अर्जातील चुकी सुधारण्याबाबत आणि नवीन अर्ज करणे.

iti admission 
नमस्कार मित्रांनो,
तुम्हांला सर्वांना माहीत आहेच की प्रवेशाचा  पहीला राऊंड दि. १४ सप्टेंबरला संपला
दि. १८  सप्टेंबर पासुन दुसरा राउंड चालु होणार होता परंतु काही कारणास्तव दुसरी फेरी थांबवली आहे.

पहील्या प्रवेश फेरीच्या राऊंडमध्ये तुमच्या पैकी काही मुलांचे नंबर लागले असतील परंतु अर्जात काही चुकी असल्याने जसे की १) दहावीला तांत्रिक विषय नव्हता तरी मार्क लिहीले गेले.
२) दहावी शहरी भागातुन केली परंतु अर्ज नीट भरला नसल्याने ग्रामीण भागाचे मार्क अॅड झाले. अशा बर्‍याच काही चुका असल्याने प्रवेश  नाकारला केला असेल.... 
असो तर अशा काही चुका तुमच्या अर्जात असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी २० सप्टेंबर पर्यत तुम्हाला वेळ दीली आहे. तरी योग्य त्या दुरुस्त्या करून घेणे. ही सर्व माहीती अॅडमिशनच्या संकेतस्थळावरही आहे. तरी तुमच्या सर्व मित्रांना कळवा किंवा ही माहीती वाचण्यास सांगणे ही विनंती.

दुसरा मुद्दा...
ज्यांनी असुन काही कारणामुळे आय.टी.आय. मध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला नसेल किंवा अर्ज केला होता पण अर्ज निश्चीत करण्याचे पैसे (फी) भरली नसेल त्यांना परत नवीन अर्ज करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन दीलेली आहे. तरी यासंधीचा फायदा करुन घ्या आणि आपल्या मित्रांनाही सांगा.
नवीन अर्ज भरण्यासाठी आणि अर्ज निश्चितीची सुरुवात दि. १० सप्टेंबर पासुन सुरु झाली असुन दि. ०५आक्टोबर सांय ५ वाजेपर्यत आहे.

हा पण नवीन अर्ज निश्चीती केलेल्यांचा विचार चौथ्या प्रवेश फेरीनंतर 
होईल. ही फेरी पाचवी असणार आहे ( जिल्हा समुपदेशन फेरी)  ही फेरी जिल्हास्तरावर होणार आहे. यासाठी चौथ्या राऊंडनंतर आपल्या जिल्ह्यातील कोणत्या आयटीआयत कोणत्या ट्रेडला कीती जागा भरण्याच्या बाकी आहेत हे पाहुन घ्यावे लागेल. ही सर्व माहीती संकेतस्थळावर (webside) प्रसिध्द केली जाईल. या राऊंडला जास्तप्रमाणात गर्दी असणार आणि करोनाच्या काळातविचार करण्यासाठी एवढ्या वेळ देतील असे वाटत नाही. आयत्यावेळी फसगत नको. राऊंडच्यावेळी कोणत्या ट्रेडला प्रवेश घ्यावा यासाठी अनुक्रमे चार पाच ट्रेडचा विचार मनात करुन ठेवा.म्हणजे निर्णय घेणे सोप्पे होईल. कोणत्या ट्रेडमध्ये काय आहे हे आपणास सर्व या blog वरुन समजेलच.. 
पाचव्या फेरीसाठी आपणास ज्या जिल्ह्यात प्रवेश घ्यायचा आहे तेथे प्रयत्न करु शकतात. यासाठी आपल्या प्रवेश खात्यावर log in करुन योग्य त्या जिल्ह्यासाठी (आपल्या सोयीनुसार पण फक्त एकच जिल्हा) नोंदणी करावी लागेल. पुन्हा एकदा सांगतो आपल्या खात्यावर log in करुन नोंदणी करणे आवश्यक आहे.  नाहीतर आपला विचार या फेरीसाठी होणार नाही. ही नोंदणी त्यांनापण करायची आहे ज्यांनी अर्ज निश्चिती आधीच केली आहे पण अजुनपर्यंत कोणत्याही आयटीआयमध्ये अजुन प्रवेश मिळालेला नाही.  नोंदणी आपल्यास दि. १२ आॅक्टोबर ते  १३ आॅक्टोबर ५ वाजेपर्यंत या दीवसातच करायची आहे.( पण प्रवेशाच्या नवीन वेळापत्रकानुसार ही तारीख  बदलु शकते. तरी पुन्हाही तारीख तपासुन घ्या. एक दोन दिवसात नवीन तारीख प्रसिध्द होईल.)
पाचव्या फेरीची मेरिट लिस्ट दुसर्‍या दिवशी प्रसिध्द केली जाईल आणि आपणास मेसेज व्दारा कळविलेही जाईल.
अजुन काही असल्यास नक्कीच या blogच्या माध्यमातुन कळविले जाईलiti admission

टिप्पण्या