- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रथम फेरीबाबत आणि प्रशिक्षण फी बाबत
मित्रानो आय .टी . आय . प्रवेश प्रक्रियेच्या नवीन वेळापत्रक प्रमाणे ३१ ऑगस्ट २०२० तारख सायं . ५ : ०० पर्यंत वाढवली होती . त्यानंतर ३ सप्टेंबरला ११ : ०० वाजता प्राथमिक गुणवत्ता यादी संकेत स्थळावर (वेब साईड वर) प्रसिद्ध केली जाईल व याबाबत आपणास मोबाइलवर मेसेजने कळविलेही जाईल. तसेच प्रथम राऊंड ला त्याचा नंबर लागला आहे. या प्राथमिक गुणवत्ता यादी बाबत आपणास काही हरकती असल्यास साईडवर दिलेल्या दिलेल्या हेल्प लाईन क्रमांकावर , नजीकच्या शासकीय आय .टी . आय .मध्ये , इ मेल व्दारे हरकती नोंदवु शकतात. किंवा प्रवेश अर्जातील काही निवडक माहितीत बदल करू शकतात.परंतु हे सर्व दि . ०४ सप्टेंबर५ : ०० वाजे पर्यन्तच. त्यानंतर अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
दि. ५ सप्टेंबरला सायं . ५ : ०० वाजता अंतिम गुणवत्ता यादी संकेत स्थळावर (वेब साईड वर) प्रसिद्ध केली जाईल. आपणास याबाबत मोबाइलवर मेसेजने कळविलेही जाईल. दि. ८ सप्टेंबरला सायं ५ : ०० वाजता प्रथम फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल व याबाबत आपणास मोबाइलवर मेसेजने कळविलेही जाईल.
प्रथम फेरीसाठी ज्या उमेदवारांची निवड झाली असेल त्यांना मोबाईलवर कळविले जाईल कि , आपला प्रथम फेरीसाठी नंबर लागला असून ........ ( या ठिकाणी आय .टी . आय . नाव असेल ) या ठिकाणी जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. तिने टेबलनुसार दि. ९ सप्टेंबर पासून १४ सप्टेंबरपर्यंत सायं ५:०० वाजेपर्यंत आपण सदरच्या आय .टी . आय. जाऊन प्रवेश घेऊ शकता.
मेसेंगनुसार ज्या आय .टी . आय . आपला नंबर लागला असेल तेथे अर्ज भरताना वापरलेली मूळ कागदपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. या मूळ कागदपत्रात खालील गोष्टींचा समावेश होतो .
आवश्यक कागदपत्राबाबत
१) सर्वांसाठी दहावीचे गुणपत्रक ( मार्कशीट ) आणि शाळा सोडल्याचा दाखल आवश्यक आहे. जर एखादा उमेदवार कॉलेजमध्ये शिकत असेल तर त्याने कॉलेज सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. डुप्लिकेट शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रवेश दिला जाणार नाही. जर खरोखरच एखाद्याचा दाखला गहाळ , हरवला किंवा खराब झाला म्हणून डुप्लिकेट शाळा सोडल्याचा दाखला असेल तर या प्रकारात त्या उमेदवाराकडे या बाबत पोलीस केस केल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. नाही तर आपणास प्रवेश मिळु शकणार नाही.
२) जर एखाद्या उमेदवाराने अर्ज भरताना अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातून अर्ज भरला असेल तर त्याच्याकडे त्याच्या नावाचा महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या सहीचे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
२ अ ) जर एखाद्या उमेदवाराने अर्ज भरताना विमुक्त जाती ( VJ ) / भटक्या जमाती ( NT - A ), विशेष मागास प्रवर्ग ( SBC ) , भटक्या जमाती ( NT - B , C , D ) आणि इतर मागासवर्गीय ( OBC ) या प्रवर्गातून अर्ज भरणा असेल तर उमेदवाराकडे आपल्या नावाचा जातीचे महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या सहीचे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढील वर्षीं ३१ मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र योग्य प्राधिकारीने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.
२ ब ) जर एखाद्या उमेदवाराने अर्ज भरताना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी महाराष्ट्र राज्यातील कार्यकारी दंडाधिकाऱ्याने जात प्रमाणपत्र प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. तसेच पुढील वर्षीं ३१ मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र योग्य प्राधिकारीने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.
