजन याचे प्रात्यक्षित दिले जाते.तसेच चिकनचे पदार्थ बनविण्याचे कौशल्यही दीले जाते

  अन्न म्हणून विकले जाणारे पक्षी( कोंबडी , बदक )  त्यांचे वर्गीकरण , ते करण्याचे प्रकार त्याप्रमाणे त्यांचा   वापर तसेच किचनमध्ये वापरास तयार करणे, गेम बर्ड ( तितर , हंसाच्या जातीचे पक्षी ) त्यांचे वर्गीकरण , ते करण्याचे प्रकार त्याप्रमाणे त्यांचा   वापर तसेच किचनमध्ये वापरास तयार करणे. 

कोल्ड बफेट ( जसे कपकेक्स , पिझ्झाचे तुकडे, काॅकटेल स्टीकवरील पदार्थ  ), सँडविचचे प्रकार , ते बनविण्यासाठी लागणारे पदार्थ, कॅनाप ( एक सजावटीचा खाद्य पदार्थ असुन त्यात ब्रेडचा छोटासा तुकडा असतो पफ, पेस्र्टी किंवा काही चवदार खाद्यपदार्थ असलेले बटाटे असतात. ) हे वरील पदार्थ बनविण्याचे  कौशल्य शिकविले जाते.

उरलेले पदार्थ साठविण्याची योग्य पध्दत शिकविली जाते.चीजचे वर्गीकरण आणि त्यांचा वापर . पास्ता आणि त्याची विविधता आणि त्याच्या स्वयंपाकाच्या पध्दती याबातचे कौशल्यही शिकविले जाते.ब्रेडचे सिध्दांत, ब्रेडचे प्रकार, ब्रेड रोल, ब्रेड स्लाइस आणि भारतीय ब्रेड् स बनविण्याचे, पेस्र्टीचे प्रकार आणि त्याच्या पाककृतीचे कौशल्य शिकविले जाते.जाम टोट ( फळे घालुन शिजविलेले एक खाद्यपदार्थ ),लेमन टोट, स्विस रोल, पफ, पॅटीस, कुकीज् आणि केक बनविण्याचे कौशल्यही शिकविले जाते.

भारतातील अन्नाचे प्रचलित मानक, अन्न भेसळीने होणारे सार्वजनिक आरोग्यास धोका, याबाबतच्या चाचण्या याबाबतही या ट्रेडमध्ये शिकविले जाते.

या ट्रेडचे यशस्वीपणे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर 3 स्टार , 5 स्टार हाॅटेल मध्ये, रेस्टारंटमध्ये एक वर्षाची शिकाउ उमेदवारी करावी लागते. त्यानंतर NCVT ची परिक्षा. या परिक्षेत पास झाल्यावर नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय करु शकतात.            

  नोकरीची संधी :- 3 स्टार ,5 स्टार हाॅटेल, स्पेसिअलीटी रेस्टोरंट, डाईनिंग हाॅल, रेस्टोरंट / मोटेलस् ,बार,पब , परमीट रुम , हेल्थ क्लब, कॅटरिंग सर्विसेस , हाॅस्पिटल, रेल्वे कॅटरिंग , शिपिंग कार्पोरेशन , एअर लाईन, एअर पोर्ट हाॅटेल, मिलिटरी कॅन्टींग , फास्ट फुड आउटलेट आणि पिझ्झा हट या ठीकाणी नोकरी मिळु शकते.

जर स्वत:चा व्यवसाय करायचा तर कॅटरिंग , नाही तर मित्रांनो पोळीभाजीचा व्यवसायही करु शकतो. आपणास माहीतच असेल की हा व्यवसाय आज काल कीती तेजीत चालतो.

मित्रांनो  पण फुड प्रोड्यक्शनचा हा ट्रेड मुंबईमध्ये आय.टी.आय. मुलुंड आणि आय.टी.आय. बोरीवली येथे आणि पुणे जिल्ह्यात आय.टी.आय.लोणावळा आणि नासिक येथेच आहे.

टिप्पण्या