जिल्हा स्तरीय समुपदेशन फेरी बाबत

जिल्हा स्तरीय समुपदेशन फेरी बाबत  :-

नमस्कार मित्रांनो ,

मा. संचालक , व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण  यांनी प्रसिंद्ध केल्याप्रमाणे दिनांक  २९ डिसेंबर  पासून  जिल्हा स्तरीय समुपदेशन फेरीचे  प्रवेश सुरु होणार असून सदरचे प्रवेश ३१ डिसेंबर पर्यंत चालणार असून दिनांक ०१ जानेवारी २०२१ रोजी पासून नियमित आय.टी . आय. चे प्रशिक्षण  सुरु होणार आहे. 

चलातर पाहूया काय आहे या जिल्हा स्तरीय समुपदेशन फेरी बाबत ......... 

दिनांक २३ डिसेंबर पर्यंत  चौथ्या फेरीचे  साय.५ वाजेपर्यंत ऍडiमिशन ( प्रवेश)   चालणार आहेत. 

त्यानंतर दिनांक २४ डिसेंबर ला साय. ५ वाजता संकेत स्थळावर ( www. admission .dvet.gov.in )  जिल्हा निहाय प्रत्येक आय.टी . आय. तील प्रवेशाबाबत उर्वरित जागांची माहिती ट्रेड नुसार जाहीर केली जाईल. सदर  उर्वरित जागांचा विचार करून आपल्या जवळच्या जिल्ह्यातील   आय.टी . आय. साठी आपणास   ऑपशन  भरायचा आहे. 

मित्रानो या फेरीतील ऍडमिशन हि मेरिट च्या बेसवरचबाबीचा   होणार असल्याने  जिल्हा निवड करताना याबाबात चा  विचार नक्की करा कि कोणत्या जिल्हातील  आय.टी . आय.मध्ये  जास्त  जागा शिलक्क आहेत. त्याप्रमाणे आपणास जिल्हा निवडायचा आहे.  महाराष्ट्र तील  कोणताही जिल्हा आपण या फेरी साठी आपण निवडू शकतो ( हा पण निवडलेल्या ठिकाणी आपली राहण्याची सोय असणे आवश्यक आहे.  कारण आपणास त्या ठिकाणी ट्रेड च्या कालावधी नुसार एक ते दोन वर्ष राहायचे आहे, म्हणून आपनास मिळालेले  मार्क आणि  प्रशिक्षण कालावधी चे राहण्याचे ठिकाण याचा विचार करून जिल्हा निवडायचा आहे. 

संकेत स्थळावर दिनांक २५ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यन्त साय. ५ वाजे पर्यंत आपल्याला जिल्हा स्तरीय समुपदेशन फेरीसाठी login  करायचे आहे.

नवीन टाईमटेबलनुसार सदरची तारीख  27 डिसेंबर 3 वाजेपर्यत वाढवलेली असुन पुढील कार्यक्रम पुर्वीप्रमाणेच राहील.

यासाठी प्रथम admission. dve. gov. in  या संकेतस्थळांवर जायचे आहे..

१ ) यानंतर candidate log in  वर क्लिक करून Registrated Candidate tap  वर क्लिक करायचे आहे. 

२) आपला रेजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाईप केल्यानंतर captcha code टाईप केल्यावर Login वर क्लिक करावे. 

३) यानंतर Admission activity या tap वर क्लिक केल्यानंतर आपणास सूचना दिसतील त्या सूचना योग्यप्रकारे वाचून घेणे आणि त्याप्रमाणे सर्व कागदपत्र तयार ठेवणे. 

४) यानंतर आपल्या सोयी प्रमाणे योग्य तो जिल्हा निवडा . 

५) यानंतर आपण निवडलेल्या जिल्ह्यातील जिल्हा आय.टी . आय स्क्रीन वर दाखवली जाईल. 

६) यानंतर MARK AATENDANCE या बटनावर क्लिक करायचे. 

याठिकाणी आपण एका पेक्षा जास्त जिल्हे निवडू शकतो . 

मित्रांनो आपण एकापेक्षा जास्त जिल्हेही निवडू शकतो. या साठी  नंबर ४, ५ व ६ प्रमाणे कृती करावी. 

७) स्क्रीनवर आपणास निवडलेले सर्व जिल्हे दाखवतील. यातील एखादा जिल्हा रद्द करायचा असेल तर Action  खालील DELET( जिल्हासमोरील )  या बटनावर  क्लिक करायचे म्हणजे तो जिल्हा रद्द होईल. 

८) यानंतर GENERATE AND SAVE PDF  वर क्लिक करावे. 

अशाप्रकारे आपणास करावयाचे आहे. 

itiadmission inmarathi.in 

मित्रानो पुन्हा एकदा परत सांगतो दिनांक २५ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यन्त साय. ५ वाजे पर्यंत आपल्याला जिल्हा स्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश   खात्यावर जाऊन login करायचे आहे .  आणि ज्या जिल्ह्यामध्ये  प्रवेश घेऊ  पाहताय त्या जिल्ह्याची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आपल्याला आवश्यक जिल्ह्याची निवड केल्यानंतर आपली नोंदणी सदर फेरीसाठी ग्राह्य होई. 

यासाठी मिंत्रानो 25 ते 27 तारखे दरम्यान 3 वाजेपर्यंत न विसरता नोंदणी करा.

नोंदणी  केलेल्याच उमेदवारांचा विचार वरील फेरीसाठी  केला जाईल. 

तसेच सदर जिल्हा निवड केल्यानंतर दिनांक २९ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या कालावधीत त्या निवड जिल्हा ठिकाणी आपल्याला दिलेल्या दिनांक आणि वेळेत हजार राहून मेरिट क्रमांक नुसार उपलब्ध जागांवर , मागणीनुसार आपणास जागा वाटप केले जाईल . या साठी कोणत्या ट्रेड मध्ये काय आहे ,काय शिकविले जाते , जॉब च्या काय संधी असतात हे माहित असणे गरजेचे आहे. या साठी या ब्लॉग वर उपलब्ध ट्रेड ची माहिती वाचा म्हणजे या फेरीत ट्रेड  निवडीचा निर्णय लगेच घेता येईल.  

हा ब्लॉग मोबाइलवर  किंवा कॉम्पुटर जरी पाहत असाल तरी स्क्रीनवर  खालील बाजूस  अधिक पोस्ट वर क्लिक केल्यावर आपणास या ब्लॉगवर असणाऱ्या सर्व ट्रेड बाबत माहिती वाचता येईल. 

मित्रांनो जर जमत नसेल तर आपल्या जवळच्या आय.टी.आय. मध्ये जावुन ही तुम्ही या फेरीसाठी नोंदणी करु शकता. तशी सुविधा उपलब्ध करुन दीली आहे.

मिंत्रानो कोणत्याही आमिषाला बळी पडू नका . आय . टी . आय चे ऍडमिशन हे मेरिटवर होत  असतात , यासाठी कोणालाही पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका. 

हि माहिती जास्तीत जास्त आपल्या मिंत्रांमध्ये सांगा .... 

आपल्या पुढील  शैक्षणिक वर्षासाठी माझ्याकडून आपणास हार्दिक शुभेच्छा ...... 

itiadmission inmarathi.in 
टिप्पण्या