२ क ) जर एखाद्या उमेदवाराने अर्ज भरताना खुल्या प्रवर्गासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणून अर्ज केला असेल तर त्या उमेदवाराकडे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकच्या पात्रतेसाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र आणि पुढील वर्षीं ३१ मार्चपर्यंत वैधता असलेले नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र योग्य प्राधिकारीने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.
३ ) जर एखाद्याने अर्ज भरताना माजी सैनिक किंवा संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती किंवा त्यांचे पाल्य म्हणून जर अर्ज केला असेल तर संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमेदवाराचे आई / वडील संरक्षण सेवेत कार्यरत होते आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
४ ) जर एखाद्याने अर्ज भरताना अपंग उमेदवार म्हणून अर्ज भरला असेल तर अपंगत्वाचा प्रकार , अपंगत्वाची टक्केवारी , कायम स्वरूपी अपंगत्व याबाबतचा स्पष्ट उल्लेख असलेल्या वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
५ ) अल्पसंख्याक उमेदवारासाठी धर्माबाबतचे प्रमाणपत्र किंवा उमेदवार मुस्लिम , बौद्ध , ख्रिश्चन , शीख , पारशी जैन किंवा धर्मात मोडतो याचा उल्लेख असलेले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र . तसेच उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र किंवा उमेदवाराची आई / वडील महाराष्ट्र राज्याचे अधिवास असल्याचे प्रमाणपत्र.
६ ) जर तांत्रिक विषय ( TECHNICAL SUBJECT ) घेतलेले उमेदवार म्हणून अर्ज केला असेल तांत्रिक विषयाचा उल्लेख असलेले माध्यमिक शालांत परिक्षा मंडळाचे ( S.S.C. ) ची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र आवश्यक आहे.
७) जर अर्ज भरताना इंटर मिडिएट चित्रकला परीक्षा दाखविली असेल तर सदरची परीक्षा उत्तीर्ण चे प्रमाणपत्र .
८) जर अर्जात N.C.C. / M.C.C. / स्काऊट गाईड / सिव्हिल डिफेन्स गाईड दाखविले असेल तर सदरचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
९) अर्जात क्रीडा दाखविले असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याचे खेळाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
१०) जर उमेदवाराने दहावी बालसुधार गृहातुन पास झाल्याचे लिहिले असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
११ ) जर उमेदवाराने अनाथ असून अनाथाश्रमात वास्तव्य असल्याचे लिहिले असेल तर त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
१२) जर उमेदवाराने ग्रामीण भागातील शाळेतून दहावी केली आहे असे लिहिले असेल तर २०११ च्या जनगणनेनुसार जाहीर झाल्याप्रमाणे ग्रामीण भागातील असेल तर त्याला गुणाधिक्य दिले जाईल.
मित्रांनो फक्त एक लक्षात ठेवा आपली मुळ कागदपत्र आय.टी.आय.मध्ये जमा करताना प्लास्टिकच्या फोल्डरमध्ये जमा करा म्हणजे व्यवस्थित राहतील. तसेच सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स चा एक सेट बरोबर घेऊन जाणे. सोबत आधार कार्ड हि देऊन जाणे. आणि फी देऊन जाणे.
फीबाबत माहिती
मित्रांनो आय .टी .आय . मध्ये तीन प्रकारचे ट्रेड असतात / आहेत. १) मशीन गट ( अभियांत्रिकी व्यवसाय ) - जोडारी (फिटर ) , यंत्रकारागीर ( मशिनिस्ट ), यंत्रकारागीर घर्षण ( मशिनिस्ट ग्राइंडर ) , मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स ( MMTM ) ,ऑपरेटर ऍडव्हान्स मशीन टूल्स ( OAMT ), जनरल फिटर कम मेकॅनिक ( SCVT ), पत्रकारागीर ( शीट मेटल वर्कर ), टूल अँड डाय मेकर ( डाईझ अँड मौल्ड ), टूल अँड डाय मेकर , कातारी ( Turner ), संधाता ( वेल्डर ) आणि मरिन फिटर सर्वं मशीन गटात मोडणारे आहेत.
२) बिगर मशीन गट ( अभियांत्रिकी व्यवसाय ) - वास्तु शास्त्र सहाय्यक (Architectural Draughtsman ) , अटेन्डन्ट ऑपरेटर केमिकल प्लान्ट, सुतारकाम,ड्राफ्समन सिव्हील, ड्राफ्समन मेकॅनिकल, विजतंत्री, इलेक्टानिक्स मेकॅनिक, इलेक्टोप्लेटर,जोडारी, फौड्रीमन, इन्फाॅर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नाॅलाॅजी सिस्टीम मेन्टेनन्स, इन्स्टुमेन्ट मेकॅनिक, ईन्स्टुमेंट केमिकल प्लान्ट, इंटीरिअर डिझाईन अँड डेकोरेशन, मेन्टेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांन्ट,गवंडी,मेकॅनिक अँग्रीकल्चरल मशिनरी, मेकॅनिक ऑटो बाॅडी रिपेअर,मेकँनिक ऑटो बाॅडी पेंटींग, मेकॅनिक ऑटो इलेक्टीकल अँड इलेक्टोनिक्स, मेकॅनिक कंझुमर इलेक्टोनिक्स अप्लायन्स,मेकॅनिक डिझेल, टेक्निशियन मेकॅट्राॅनिक्स, टेक्निशियन मेडीकल इलेक्टोनिक्स, मेकॅनिक मोटर वेहिकल, मेकॅनिक मोटर सायकल, यांत्रिक प्रशितन व वातानुकुलित, मेकॅनिक ट्रॅक्टर, रंगारी, प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर, नळकारागिर, पम्प ऑपरेटर कम मेकॅनिक, रबर टेक्निशियन, ऑर्कीटेक्चरल ड्राफ्समनशिप, कॅबिनेट फर्निचर मेकर, स्पिनिंग टेक्निशियन, सर्व्हेअर, टेक्निशियन पाॅवर इलेक्टोनिक्स सिस्टीम्स, टेक्सटाईल्स वेट प्रोसेसिंग टेक्निशियन, विव्हींग टेक्निशियन , तारतंत्री इत्यादी
३) बिगर अभियांत्रिकी व्यवसाय :- बेकर अँड कन्फेक्शनर, बेसिक काॅस्माॅटोलाॅजी, काॅम्पुटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेन्टेनन्स, कोपा, सुईंग टेक्नोलाॅजी, डेंटल लॅबोरेटरी इक्विपमेंट टेक्निशियन, डेस्कटाॅप पब्लिशिंग ऑपरेटर, डिजिटल फोटोग्राफर, ड्रेस मेकिंग, सरफेस ऑरनामेंटेशन टेकनिक्स, फॅशन डिझाईन अँड टेक्नोलाॅजी, फायर टेक्नोलाॅजी अँड इंडस्टीयल सेफ्टी मॅनेजमेंट, फुड अँड बेव्हरेज सर्व्हीस असिस्टंट, फुड प्रोडक्शन ( जनरल), फ्रंन्ट ऑफिस असिस्टंट, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, हेल्थ सॅनेटरी इन्स्पेक्टर, हाॅस्पीटल हाऊस किंपिंग, मल्टीमिडीया अँनिमेशन अँड स्पेशल इफेक्ट, फोटोग्राफर, फिजिओ थेरपी टेक्नीशियन, प्री - प्रिपेरेट्री स्कुल मॅनेजमेंट, लघुलेखन मराठी, फुड अँड बेव्हरेज गेस्ट सर्व्हिस असिस्टंट, सेक्रेटरियल प्रॅक्टीस (इंग्रजी) , स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट (इंग्रजी ).
अशा प्रकारे ट्रेडची विभागणी केलेली आहे. यानुसार शासकिय आय.टी.आय.मध्ये खालील प्रमाणे वार्षिक प्रशिक्षण शुल्क, अनामत रक्कम आकारली जाते.
iti admission
आणि
प्रवेशावेळी जमा करावयाची अनामत रक्कम ६००/- ( प्रशिक्षण अनामत रक्कम ५००/- आणि ग्रंथालय अनामत रक्कम १००/- ) असे सर्व मिळून
अनामत रक्कम प्रशिक्षणादरम्यान प्रवेश रद्द केल्यास किंवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ( काही वजावट लागू असल्यास त्या वजा करून ) परत केली जाते .
थोडक्यात मशीन गट ( अभियांत्रिकी व्यवसाय ) - फी रु. २१५०/-
बिगर मशीन गट ( अभियांत्रिकी व्यवसाय ) - फी रु. १९५०/-
बिगर अभियांत्रिकी व्यवसाय फी रु. १७५०/-
SC, ST ,VJ ,NTSBC , OBC साठी एका वर्षाची फी ९५०/- आहे.
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा